facebook

Saturday, May 19, 2018

उन्हाळ्याची सुट्टी - १

लहानपणी, वार्षीक परीक्षेनंतर मिळणारी उन्हाळ्याची सुट्टी ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चैन असायची. In fact, शाळेतले दिवस पटपट संपायचे, कॅलेंडरची पानं भर्र्क्कन पुढे सरकत जायची ती त्या उन्हाळ्याच्या सुट्टीची आस मनात घर करून असायची म्हणूनच.. दिवाळीची सुट्टी, किल्ले, आकाश कंदील, फराळ, अभ्यंग स्नान, नवीन कपडे, भाऊबीज इत्यादी मज्जा घेऊन यायची पण त्यात निवांतपणा, लोळत बसणे, वर्ष सरून मोठं झाल्याची जाणीव होणे असे स्वतः बद्दलचे समज, गैरसमज करून घेण्याचा आवकाश नसे.
उन्हाळ्याची सुट्टी सगळच घेऊन येई, प्रत्येक वर्षी मनात स्वतः बद्दलची coming of age फिल्म बनत असे. उगाच वाटत असे आपण कसे शहाणे, मोठे होत आहोत; तुमच्यापेक्षा अमुक अमुक पावसाळे जास्त पाहिले आहेत म्हणण्यापेक्षा मोठ्यांनी अमुक अमुक उन्हाळे जास्त पाहिले आहेत असं म्हणावं असे वाटे.. इयता नव्वी आधीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या 'लई भारी' होत्या.... त्या इतक्या मुक्तपणे, उनाडपणे अनुभवल्या म्हणून त्या सुट्ट्या जितक्या हव्या हव्याश्या वाटत तितक्याच आज त्या दिवसांच्या आठवणी प्रिय आहेत..
आम्हाला सुट्टी असली तरी आई बाबांना नेहमीच कसलं न कसलं काम असत. सुट्टी निम्मित कुठेतरी सहलीला गेलं पाहिजे असं आमच्या कुटुंबात अजिबातच घडत नसे. आई शिक्षिका असल्यामुळे  तिला पेपर तपासायला जाणें, refresher कोर्स इत्यादी साठी जावं लागे. रोज सकाळी उठून, इतर दिवट्यानी पेपर मध्ये काय दिवे लावले आहेत ह्याचा निकाल लावायला आईला जायला लागे. त्यामुळे माझं निकालपत्र कधी घरी येतंय ह्याबद्दल एक Antenna सतत active असे. पण माझ्या परीक्षेचं दडपण मी सोडून घरातली इतर माणसंच घेत, त्यामुळे निकालाचे दडपण पण मी त्यांच्यावरच सोपवलेलं होतं.
Fridge आल्यावर, त्याचं आम्हाला भयंकर आकर्षण होतं.  माठातलं वाळा घातलेलं पाणी fridge मधून बर्फच्या रुपात पोटात गेलं की वेगळीच मज्जा वाटे. Fridge बराचसा मोकळाच असे, त्यात आज ठेवतो तशा खचून गोष्टी भरलेल्या नसत. पण fridge आल्या नंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आई घरात पेप्सीकोला आण्याला लागली आणि नंतर अनेक वर्ष सुट्टीच्या पहिल्या दिवशी फ्रीझर मध्ये पेप्सीकोला आणून आणून ठेवलेला असे. मुळातच fridge च आकर्षण, त्यात  पेप्सी ही नाही आणि कोला पण नसलेला पेप्सीकोला! आम्हाला lotteryच लागल्यासारखं वाटायचं.. पेप्सीकोलाच्या  box वर 'एक शेकडा' असं काळ्या रंगाच्या स्केचपेन ने लिहिलेलं असायचं.मला शंभर म्हणण्यापेक्षा एक शेकडा म्हणणं जास्त भारदस्त वाटायचं. शिवाय आहे त्यापेक्षा जास्त ऐवज आहे अशी फसवी समजूत शेकडा हा शब्द मला करून द्यायचा. दररोज उठून  कुठल्यातरी दुकानातून कुठल्यातरी अस्वछ्, अशुद्ध पाण्याचा केलेला पेप्सीकोला खाणायचा आम्ही हट्ट करू नये म्हणून सुट्टीच्या पहिल्या दिवशी fridge च्या फ्रीझर मध्ये हे wholesale शेकडा पेप्सीकोले हजर होत. (आता ते पेप्सीकोले स्वच्छ पाण्याचे आहेत ह्याचे quality testing आईने कसं केलं होतं हे माहित नाही - पण आम्ही अनेक वर्ष त्यांचा आस्वाद घेऊनही कधी आजारी पडलो नाही, पोटं बिघडली नाहीत.) मला सगळ्यात जास्त त्यातला काला खट्टा चा स्वाद आवडत असे, त्यानंतर काचेच्या हिरव्या बाटलीच्या रंगाचा 'खस' स्वाद असलेला. दादाला पण हे आवडत आणि मग कधी कधी आम्ही ते शेर करत असू.  ताईला कुठला जास्त आवडायचा आता आठवत नाही -पण ती नेहमी आमच्याबरोबर exchange करायला तयार असे, बरेचदा तिच्या वाटणीचा पेप्सीकोला ती आम्हाला देऊन टाके. पेप्सीकोला कधी खायचा ह्या बद्दल लिखित अलिखित नियम नव्हते. त्यामुळे मनात आल्यास सकाळी उठल्या उठल्या सुद्धा पेप्सीकोला खाण्याची मुभा होती, फक्त आम्हा तिघांना, दिवसाला एक पेप्सीकोला असा कोटा होता. सकाळी सकाळी स्वतःचा पेप्सीकोला संपवला तर मग दिवसा भावंडाना त्यांचा पेप्सीकोला खाताना बघून परत मोह होणार आणि त्यावेळेला फक्त मिटक्या मारण्याशिवाय पर्याय उरणार नाही, म्हणून आपोआपच मनावर संतुलन राही .. अर्थात हा धडा अनुभवातून सिद्ध होई, पहिले दोन तीन दिवस सकाळी सकाळी पेप्सीकोला खाऊन झाल्यावर! पेप्सीकोला घरात आणूनसुद्धा  कधी आई बाबांनी खाल्ला नाही, खूप आग्रह केला किंवा उन्हातून आल्यावर आईच्या हातात तो ठेवला तर एखादवेळ ती तो खाई. पण fridge घरात आल्यावर आईला 'समशीतोष्ण'पाणी प्यायला आवडायला लागलं. fridge मध्ये पण आम्ही तांब्यातच पाणी गार करायला ठेवत होतो, बाटल्या- बीटल्या खूपच नंतर आल्या.  
Fridge आल्यानंतरच्या काळात नंदा आजी म्हणजे बाबांची आई cancer मधल्या पहिल्या chemo मधून बरी झाली त्यानंतर वाडा सोडून आमच्याबरोबर राहत होती. तिच्यासाठी बाबा ice cream, कुल्फी आणत,( घशाचा cancer होता तिला). ते पण ती जेमतेमच, थोडं थोडकं खाई. आजीला पेप्सीकोला दिल्यावर ती गालावर थापटी मारत म्हणे," तुम्ही खा हो...मला नाही त्याचं काही आपरूप." तिच्या ह्या गालावरच्या थापटी मारण्यात तिच्या डोळ्यात बघितलं की मला त्या पेप्सीकोला बद्दल वाटणारी ओढ बरोबर का चूक असा प्रश्न पडे....पण मग तो प्रश्न पेप्सीकोला आणि fridge मधल्या बर्फाच्या cubes कुडुम कुडुम करण्यात डोक्यातून विरघळून जाई.
Fridge मधल्या ice cubes कुडुम कुडुम करून खाण्याला वेळेची बंधनं होती. झोपेच्या आसपास घरात हा आवाज झाल्यावर प्रचंड चिडचिड होई, ती व्यक्त करायला शब्दांचा पण वापर करण्याची गरज नव्हती. चेहरा, भुवया , भावमुद्रांंमधून सगळं व्यक्त होई, इतकं छान व्यक्त की तोंडातला बर्फ आपसूक घशाखाली उतरत.

वार्षिक परीक्षा संपत असतानाच घरात कोकणातली एक आंब्याची पेटी आलेली असायची. देसाईबंधूची आणखीन एक पेटी असे दोन पेट्यातले आंबे आढ्यात पिकत असायचे. घराच्या दारात उभं राहिल्या राहिल्या पिकणाऱ्या आंब्याचा वास यायचा.. सकाळी कुकरच्या शिट्ट्यांंबरोबर दरवळणारा आंबे मोहर तांदळाचा वास जेव्हा ह्या आंब्याच्या वासात मिसळायचा , तेव्हा एक वेगळीच तृप्ता अनुभवायला मिळायची. त्या भाताबरोबर मेथांबा, कैरीची आमटी, कांदा कैरी, कैरीचे सार  हे किंवा असं काहीसं आंबा कैरी भवती घुटमाळणारं काहीतरी दुपारच्या जेवणात हमखास पानात पडायचं. 
घरात एवढे आंबे असूनसुद्धा मला स्वतः आंबा सोलून , फोडी करून खायला कधीही आवडत नसे. आई, ताई, क्वचित आजी आणि भाऊ हे माझ्यासाठी ते काम करत. सकाळी बाहेर पडायच्या आधी आई पिकलेले आंबे बाहेर काढून ठेवी आणि मग त्याच्या फोडी करण्याचे किंवा दूध आंबा करण्याचे काम हे खाणाऱ्याची जवाबदारी असे. दादाने वेगवेगळ्या ग्लासात दूध आंबा करून fridge मध्ये ठेवण्याची प्रथा सुरु केली. किती आंबा, किती दूध ह्याचं proportion ठरलेलं असे. Mixer, Blender, Hand mixer अशी काहीही भानगड नाही. मग कधीतरी का कुणास ठाऊक आमच्यात, कुणाचा दूधआंबा सगळ्यात शेवटी संपतो ह्याची चढाओढ सुरु झाली. त्यात जिंकणाऱ्याला कोणतेही बक्षीस मिळत नसे, फक्त स्वतःचा किती control आहे वगैरे मिरवायला मिळे.
मी आणि दादा जरी घराबाहेर पत्ते, कँरम, डबा ऐसपैस, क्रिकेट  काहीही खेळायला गेलो असलो तरी मी दर तासाला घरात जाऊन दूध आंब्याचा एक एक घोट पीत असे. असे दर तासाला घरी येण्याने, दाराची बेल वाजवल्याने आजी हैराण होत असणार, पण कधीतरी," असं सारखं येऊ जाऊ नकोस.." असं म्हणण्या पलीकडे ती कधी काही ओरडली नाही. Main दरवाजा stopper ने उघडा ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता, पण वाड्यासारखा आसपास घरोबा जमलेला नव्हता , आणि इतका सुसाट वारा असायचा की दार अनेकदा जोरात आपटून बंद होई; आजीला त्याची भीती वाटे. पण हा सगळा उपद्याप करूनही, मी खेळातून दर तासाने परत हजार होत आणि एक घोट दूध आंबा पीत. दादा मात्र रणरणत्या उन्हातून खेळून आल्यावर, जेवण उरकून मग एका दमात त्याचा ग्लास संपवून टाके. मग bedroom मध्ये पडदे ओढून अंधार झाला, तो दुपारच्या झोपेला गेला की मी हळूच माझ्या ग्लासातला शेवटचा घोट पिऊन टाके आणि नंतर दादाला चिडवत बसे. मग आम्ही घरभर झटापट करत, आरडा ओरडा करत, दारं ढकलत, सगळ्यात वरच्या पट्टीत खिदळत, बरळत  फिरत बसू. अर्थात शारीरिक चकमकीत दादाच जिंकायचा. दिवसातून त्याला एकदा तरी," मनीष दादा तू देव आहेस. मनीष देवा मला माफ कर.." असे म्हणायला लावायचा. ताईचा दूध आंबा मात्र fridge मध्येच राही. तिची चढा ओढ आई बरोबर संध्याकाळी घडे.  ताईचे म्हणणे दूध प्यायलाने तोंडाला वास येतो, आई चे म्हणणे दूध प्यायलच पाहिजे...ताईच्या वाटचा दूध आंबा दिवसभर fridge मध्ये राहून जास्त मुरलेला असे -तो अर्थात कुणाच्या पोटी जात असेल हे सांगायला नकोच..
त्या मूर्ख चढाओढी मुळे  दर तासाला एक एक घोट घेतलेला किंवा एका दमात संपवलेला तो दूधआंबा- खरच आम्ही त्याचा आस्वाद घेत होतो का? का खरा आस्वाद आमच्या लुटूपुटूच्या भांडणामध्ये आणि चढाओढीत होता? कदाचित तसच असावं.. सुट्टीतली भावंडांशी केलेली भांडणं ही स्वतःच्या आणि इतरांच्या करमणुकीचा  मोठा source होती. चढाओढी कशाबद्दल ही असत. साबुदाण्याची खिचडी खाताना एक एक साबुदाणा खाऊनही कोण खिचडी आधी संपवतय, सगळ्यात जोरात घराचे दार कोण लाऊ शकतंय, राणी ( आमची कुत्री)  सगळ्यात जास्त कुणाचं ऐकते, कुणाशी जास्त खेळते,कुणाकडून दूधपोळी पटकन खाते, कुणाला जखमेवरची खपली काढताना अजिबात रडू येत नाही, कोण सगळ्यात जास्त जोरात ओरडू शकतं, शेजाऱ्यांंची बेल वाजवून, आवाज न करता कोण पळून जाऊ शकतं..मी आणि दादा काहीही bet लावायचो.. ताई ह्यामध्ये फारशी नसत.
ताई आमच्यात हे पोरकटपणे करायला फार कमी वेळा येत.. आता विचार केल्यावर वाटतं त्या काळात ती आजीसाठी घरात राहत असणार.ती माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. तिला भेटायला तिच्या अनेक मित्र -मैत्रिणी घरी येत, ते पण माझे खूप लाड करत. कुणी  गरवारे कॉलेज जवळच्या तापडिया मधून सामोसे आणत, कुणी शनिवारवाड्या जवळच्या दुकानातून साबुदाणा वडा आणत. अर्थात आम्ही हे वाटून खात. माझ्या आठवणीत ताई सुट्टीत नेहमीच काहीतरी शिकत/ शिकवत असायची...उन्हाळ्याच्या सुट्टीत ताई ज्या ज्या शिबिरांना गेली, त्यातलं ती मला पण काही न काही शिकवत गेली. 
ह्या सगळ्या अगदी मी आठ नउ वर्षाची असतानाच्या आठवणी.बिनडोक उनाडपणा संपला किंवा विचार करायला शिकवून गेला तो चौथी नंतरचा उन्हाळा. शेवटच्या पेपरहून वाड्यात गेले, आणि आजी गेलीच होती,... ते जाणार, ती गेली तर ती सुटेल ..असं काय काय कुजबुजणं आधी कानावर अनेकदा पडलं होतं. मी घरी आले आणि घराबाहेर ही मोठी गर्दी जमलेली. पण त्यातल्या ओळखीच्या कुणीच मला घरात शिरण्यापासून थांबवलं नाही. घरात शिरल्यावर आजीची वाड्यातली मैत्रीण, कावेरी आजी, तिनेच सगळ्यात आधी मला जवळ घेतलं. ताई, दादा तेव्हा काय करत होते, त्यांना कोण कुशीत घेऊन समजावत होतं ते आठवत नाही.. आजोबा, वडील आणि आई सगळं कार्य उरकण्यात मग्न होती, त्यांनी जुजबी पाठ थोपटली. घरात अन्न शिजवायचं नाही वगैरे त्या आधी मी अनुभवलं नव्हतं... एरवी वाड्यातल्या  वेगवेगळ्या घरातून आलेले डब्बे चवीने खायला अवडलं असतं पण त्या दिवशी पिठलं भात तोंडात घोळत राहिला. आजी 'जाणं' म्हणजे नक्की काय ह्याचा अर्थ मी लावत होते... कोनाड्यातल्या आरशा शेजारी तिची Afghaan Snow ची बाटली, कुंकवाचा करंटा तिचा अडकित्ता  आणि शेजारीच तारेवर तिची आवडती विटकरी रंगाची, निळ्या बुट्ट्याची, बारीक चंदेरी काठाची साडी टांगलेली होती....
डोक्यात हे असले विचार, curiosity घोळत राहिली असणार म्हणून असेल कदाचित पण माझ्या स्वप्नात आजी आली आणि म्हणाली, "आळंदीला घेऊन चल मला बबड्या..." 
आजीला वारकऱ्यांचे खूप कौतुक होतं, पालखी बरोबर, वारकऱ्यांबरोबर, ती आणि कावेरी आजी थोडं अंतर चालत जात. Cancer झाल्यापासून मात्र ती फक्त ओसरीतूनच वारकर्यांना बघे, त्यांना शिधा द्यायला, चहा पाणी द्यायला धडपडे. पण तिला खरी आस लागून राहिली होती ती तिच्या कोकणाची ..बकुळी, आंबा, फणस,पोफळी... डोक्यात खोवलेल्या कर्दळीच्या, सोनचाफ्याची... औषधांच्या ग्लानीत ती अनेकदा हे बोलून दाखवे. पण मग आळंदी का आणि मला स्वप्न का ? हा प्रश्न मला अजूनही अनेकदा पडतो, आणि त्याची अनेक अनेक उत्तरं सापडतात.
बाबा, आजोबा, कावेरी आजी आणि मी आळंदीला गेलो..अस्थीविसर्जन करून परत बस मध्ये बसलो, तेव्हा बाबांच्या कुशीत शिरताना मला वाटलं....दर तासाला बेल वाजवून तिला नको होतं सतत उठवायला... स्टूल वर उभं राहून स्वैपाक करण्याचा हट्ट करत असताना, जरा तिच्याकडून काहीतरी शिकायला हवं होतं. जरा तिच्या शेजारी बसून कधीतरी तिच्या धापा लागणाऱ्या आवाजात तिचा कोकणचा विरह, आळंदीची आस समजून घ्यायला हवी होती...पण आजी गेली म्हणजे हे पण सगळं गेलं...... आणि माझा अगदी बिनडोक उनाडपणा पण त्या सुट्टीत गेला....

( Continued.... )

Friday, April 27, 2018

मनीची आई

मनी , गोट्या आणि बेबी बागेचं दार उघडून आत धावत सुटली. आपआपले stroller सांभाळत त्यांच्यामागे हळू हळू त्यांच्या आया बागेत शिरल्या. गोट्या आणि बेबीला छोटी भावंडं होती, आपआपल्या आयांच्या खांद्यावर खेळणारी. मनी बागेतल्या उंच वाढलेल्या गवतातून पळत मागे गेली; गोट्याच्या आणि बेबीच्या आईला, " Hi गोट्याची आई, Hi बबलू..." असं म्हणत तिने त्यांच्या stroller वरून हलकेच हात फिरवला...मग ती बेबीच्या आई जवळ गेली." Hi! बेबीची आई, Hi सिंबू.." ती हलकेच बेबीच्या stroller वरून हात फिरवणार तर बेबी पळत तिच्या जवळ गेली आणि तिला बाजूला ढकलत म्हणाली ," माझी आई , माझा भाऊ , माझं ...ह." असं म्हणून मनीला बाजूलाच केलं. मनीची आई बागेत शिरल्या शिरल्या झाडाखालची सावली शोधत तरा तरा पुढे चालत गेली होती. ती लांबूनच हा प्रकार बघत होती. तिला बेबीने मनीला असं बाजूला केलेलं आवडलं नाही, पण ती काही बोलली नाही. ती वाट पाहत होती मनी तिच्या जवळ येऊन तिला मिठी मारून  परत एकदा ," Hi आई!" म्हणण्याची..
पण मनी तिच्याजवळ काही गेली नाही; तिला ओलांडून,धावत धावत Sandbox मध्ये खेळायला गेली. वाळू शेजारीच पाण्याचं छोटं कारंजं होतं. वाळू आणि पाण्यात मनी तासंतास खेळत बसे; झोका घेण्यानंतरचा तिचा सगळ्यात आवडता खेळ. त्यामुळे मनीच्या आई बाबांनी तिच्यासाठी प्लास्टिकची छोटी घमेली , फावडं,चाळणी, पाण्याचा झारा, छोटी बादली सगळंच आणलं होतं. मनी भराभरा चपला काढत होती आणि तिची आई stroller च्या खालच्या कप्प्यातून मनीची खेळणी. खेळणी काढण्यासाठी खाली वाकलेली असताना, मनीच्या आईचं लक्ष परत बेबी आणि गोट्याकडे गेलं... ते दोघंही बागेच्या मध्यभागी झाडाच्या सावलीत  बेबीच्या stroller जवळ बसले होते. त्यांच्या आया बबलू आणि सिंबूला गुडघ्यावर उडवत एकमेकींशी काहीतरी गप्पा मारत  होत्या. बेबी तिच्या खेळण्यांचे वाटप करत होती आणि गोट्या ती देईल त्यात समाधान मानून मान डोलवत, तिच्याकडून खेळणी हातात घेत होता. ते पाहून मनीच्या आईला कालचा प्रसंग आठवला.
काल मनीची आई तिची प्लास्टिकची खेळणी चुकून घरीच विसरली होती. बागेत आल्यावर तिच्या लक्षात आलं. तिला वाटलं, मुलं आप आपसात वाटून घेतील खेळ... घमेली, बादली फावडी सोडून बेबीकडे बरेच समुद्री प्राण्यांच्या आकाराचे साचे पण होते, एक मोठा देखणा प्लास्टिकचा किल्ला होता. पण बेबीने मनिला त्यातलं काहीही दिलं नाही.. बेबीची आई ओरडली,म्हणाली,"You have to share बेबी,नाहीतर मनी खेळणार नाही हं तुझ्याशी.."  मग, अगदीच मनाविरुद्ध, "आईच्या धाकापोटी मी तुला देते आहे, नाहीतर .." अशा अविर्भावात बेबीने ,मनीकडे एक छोटा कासवाचा साचा टाकला...मनीला फावडं किंवा बादली हवी होती, तिने त्याकडे बोट दाखवून बेबीला खुणावलं, पण बेबी "No! ते माझं आहे " असं म्हणून वाळू उधळत ,तोंड फिरवून खेळायला लागली.
मनीची पडलेली मान, फुगलेल्या नाकपुड्या, लपलेला पण नक्कीच हिरमुसलेला चेहरा पाहून आईला एक युक्ती सुचली. तिने घरून आणलेले खाऊचे डब्बे उघडले, सगळे जिन्नस एकाच डब्ब्यात भरले आणि मग वेगवेगळ्या आकाराचे तीन डब्बे, मनीच्या पाण्याच्या बाटलीवरचा ग्लास वजा झाकण आणि खाण्यासाठी आणलेले चमचे मनीला खेळायला दिले...मनीचा चेहरा खुलला, " आईकडे सगळ्या कोड्यांची उतरं असतात !" असा काहीसा भाव तिच्या चेहऱ्यावर झळकला. तिने वाळूत छोटासा भातुकलीचा संसार थाटला. थोड्या वेळाने बेबी आणि  गोट्या तिच्या खेळात सामील झाले, मनीने त्यांना पाण्यात वाळू घातलेला चहा करून दिला. मग त्याच सामग्रीत soup केलं गेलं, पाला पाचोळा गोळा करून फ्रुट सलाड आणि बिस्कीटं झाली. खाऊचे डब्बे आणि चमचे तिघांच्या हातात वावरले पण मनीला हवी असलेली बेबीची खेळणी तिला काही खेळायला मिळाली नाहीत. भातुकली रंगात आली आणि मग बेबीची आई आणि सिंबू वाळूत खेळायला बसले.सगळ्यांनी किल्ला करायचं ठरलं.मनी उड्या मारत उठली आणि म्हणाली "मी आणते पाणी , मी आणते पाणी...."तर बेबीने मुद्दाम बादली स्वतःच्या पाठीमागे लपवली...बेबीच्या आईने आणि मनीच्या आईने एकमेकींकडे एक कटाक्ष टाकला, पण दोघीही काही बोलल्या नाहीत. मनी नावाच्या वेड्या कोकराच्या मनात बादली मागण्याचा सुद्धा विचार आला  नव्हता...ते कारंज्यातून डब्यात पाणी भरून, ते अंगावर सांडत, किंवा मुद्दाम ओतून घेत, वाटेत हिंदकळत वाळूच्या ढिगाऱ्याजवळ  पोचलं सुद्धा!  बेबी, गोट्या, बेबीची आई , सिंबू सगळे एका जागी बसून किल्ला बांधत राहिले आणि मनी तिच्या छोट्याश्या डब्यात पाणी भरत किल्ल्याला पाणी पुरवण्याचं काम मजेने करत राहिली..मनीच्या आईला स्वतःच्या कोकराचं खूप कौतुक वाटलं, तिने पुढे होऊन तिची एक गोड पापी घेतली. मनीपण अनपेक्षितपणे तिच्या गळ्यात पडली आणि गोड हसली, पण आई तिला दोन क्षण घट्ट धरणार तर ती डोळे मिचकावून पाणी आणायला पळाली.....कालचा तो दिवस सरला, आज अजून खेळाचा खेळ रंगायचा होता.
मनीचा खिदळण्याचा आवाज कानावर पडला तशी मनीची आई खेळण्यांची पिशवी घेऊन कारंजाजवळ जाऊन बसली. मनीने पिशवी वाळूत उलटी केली, सगळी खेळणी वाळूत पसरली. तिने बादली उचलली आणि त्यात कारंजातलं पाणी भरायला लागली. बेबी आणि गोट्यापण पळत पळत आले, त्यांच्या हातात बेबीची खेळणी होती. त्यांनी वाळूत पडलेल्या मनीच्या खेळण्यांकडे बघितलं. stroller जवळ बाकड्यांवर बसलेल्या त्यांच्या आयांनी ओरडूनच 'बूट बूट ...please.." असं सांगितल्यावर दोघांनी लाथा मारत बूट उडवले, मनीला त्या उडणाऱ्या बुटांचं खूप अप्रुप वाटलं.. आईला कळून चुकलं की आता हा बूट उडवण्याचा प्रकार त्यांच्या पण घरी होणार...
बूट उडवून बेबी आणि गोट्या कारंजापासून लांब जाऊन वाळूत बसले आणि फावड्याने वाळू उकरायला लागले. वाळूचा छोटा ढीग जमा झालेला पाहून मनी त्यांच्याकडे धावात गेली आणि म्हणाली ," मी आणते पाणी, मी आणते पाणी.." ती परत पळत कारंजाकडे गेली आणि तिला जमेल तितक्या वेगात बादली भरायला लागली, जणू शर्यत आहे आणि घडाळ्याचा काटा वेगाने पुढे सरकतोय... इवल्याश्या मनीच्या इवल्याश्या बादलीत तिच्या मनाइतकं पाणी भरल्यावर ती पळत बेबी आणि गोट्याकडे गेली आणि तिने त्यांनी खणलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर ती बादली ओतली... तशी बेबी तिला म्हणाली, " no...no मनी..." पण मनीला थांबून तिचं ऐकायला उसंत नव्हती..ती पळत कारंजाजवळ गेली अजून पाणी आणयला. ती पाणी भरत असताना बेबी आणि गोट्या त्या ढिगाऱ्याजवळून उठले आणि दुसऱ्या कोपऱ्यात खणायला लागले...मनी तिची बादली भरून परत त्यांच्यापाशी हजर.. तिने परत एकदा तिथे वाळूत तिच्या बादलीतलं पाणी ओतलं... परत बेबीने , " नकोय आम्हाला पाणी... आम्हाला आमचं खेळायचंय .." असं मनीला ठसक्यात सांगितलं.. बेबीच्या आवाजामुळे असेल कदाचित पण मनीची पावलं कारंजाकडे वळली पण अडखळली.तिने आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आई तिच्याकडे बघून हलकेच हसली.पुढे होऊन आईने हाताने वाळूचा ढिगारा करायला लागली..मनी वाळूत पसरलेल्या तिच्या खेळण्यांकडे गेली आणि त्यातलं घमेलं उचलून तिने त्याच्यात पाणी भरलं, थोडी वाळू भुरभुरली आणि एक पान चुरडून घातलं. ते घमेलं आईला देत मनी म्हणाली, " कॉफ्फी...". आई  चव घेत म्हणाली," आहा ..Thank you ..मनु तुला कसं कळलं मला कॉफ्फी हवी होती म्हणून?" मनी हसली, म्हणली, 
"तू कायमच पीत असतेस कॉफ्फी! तुला खाऊ काय हवाय खायला? उ?" आईने उत्तर द्यायची वाट न पाहता, मनी काहीतरी खटपट करायला लागली. मग आईला sandwich, बिस्कीट, फ्रुट सलाड इत्यादी खायला घालून मनी परत बादली उचलून त्यात पाणी भरायला लागली...बादली भरून मनी बेबी आणि गोट्याच्या दिशेने वळली तेव्हा आईच्या छातीत थोडं धडधडायला लागलं...आईने तिला हाक मारली," मनी इकडे ह्या ढिगाऱ्यावर घाल पाणी. आपण मोठा किल्ला .." पण आईचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत बेबीच खेकसली,"नकोय आम्हाला तुझ्याकडून पाणी. आम्हाला आमचं आमचं खेळायचंय.." पण मनी तिथेच उभी राहिली, फतकल मारून खाली बसली आणि बेबीच्या खेळण्यांना गोंजारायला लागली, तशी बेबी तिथे उठून उभी राहिली. गोट्या, बेबी आणि मनीकडे आलटून पालटून बघत होता. न राहवून मनीची आई म्हणाली," बेबी आणि गोट्या , मनीला तुमच्याशी खेळायचंय म्हणून तर आपण एकत्र बागेत आलोय. तुम्ही सगळे एकत्र खेळा.." 
" पण ती सारखी माझी खेळणी घेते.." बेबी उत्तरली.
" तिला तुझी खेळणी नकोयत बेबी.तिच्याकडे तिची खेळणी आहेत......" मनीच्या आईने शांतपणे उत्तर दिलं.
" मग आमच्याशी का खेळायचंय ?" बेबीचा चढ्या स्वरातला प्रश्न.
गोट्या एक खेळणं तोंडात घालून हे सगळं बघत होता..मनी मान खाली घालून बसलेली पाहून, आईला एकदम राग आला...
" ठीक आहे आम्ही खेळतो एकत्र... तुम्ही नका खेळू तिच्याशी." असं म्हणत आई उठली, तिने मनीला आणि तिच्या बादलीला उचलून घेतलं. कारंजाजवळ मनिला खाली उतरवून, मनीच्या पाठीवर हात थोपटत आई तिला म्हणाली,"मनुली आपण मोठाच्या मोठा किल्ला करू. मी वाळू खणते तू पाणी आण बरं का?" बागेत आल्यापासून पहिल्यांदाच मनी जरा नाखुशीने बादलीत पाणी भरायला लागली.. आईने बेबी आणि गोट्या पासून अंतर ठेऊन वाळू खणायला सुरुवात केली. तितक्यात बेबीची आई सिंबूला घेऊन आली, वाळूत बसता बसता तिने विचारलं,"काय झालं?" मनीच्या आईने तपशीलवार न सांगता ,"मनीला खेळायला घेत नाहीयेत..." एवढंच सांगितलं. वाळूकडेच नजर केंद्रित करून आईने एक छोटं आळंं केलं, त्याच्यात खाली पाचोळा भरला. मनी बादलीत पाणी घेऊन आल्यावर आई तिला म्हणाली,"ही आपली विहीर आहे बरं का मनु. किल्ल्यासाठी पाणी विहिरीत गोळा करूया.." मनीने घाईघाईत बादलीतलं पाणी विहिरीत ओतलं आणि ती परत पळत कारंजाकडे गेली. आईने सहजच बेबी आणि गोट्याकडे बघितलं. ते दोघंही मनीकडे बघत, तिच्याकडे बोट दाखवून, एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत होते आणि मग हसायला लागले. आईने, बेबीच्या आईकडे बघितलं. ती पण त्यांच्याकडे बघत होती...हे त्यांचं वागणं मनीला कळलं आहे का हे बघायला आईने कारंजाकडे बघितलं तर मनी बादलीने घमेल्यात पाणी भरत होती आणि तिला एका हातात बादली आणि एका हातात घमेलं आणायचं होतं. अर्थातच घमेलं कंबरेला टेकवून ठेवताना ते तिच्या अंगावर लवंडलं...मनीचा फ्रॉक ओला झाला तसं ती शहारून म्हणाली ," आई पाणी खूप गार आहे." बेबी आणि गोट्या तोंड लपवून, मनीकडे बोट दाखवत हसतच होते....आणि मनीला पण ते कळलं .... तिने आईकडे पाहिलं, फ्रॉक घट्ट धरला आणि ती बागेच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या झोपाळ्याकडे ती धावत सुटली... आई तिच्यामागे जायला उठली पण उद्वेगाने बेबीच्या आईला म्हणाली, " हे दोघं जे वागतायत ते खूपच वाईट आहे...its mean and its heartbreaking..." बेबीची आई मान डोलावते आहे एवढंच मनीच्या आईने पाहिलं आणि ती चालायला लागली तेवढ्यात तिच्या कानावर पडलं " I am sorry मी बोलते त्यांच्याशी..." 
मनीची आई झोक्यांजवळ पोचली तेव्हा मनी झोक्यावर चढण्याचा प्रयत्न करत होती. लहान बाळांच्या bucket झोक्यासाठी मनी मोठी झाली होती पण ह्या मोठ्या मुलांच्या झोक्यासाठी ती लहानच होती. मनीचे ते झोक्यावर चढण्याचे प्रयत्न पाहून, आईचे डोळे पाणावले. एक दोन थेंब गालावर ओघळले ते तिने पटकन पुसले आणि डोळे चोळले. मनी तिचा शर्ट ओढत तिला विचारात होती,"आई डोळे का चोळते आहेस? sunscreen गेलंय?" आईने मान हलवली...ती मनीसमोर गुडघ्यांवर बसली आणि डोळे मिटून म्हणाली,"फुंकर मार. आईला बरं वाटेल..." 
मनीने आईच्या गालावर हात ठेऊन तिच्या डोळ्यावर फुंकर मारली. मग गाल ओढत म्हणाली, "झोका! उंच उंच दे हा ..अगदी उंच !" आईने मनीला झोक्यावर बसवलं. झोका हलकेच पुढे ढकलला... मनी उंच गेल्यावर हसत होती आणि खाली आली की ,"अजून अजून जोरात" असं म्हणत होती. तीन वर्षाच्या आपल्या ह्या मनीला आपण 'शाळेत' किंवा प्लेस्कुल मध्ये घातलं ते तिला मित्र मिळावेत म्हणून...गेले काही दिवस शाळेनंतर तिच्याह्या 'मित्रांबरोबर' आपण बागेत आलो ते तिची 'मैत्री' वाढावी म्हणून. तिच्याशी तिच्या इतकंच खोडकर, निर्मळ, भाबड्या मनाचं तिला खेळणारं कुणीतरी मिळावं म्हणून..आईचं मन कळवलं,तिला वाटलं  मनीला आणि स्वतःला एका छान मऊ bubblewrap मध्ये बांधून घ्यावं..मनीने धडपडावं, चुका कराव्यात खूप खेळावं,शिकावं पण तिच्या मनावर ओरखाडे येऊ नयेत.. ओरखाडे न येता, शिकता येत असतीलच की किती गोष्टी..आईला वाटलं सगळ्यांना, जगातल्या सगळ्या सगळ्यांना, आईला तिची मनी जशी वाटते, कळते, भावते तशीच कळावी. पण तसे लोक कुठे भेटणार,तिच्या मनीचं मन तिच्या इतकं जाणणारे, जपणारे...?
जोरातल्या झोक्यात, वाहणाऱ्या वाऱ्यात मनीला हळूच जांभया यायला लागल्या. तिने लाडिक हाक मारली आईला, पण आईने तिला झोक्यावरून खाली काढलं नाही; आई वाट पाहत होती बेबी आणि गोट्याने येऊन मनीला sorry म्हणण्याची.....



Wednesday, April 11, 2018

Wildflowers and hot glue hearts!

स्प्रिंग ब्रेक आमच्याघरी दीड आठवडा चालला. प्रवास झाला, snow tubing झालं, बर्फाच्या पाण्यात खेळून झालं, zoo मधल्या प्राण्यांना भेट देऊन झाली, potty training झालं, सर्दी खोकला येऊन गेला,( पिल्लामुळे आईला पण),अवेळी पाउस पडून गेला पण आमच्या घरात non stop गुणगुणं नाहीतर बडबड, १२ तास गुणिले १० दिवस चालूच होती. ( इरा १२ तास झोपते, निदान आत्तातरी झोपेत बोलत नाहीये.)  मी खूप आतुरतेने सोमवारी शाळा परत सुरु होण्याची आणि घरातल्या pin drop silence ची वाट बघत होते. रविवार सुट्टीचा शेवटचा दिवस, त्यामुळे ' मुलं' म्हणजे कबीर आणि मेहेर,आमच्याघरी येणार होती... त्यामुळे एकाची बडबड गुणिले ३ अशाने सुट्टीची सांगता होणार हे निश्चित होतं...
मी स्वैपाकघरात होते, इरा खिडकीला तोंड लाऊन त्यांची येण्याची वाट बघत बसली होती. त्यामुळे दार वाजायच्या आधीच निकीतने दार उघडलं. मी किचनमध्ये काम करत होते,तर मी पाठ्मोरीच असताना एक कडकडून मिठी मारण्यात आली. मग माझ्या हातात एक कागदी गिफ्ट बॅग ठेऊन, उड्या मारत, "Open it ! Open it ! I made it !" अशी सूचना करण्यात आली. मी हात धुण्याची पण उसंत नव्हती.  पेपर bag वर लिहिलं होतं, "Contain yourself". आत छान  टिशू पेपर  मध्ये गुंडाळलेली PNG गाडगीळ सराफांची लांबूळकी पेटी. त्या पेटीवर लहान- मोठे पांढरे मोती Hot Glue ने चिकटवून केलेलं छान नक्षीकाम. पेटी उघडली तर त्यात Hot glue  ला आकार देऊन केलेला  गुलाबी रंगाचा बदाम, त्यावर छानसं चंदेरी पॅालिश असलेलं एक छोटं पदक, एका नाजूक साखळी मध्ये अडकवलेलं. सोबत दोन assymetrical कानातलीएका कानात anchor आणि दुसऱ्यामध्ये निळा कुमुद असलेलं एक फुल " Because they look cool !". हे सगळं करणारा प्राणी, मेहेर, वय वर्ष ९ (sometimes going on 30, sometimes 75 and sometimes 5).  तिच्याबरोबर दुसरा प्राणी, कबीर, वय वर्ष १२, आमच्यासाठी एक नवीन Invention घेऊन आला होता, एक बॉक्स-कम-ग्लास ज्यामधून popcorn खाणं आणि कोक पिणं एकत्र करता येयील. त्याचा फोटो मात्र नाही काढता आला कारण संशोधन आजून चालू आहे आणि Product trials इत्यादी अजून व्हायचे आहेत. दोघांनी एकाच वेळी ," do you like it?" चा गजर सुरु केला, पण मी इतकी सुखावले होते की 'मुलांना' ओल्या पापण्यांनी " छान आहे!" एवढंच म्हणू शकले...


कबीर आणि मेहेर, निकीत आणि माझं लग्न व्हायच्या आधीपासून आमच्या आयुष्यात आले आणि आम्ही त्यांना आपसूक 'मुलं' असं म्हणायला लागलो. खरं, माझ्या मोठ्या बहिणीची मुलं, पण मी निकीत बरोबर आहे म्हणून ती मला accept करतात. घरी गेल्यावर , दारात एकटीच उभी असेन तर मुलं सरळ मला ढकलून बाहेर पळत  जातात त्याला भेटायला. इराच्या जन्मानंतर निकीत आणि इरा पहिलं स्थान आणि मी अजूनही afterthought आहे त्यांच्यासाठी. Hero and his sidekick असं म्हणू काहीसं. अलीकडे मी ह्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यामुळे मला जुजबी मिठी मारतात किंवा इराला डोक्यावर थोपटावं तसं मला 'उगी ,उगी ' म्हणून पळून जातात. मी एकटीच गेले तर निकीत आणि इरा कुठे आहेत आणि कधी येणार ह्या प्रश्नांची त्यांना पटतील अशी उत्तरं द्यावी लागतात. मला हे मनाला खूप बोचतं. ह्या दोघांचे लहान असताना diaper मी बदलले आहेत, २-३ आठवड्याचे असतांना त्यांची नखं कापली आहेत,शेंबूड पुसला आहे, गोष्टी सांगत भरवलं आहे, कधी थोपटून झोपवण्याचा प्रयत्न केला आहे, माझे भारतीय इंग्रजी उच्चार कसे चुकीचे आहेत हे समजावून घेतलंय,अनेक अनेक दिव्य पार पाडली आहेत त्यांचा स्नेह मिळवण्याकरता. त्यामुळे निकीतकडे त्यांची ओढ जास्त आहे  हे मनाला खुपतं, पण hero worship चा रोख असा ठरवून कुठे बदलता येतो का ? त्यामुळे मी पण status quo acceptकेला आहे. पण मुलं खूप unpredictable असतात.  अचानकअपेक्षा नसतांना त्यांचा spotlight माझ्याकडे वळतो आणि त्यांच्या मायेचा वर्षाव माझ्यावर होतो तेव्हा मन इतकं सुखावतं, नव्याने  त्यांच्या प्रेमात पडतं.. 
इतक्या गोंडस रुपड्याची, हाताने बनवलेली, मोहरणाऱ्या कल्पकतेने अलंकृत केलेली ही भेट, मला एखाद्या ‘खऱ्या’ दागीन्यापेक्षा अधिक मौल्यवान वाटली. पुढे चार पाच तास मी हवेत होते....माझ्या ह्या euphoriaमुळेच मला एक साक्षात्कार घडला..
संध्याकाळी आम्ही तिघंच, मी, कबीर आणि मेहेर एका टेकाड्यावर wildflowers बघत चाललो होतो. चालता चालता आकाशी रंगाची,नाजूक देठाची, अनेक चिमुकल्या फुलांच्या एक गुच्छ म्हणजे एक डेरेदार मोठं फुल, अशा एका अनामिक फुलाने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांची पळापळ सुरु झाली की कोण आईसाठी सगळ्यात मोठं , जास्त डेरेदार फुल तोडतय. मी म्हटलं, “I wish someone was picking a flower for me....” उत्तर आलं, “Duh! you can pick one for yourself!” Translated to mean in Adult parlance, “ आई इथे नाहीये, पण तू आहेस तर मग तू स्वतःसाठी स्वतःच फुलं तोड, इतर कुणाची वाट कशाला बघतेस?” मुलांचा भाबडेपणा काही वेळा आपल्याला बोचू शकतो, पण त्याचा नीट विचार केला तर लक्षात येतं की काही सत्य आपल्या हातून आपण ‘मोठं’ होत असतांना निसटलेली असतात. मोठं झाल्यावर आपण उगाच नसत्या obligations इत्यादी मध्ये अडकतो,social niceties वगैरेचा विचार करतो. मुलांच्या उत्तराचं मला हसू आलं आणि खरच स्वतःसाठी फुलं शोधायला लागले.मी मागितलं म्हणून माझ्यासाठी नंतरही त्यांनी फुलं तोडली नाहीत, पण मला आवडलेल्या फुलाचं रोपटं मी मुळापासून काढून घेऊन घरी कुंडीत लावावं अशी सूचना करून झाली. मी सांगितलं की “ wildflowers कुंडीत नाही लावता येत.” त्यावर मग प्रश्नांची रांग लागली...
रात्री मुलं, ताई-सरब बरोबर त्यांच्या घरी गेली तरी मी खूप वेळ आमच्या संभाषणाचा विचार करत राहिले. आपली ही मुलं, आपली असून, आपली नसलेली. त्यांना दररोजची शिस्त, त्यांची भुणभुण, पिरपिर, टूमणी, डोक्यातले स्क्रू पडल्यासारखे वेडंवाकडं वागणं काहीही आपल्याला भोगायला लागत नाही.ह्या सगळ्यावर फक्त त्यांच्या आई वडिलांचा जन्मसिद्ध हक्क असतो. आपल्या वाटेला त्यांचं गुणी, बहुतांश चांगलं, डोक्यातले सगळे स्क्रू जागच्याजागी फीट झालेले असतांनाचं वागणं येतं, त्यांच्या स्वप्नांचे पाढे कधी ऐकायला मिळतात, कधी मोठ्या आवाजातल्या कुजबुज्ण्यात त्यांची ‘secrets’ आपल्याला सोपवण्यात येतात, त्यांच्यातल्या सुप्तगुणांचं बहरणं आपल्याला अनुभवता येतं...आपण फारशी मेह्नात न करता ही मुलं अत्तरदाणीतलं अत्तर शिंपडावं तसं आपल्यावर प्रेम शिंपडतात- पण तेही दररोज आपल्या वाटेला येत नाही. seasonal असतं. त्या टेकड्यावरच्या wildflowers सारखंच. कुंडीत लाऊन दररोज पाणी घालून नाही बहरत ती, उंच झाडांच्या सावलीत, भरपूर थंडी पावसानंतर, डोंगर उतारांवर, मुक्तपणे वाढत बहरत असतात ती..आपल्याला फक्त तिथपर्यंत जाऊन पोचायला लागतं...

Saturday, March 31, 2018

A wishing Tree


इराच्या शाळेच्या मार्गावर, एका कोपऱ्यावर, छान पांढऱ्याशुभ्र, लाल कौलांच्या ( Spanish Revival style Bunglow) घरासमोर हे लिंबाचे  झाड आहे. झाडाच्या बुंध्याशी लावलेली, हलकेच डोकावणारी  छोटीशी पांढरी टाईल,  त्यावर नाजूक पण asymmetrical हस्ताक्षरात लिहिलं आहे, "Make a wish".पहिल्यांदा झाड पाहिलं तेव्हा वाटलं आपण पण लिहून, वाऱ्यावर फडफडणारी एखादी चिठ्ठी टांगावी त्या झाडावर..पण असा विचार येताच, लक्षात आलं की सगळे कागद एकसंध आकाराचे, पांढऱ्या शुभ्र कागदाचे तुकडे आहेत. झाडावर टांगायला वापरलेली दोरी /सुतळी/स्ट्रिंग ही पण एकाच प्रकारातली वाटली... भारतात मंदिराच्या आवारात, एखाद्या दर्ग्याबाहेर अशा मनोभावना व्यक्त करणाऱ्या, चिठ्या नाही पण लाल किंवा पिवळे गंडे , ताईत किंवा तत्सम गोष्टी गाठी मारून बांधलेल्या  मला आठवलं. लाल किंवा पिवळा रंग डोळ्यात भरत नव्हता , पण लिंबाच्या गडद हिरव्या पानांमधून डोकावणाऱ्या चिठ्ठ्या; त्या झाडाला एक स्वतःची अशी symmetry होती, ती मला भावली.
 खरंतर ऑक्टोबर २०१७ पासून, आठवड्यातले चार दिवस, जाऊन येऊन, असे आठ वेळा मी त्या झाडाजवळून  चालत जाते. बरेचदा मनात येऊन गेलं आहे की त्यातली एखादी तरी चिठ्ठी वाचावी. पण  वाचता येतील अशा उंचीवर नाहीत, थोडेसे पाय उंचावून सगळ्यात तळातल्या चीठ्ठीतली एखादी  वाचता येईल. पण मग मी ते वाचते आहे हे इतरांना पण कळेल ( त्या घरातल्या, रस्त्यावरून चालत जाणाऱ्या इतरांना.) " कुणा एका अनोळखी व्यक्तीने व्यक्त केलेली इच्छा वाचणारी वेडी बाई .." असं नको कुणाला वाटायला.. शिवाय एखादी इच्छा वाचली की मग ती पूर्ण झाली का नाही हा अजून एक विचार चिडवत राहणार. त्यामुळे हा मोह टाळला आहे. पण गेल्या काही महिन्यांच्या नजरभेटीत, मला लक्षात आलय कि प्रथमदर्शनी, एकसंध वाटणाऱ्या,  एकाच  आकाराच्या पांढऱ्या कागदाच्या चिठ्या; उन, पाउस , वाऱ्याने वेगवेगळ्या पद्धतीने विरल्या आहेत. काही जुन्या आहेत, काही नवीन आहेत, काही चीठ्यांचे रंग बदलले आहेत , काही जीर्ण झाल्या आहेत. काहींना पिवळी झाक आली आहे काहींना ओल लागून राखाडी रंगाची fungus ची छटा चढली आहे... आणि तरीही ते लिंबाचे झाड चहू बाजूंनी, छान टवटवीत वाढतंय, बहरतय....
यंदा पाउस उशिरा आला आमच्याकडे. ह्या पावसानंतर त्या लिंबाच्या फुलांचा घम घामाट पसरतो.. एकदा पावसात, तो सुवास भरून घेऊन ह्या झाडाकडे पाहिलं आणि लिंबाचा बहर, अस्फुट कळ्या, येऊ घातलेली एवूलीशी लिंबं, आणि त्या चिठ्या , सगळ्यांवरून एकाच वेळी पाण्याचे थेंब ओघळून, हळूच खाली मातीवर पडून झिरपून, गुडूप होत होते... ते गुडूप होणारं पाणी पाहत असताना वाटलं, झाड काहीतरी महत्वाचं सांगू पाहतंय, पण तेव्हा ते दृश्य सोडून मनात इतर काही झिरपलं नाही ...
काल इराला घेऊन परत येताना , झाडाकडे पाहिलं आणि  रस्त्यालगतच्या एका फांदीवर एका पिवळ्या post it note वर नजर पडली. लिंबाची symmetry भंगवणारा तो पिवळा चौकोनी चिटोरा डोळ्यात खुपला. तो काढून टाकणं माझ्याने शक्य नव्हतं, कारण तो बरच उंच होता. पण मी चालता चालता थांबले, कंबरेवर हात ठेऊन त्या post it कडे बघत राहिले.." ही वेडी बाई काय बघते आहे निरखून?" असा प्रश्न इरा आणि येणाऱ्या जाणार्यांना पडावा इतका वेळ निश्चित थांबले असेन....इतका वेळ बारीक डोळे करून निरखून बघितल्यामुळे ते अस्पष्टसं  लिहिलेलं वाचता आलं. डोळ्यात तरंगणाऱ्या पाण्यातून पुन्हा वाचलं,  "Not much I am thankful for.You are a beautiful tree, wish there were more people like you ..."  तेव्हा पावसात जे झिरपलं नव्हतं,ते डोळ्यात तरळलं...
कुणा कुणाच्या, किती आणि काय काय इच्छा असतील अशा तिथे टांगलेल्या, अनोळखी लोकांना साद घालणाऱ्या, वार्याशी  झाडापेक्षा वेगळंच , स्वतःच्या मनातलं गुजगीत गुणगुणाऱ्या,  उन्हाने /पाण्याने शाई पुसून कोरी पानं राहून, अपूर्ण, अतृप्त राहिलेल्या अनेक इच्छा, स्वतःच्या देहावर वागवत, त्याचा भार न घेता,  मोठं होणारं, बहरणारं, समृद्ध झाड.... हे जमलं पाहिजे , असं स्वच्छंद जगणं, स्वतः फुलत ,समृद्ध होत राहणं... बाकी ह्या Wish tree वर कितीही प्रेम जडलं असलं तरी चिठी लिहिण्यापेक्षा ते त्याच्या भाषेत व्यक्त होतं तसं मी माझ्या पद्धतीने व्यक्त होणं ..हेच योग्य नाही का ?




Tuesday, February 27, 2018

मैत्री आणि खास पदार्थ , एक स्वतः गुंफत राहणारं वर्तुळ ....

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खास मित्र मैत्रिणी असतात, त्यांच्याच बरोबर टपरीवरचा cutting चहा, भेळ, वडा पाव, चिंचा-बोरं, पेरू, बॉब्या, आणि काय काय शेलकं शेलकं आपण share केलेलं असतं; त्यांच्याच हातचा भाजणीचा वडा, pineapple and cheese stick, मउ तूप मेतकुट भात, हॉस्टेलच्या hot plate वरची भाकरी,  आपल्या मनाच्या खाबू कप्प्यात, आई आज्जी,भावंडांच्या हातच्या चवीबरोबर रेंगाळत राहिलेली असते..... आपल्या मैत्रीचा तो एक महत्वाचा नाजूक कोपरा असतो, मनात अनेक डेबिट क्रेडिटची पासबुकं अशा मित्रांबरोबर आपण अनेक वर्ष भरत राहतो... 
माझ्या बाबतीत अशी अनेक समीकरणं आहेत. पण आज एका खास मैत्रीणीसाठी, खास मैत्री बद्दल लिहिते आहे. फोटोमध्ये छान ओला खजूर, काजू आणि बदामाचा लाडू आहे. तो खाऊन तोंड गोड करा, मन भरून माझ्या मैत्रीणीला आशीर्वाद द्या - तिला मुलगा झालाय !  
मैत्रिणीला, "डोहाळजेवण कधी करूया?"  असं विचारायला फोन केला असता, बातमी कळली की पोटातलं पिल्लू फार impatient आहे, चार आठवडे लवकरच बाहेर आलंय. आई अजून अमेरिकेत पोचलेली नाही. असं कळल्यावर ह्या रविवारीची सकाळ स्वैपाकघरात घालवली आणि डब्बा पाठवला. Delivery नंतर, मैत्रिणीच्या पोटात गेलेलं हे घरचं, पहिलं जेवण. त्याला तिच्या आईच्या हातची सर नाही...पण अपार माया आणि वर म्हटलं न तसं हे आमच्या नात्याचं एक स्वतः गुंफत जाणारं वर्तुळ...

(पालक बटाटा भाजी, केलची भाजी, मुगाची डाळ- लसूण-लाल मिरची-आणि खोबऱ्याचे दूध घातलेली मेथीची भाजी, जवस- तीळ- दाणे-आमसूल- कढीपत्ता ह्याची चटणी, डाळ मेथी, ज्वारीच्या लाह्या, ओला खजूर-काजू-बदाम ह्याचे लाडू, हिंग-मिरं-जिरं घालून शिजवलेला भात)

आता थोडा flashback....
२००९ -खरंतर ती माझ्या नवऱ्याची मैत्रीण. पण माझ्या एका प्रयोगासाठी गाणं गाण्याच्या निमित्ताने मी तिला चोरलं..:) ती New York मध्ये राहत होती, मी कॅलिफोर्निया मध्ये. ती बंगाली आणि मी तिच्याकडून मराठीतलं ठसठशीत गाणं गाऊन घेत होते. पण ती, ळ, ख, ण, सगळं शिकली, माझ्या त्या एका गाण्यासाठी. गाण्याच्या निम्मिताने अनेक आवडी निवडींची विचारपूस झाली, अर्थातच स्वैपाक आणि खाद्य संस्कृतीबद्दल. ती मासाहारी आणि मी शुद्ध शाकाहारी, ती गोडखाऊ आणि मी चटक मटक आवडणारी. पण cooking from scratch हे दोघींच्या जिव्हाळ्याचे विषय. एक अनामिक दुआ होता आम्हाला गुंफून ठेवणारा. वर्षातून आमची भेट एक दोनदाच होते - पण अनेक भेटींचं समाधान देणारं सुख आमच्या त्या भेटींमधून आम्हाला मिळून जातं. Fast Forward to 20१0-११
तिने निवडलेला जोडीदार -आमच्याजवळच कॅलीफोर्निया मध्ये राहत होता. तो पण आमचा मित्रच होता. त्यांचा लग्न करण्याचा निर्णय दोन्ही घरांमध्ये मान्य नव्हता. Vicky Donor मध्ये दाखवलंय न अगदी same to same तसं...ती बंगाली आणि तो नॉर्थ इंडियन! (बनिया, जाट, पंजाबी, काश्मिरी, बिहारी सगळे सरधोपट नॉर्थ इंडिअन ह्या category मध्ये ढकलले जातात.) तिच्या आई बाबांची आणि मित्राची पहिली भेट आमच्या घरी घडवायची अशी काहीतरी परिस्थिती निर्माण झाली. मला प्रचंड tension- आधीच घरून विरोध, त्यात निकीत आणि माझ्याकडून काही चुकीचं बोललं, वागलं गेलं तर? आमच्या दोघांची तिशीही न उलटलेली, हे असलं बोलणी इत्यादी formal गोष्टींची काहीच सवय नाही, आणि अनुभव असता तरी सगळं असं भास्वयचं होतं की भेट न ठरवता, अचानकच घडली आहे ! मुलगा पण आपला, मुलगी पण आपली, उत्तर भारतात किंवा बंगाली कुटुंबात कांदा पोहे कार्यक्रम असतो का नाही हे पण माहित नाही, पण तरीही कांदा पोहे करणं म्हणजे अगदीच obvious ! म्हणून खास महाराष्ट्रीयन असा दडपे पोहे आणि गवती चहा घातलेला चहा असा बेत ठरवला, शेवयांची खीर काही चांगलं घडल्यास गोडघास म्हणून नंतर, "I Forgot dessert!" असं म्हणून Vanilla Ice cream बरोबर serve करायचं ठरलं. (२०१०-११ साली मला  फक्त तीनच गोडाचे पदार्थ करता येत होते, शिरा, खीर आणि गुळ पोळी.)
 मोठ्या भावंडांची भूमिका स्वीकारून आम्ही घराचा set लाऊन ठेवला, निकीत ने घरातली पेटी / Harmonium अगदी दररोज पॉलिश करतो असं वाटावं इतकी लखलखीत करून भारतीय बैठकीसमोर आणून ठेवली.  आमची मैत्रीण आणि तिचे आई वडील घरी आल्यावर ताजी चरचरीत फोडणी (!)करायची एवढंच काय ते बाकी होतं. मैत्रीण आणि तिचे आई बाबा - छान दार्जीलिंग, असाम आणि चीटागाँग मधल्या तीन वेगवेगळ्या चहाpowder असलेल्या  jute चा अत्यंत देखणा, दिमाखदार box आमच्यासाठी घेऊन आले होते. आल्या आल्या चहा झाला. गवती चहाच्या चवीचे विश्लेषण झालं, तो चहा एखाद्या gourmet पदार्थ असल्यासारखा त्याचा आस्वाद घेऊन झाला, थोड्या वेळाने अजून घेण्याचा संकेत पण मिळाला. बंगाली माणसांना, मराठीमाणसाइतकीच, नाटक, संगीत, साहित्य, एकंदरीतच कलाक्षेत्राविषयी अत्यंत आत्मीयता आहे, तशीच आणि तितकीच चहा बद्दल आहे. चहा झाल्यावर मनोरंजनाचा कार्यक्रम सुरु झाला.पेटीवर रवींद्रसंगीत आणि दिनाथ मंगेशकरांच्या चाली वाजू लागल्या, आमच्या त्या छोट्याश्या ४०० स्क़्वेरफुटाच्या स्टुडंट हौसिंग मधल्या घरात मधुर बंगाली आणि धारदार मराठी स्वर फेर धरायला लागले... आई -वडिलांची जरा चुळबुळ सुरु झाल्यावर मी उरलेला'स्वैपाक' करायला उठले. काकडी,टोमॅटो , कांदा, पातळ पोह्यात मिसळून मी त्याच्यावर चवीनुसार मीठ साखर घातली आणि लिंबू पिळलं. तेलात मुठभर दाणे परतायला टाकले, तोपर्यंत मैत्रीण आणि तिची आई आमच्या त्या ईवलूष्या, एका वेळेला एकच माणूस उभा राहू शकेल अशा स्वैपाकघरात येऊन ही फोडणी बघायला लागल्या. मग काय ? तेल पटकन तापलं, त्यात चार बोटं डाळं, मोहरी, जिरं, हिंग, हळद, मिरचीचे काप, आणि कढीलिंबाची पानं घातली. पानं मस्त चरचरली आणि घराची बेल वाजली.....Future जावईबापू हजर ! आमच्यासाठी wine आणि chocolates घेऊन दारात उभे!  पुढचे २ मिनिटं आमच्या घरात pin drop silence. एकमेकांकडे सगळेच डोळ्याच्या कोपऱ्यातून बघतायत... त्यावेळात फोडणीचा वास आमच्याभवती दरवळत होता.. मैत्रिणीच्या आईने विचारलं, "So is the Poha ready?"  आणि मग शांतता भंगली... भारत- अमेरिका  राजकीय विषयांवर चर्चा करता करता पुरुषांनी पोह्यांचा आस्वाद घेतला.. बंगाली मायलेकींनी - पाककृती, विचारून , त्यांच्या "झाल मुरी" ची आठवण काढली.... काही वेळाने खीर पण fridge मधून बाहेर आली, गरम झाली, आणि त्यावर ice cream वितळलं, आम्ही सगळेच सैलावलो.... पण ही भेट म्हणजे फक्त पाहिलं पाउल होतं, नंतर एक वर्ष गेलं त्यांचं लग्न व्हायला... 
Back to present Day: So, अशी ती लग्नासाठीची पहिली भेट माझ्या हातच्या पोहे आणि खीरीने सजली, तशीच आजीच्या हातची चव पोचायच्या आधी माझ्या जेवणाची चव त्यांच्या छकुल्याच्या पोटी पोचली. हे योग असेच जुळून येतात. ठरवून, planning ने नाही जमत.  काहीच लोकांबरोबर का जुळून येतात?
अशा घेण्या देण्यात खूप तृप्तता आहे, नात्यातले ऋणानुबंध घट्ट होत अस्तातच आणि ही स्वतः गुंफत राहणारी मायेची, मैत्रीची वर्तुळं अनंत विणली जात असतात....

Tuesday, February 20, 2018

Heirloom Seeds

पाच सहा वर्षाची असताना, दिवाळीच्या किल्ल्यावर शेताचा देखावा करण्यासाठी,  मी आळीवाच्या बिया पेरल्या होत्या. दर चार तासांनी, "त्याला कोंब आला आहे का?"  नसेल तर अजून पाणी शिंपड, असं करत करत त्या बियांना कोंब फुटून त्याचं  चांगलं इंच -दीड इंचाचे रोप होण्याची प्रक्रिया,  मी पहिल्यांदा अनुभवली आणि ती अंगात भिनली.  वाड्यात घराच्या बाहेर अगदी छोटीशी २ बाय ६ एवढीच जागा असेल, पण आम्ही तिन्ही भावंडं त्यामध्ये शेती करायचो, पिकं असायची कोथिंबीर, मेथी, मोहरी, पुदिना, मिरची.  अर्थात आमचं बियाणं घरातल्या मसाल्याच्या डब्यातून यायचं. धणे, मोहरी, मेथी दाणे पाण्यात भिजवून मग मातीत पेरायचे. आणलेल्या पुदिन्याच्या काड्या आणि लालसर किंवा मउ झालेली मिरची मातीतच खुर्डायची. तिघांपैकी कुणी अगदी व्यवस्थित आळं करून , समान अंतर ठेऊन बियाणं पेरायचं, कुणी बियाण पडेल तिकडे भिरकवायच. प्रत्येकाच्या आळ्याच्या हद्दी झाडूच्या काडीने आखलेल्या असायच्या. कुणाच्या हाताला किती गुण आहे हे पाहण्याची शर्यत असायची. कधी आमच्या ह्या शेतीसाठी विशेष खत आणल्याचं आठवत नाही, पण येणाऱ्या कोवळ्या पालवीचा आमच्यासकट घरातल्या सगळ्या वडीलधारी माणसांना अप्रुप असायचं.
ह्या शेतीबद्दलची एक अतिशय महत्वाची आठवण म्हणजे  भावाने केलेले आंब्याचे रोप.  रत्नागिरीहून आलेल्या खास आंब्याच्या पेटीतल्या आंब्याचे कलम करण्याचा, मोठ्या भावाचा आणि बहिणीचा प्रयत्न मला आजही आठवतो. प्लास्टिकच्या पिशवीत माती आणि थोडं शेणखत घेऊन त्यामध्ये तीन चार कोई पुरल्या होत्या. त्यातून एका कोईला अंकुर फुटला आणि त्यातून उभारलेलं डौलदार रोपटं वाड्यातल्या सगळ्या मित्र -मैत्रिणींमध्ये  चर्चेचा विषय बनलं होतं. आंब्याचं झाड चांगलं चार फुट उंच वाढून त्याला पहिला मोहोर आला होता हेही मला आठवतंय. अशा मोहोर आलेल्या झाडाच्या बुंध्यात डांबर घालून ते झाड आमच्या घर मालकांनी मारून टाकलं होतं. कारण दिलं होतं, " मुळं खोल जातात, घराजवळ लावलंय, पुढे भिंतीना त्रास होईल.." भाऊ रडला नाही, पण त्याचा लालबुंद चेहरा आणि मनात धुसफुस्णारा राग, आवेग आजही मला स्पष्ट आठवतोय. आई वडील चिडले होते, मालक आणि आजोबांमध्ये काही शब्दिक देवाणघेवाण झाली पण गळलेला मोहोर, आंब्याचं झाड परत जिवंत होणार नव्हतं. वाड्यातल्या काही काकू आणि आईची चर्चा पुसटशी कानावर पडली होती.. " रोपटीसुद्धा शाप देतात हे कळेल न तेव्हा ....." 
अजाणत्या वयात आम्ही  जशी बियांची गुपितं उलगडत होतो, त्यांच्या अंकुरण्याच्या कथा बनवत होतो तसच त्यांची एक नियती असते, त्यांच्या यक्षकथांसारख्या शापित कथा असतात हे पण उलगडत होतं.  " झाडावरून फुलं /फळं तोडताना झाडाला वेदना होतात का?" , " झाडाशी बोलल्यावर त्यांना आपल्या स्वरातले चढाव उतार कळतात का ?" " एका प्रकारचं एकच रोपटं लाऊ नये , त्याला सोबत म्हणून दुसरं का लावायचं ?" " झाडं संगीत ऐकून लवकर वाढतात ?"" फळ बागेत कीड लागली आणि पसरली तर शेतकरी काय करतो?" " तंबाखू लाऊन त्याचं रोपच जळलं तर ?"  आमचे घरगुती बागकामातले  प्रयोग जसे वाढत गेले तसेच आमचे प्रश्नही बदलत, विस्तारत गेले.  
आजही आम्ही तिघंही भावंडं , आप आपल्या घरी जमेल तेवढी 'शेती' करतो. मैलोन्मैल लांब राहूनही, एकमेकांच्या बागेचा आस्वाद त्या बागेची चौकशी, त्यातून बनवलेल्या पदार्थांची चव ह्या विषयी चर्चा करून सुख मानतो.Nursery मधून फार तर फार फुलझाडांची रोपटी आणायची , खाण्याची रोपटी अजूनही घरात येणाऱ्या जिन्नसामधूनच तयार होतात. भावाने बंगलोरच्या गच्चीत गांडूळ खताचे vermi compost बिन ठेवलं होतं.  त्या खतात  टाकलेल्या डाळिंब आणि सीताफळाच्या बियांमधून डाळिंब आणि सीताफळाची रोपटी उगवली, आणि मग झाडावरची डाळिंबं आणि सीताफळं खायला त्यांच्या गच्चीत माकडं यायला लागली ! 

पण तितकीच गमतीची गोष्ट म्हणजे अमेरिकेत माझ्या घरी धणे पेरून कोथिंबीर येई ना, मिरचीची रोपटी मिरची खुडून तयार होईनात, मेथीच्या दाण्यांची आलेली हिरवी पानं तरारून फुलेनात.  मसाल्याच्या डब्यातली बियाणं आता  Hybrid, Radiation,GMO आणि असल्याशा उत्पादन प्रक्रियेत अडकली होती ! 'Organic' मसाले आणून  मग त्याची रोपटी करण्यापेक्षा मी organic बियाणं आणुयात असा विचार केला.. तेव्हा २०१० साली कॅलिफोर्निया मध्ये , घरी "container garden" साठी बियाणं खरेदी करायला गेले आणि " Heirloom seeds" असे शब्द पहिल्यांदा कानावर पडले. Heirloom हा शब्द तत्पूर्वी मी पिढीपरंपरागत चालत आलेला दागिना, शालू, एखादा दुर्मिळ ऐवज, एखादा रिवाज, अशा संदर्भात ऐकला होता. तो बियाणं ह्या  शब्दाला जोडला जाणं , ह्या संकल्पनेच्याच मी प्रेमात पडले... इंटरनेट वर ह्याबद्दल बरीच माहिती होतीच. ह्या प्रकारच्या झाडांचे , रोपांचे open pollination म्हणजे वारा, मधमाशा, फुलपाखरं, पक्षी ह्यामुळेच परागण होते. आणि त्याच रोपट्यावर पुढच्या seasonच्या बिया आपल्याला मिळतात.  पण नक्की कुठल्या बियांण्याला  heirloom म्हणायचं ह्या बद्दल पण वेग वेगळी मतं आहेत जी त्याच्या मुळ उत्पत्ती किंवा लागवड कधीपासून सुरु झाली त्या काळावर अवलंबून आहेत.  काहींचं मत शंभर वर्षापूर्वी उत्पत्ती झालेल्या जाती, किंवा पन्नास वर्षापूर्वी लागवड होत असलेल्या किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी म्हणजे १९४५  सालच्या आधी लागवड होत असणाऱ्या जाती, ह्यांना 'अरलूम' म्हणायचं ,असे काहीसे अलिखित आणि बहुचर्चित नियम आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर खत आणि बियाणी विकणाऱ्या कंपनी ह्यांनी hybrid बियांणी जोमाने विकायला सुरुवात केली आणि मग प्रत्येक अंगणात, गावात, शेतात, फळबागेत विविधता अंकुरण्याऐवजी , जे दिसायला , टिकायला , truck मध्ये प्रवास करून सहा सात  दिवसांनी मंडईत विकायला ठेवल्यावर, ताजं आणि टिकाऊ असेल, त्याच जातीची बियाणी उत्पादन करण्यावर भर देण्यात आला आणि तीच खपायला लागली.  Survival of the fittest!  नाजूक साजूक जाती ह्या कंपन्यांनी डांबर घालून मारल्या? असं म्हणयचं का ?  खरं hybrid बियाणी नसती , औद्योगिक प्रमाणात प्रचंड उत्पादन करायचं नसतं , केलं नसतं तर आजची खाद्य संस्कृती वेगळी असती का ? हा त्यात लपलेला पण महत्वाचा विषय वाटतो. पण इतिहास बदलता येत नाही, शेख चिल्ली स्वप्न मात्र रंगवण्यात काहीच पैसे खर्च होत नाहीत. आज अस्तित्वात असलेल्या अनेक heirloom seeds, ह्या पिढीजात परंपरेने साठवलेल्या, कुणी मायदेश सोडून जाताना बरोबर घेऊन आलेल्या, कुणी पोरांसाठी मुबलक प्रमाणात परसात वाढवलेल्या, स्वतःचा स्वतंत्र असा इतिहास असलेल्या, त्या इतिहासाचे जतन करणारे, रक्षक असलेले, मालमत्ता  लाभलेल्या त्या समृद्ध जीवनसत्वाच्या बिया  आहेत. एक नमुना म्हणून ही लिंक जोडते: आहे.  https://www.gardenbetty.com/the-stories-behind-heirloom-seeds/
  
अशा बियाण्यांची ,  heirloom seeds and their recipes अशी कथा मालिका माळणं किती romantic आणि adventurous  असेल  असा साहसी विचार पण येऊन गेला. 
भारतातला इतिहास ह्यापेक्षा खूप वेगळा असेल असं वाटत नाही. माझ्या लहानपणी घरात  कढीपत्ता असेल तर दारातून आत शिरल्या शिरल्या त्याचा घमघामाट दरवळत असे. आजोबांना आमटीच्या फोडणीत ५-६ पानापेक्षा जास्त पानं घातलेली चालत नसत.. आता अमेरिकेतला सोडाच पण पुण्यात सुद्धा कढीपत्त्याची फोडणी करताना - " आजकाल चांगला कढीपत्ता मिळत नाही .." हे मी अनेकदा ऐकलं आहे.  कढीपत्त्याची Hybrid जात ? 
दिसायला देखणी, केशरी पण बेचव, तुरट 'महाबळेश्वरी' गाजरं? ओबडधोबड, लांबुळकी पण गोड गाजरं? ती जात लुप्त? उग्र पण स्वतःचा ठसका असलेली ढब्बू मिरची ? गुलाबी गर असलेला, बिन बियांचा पेरू? 
स्वीट corn चं आगमन व्हायच्या आधी असलेली ' गावरान' कणसं ?
बोरं? पिठूळ जांभळं? खरीखुरी सोनकेळी? सगळंच लुप्त ? का साठवल्या असतील कुणी त्याच्या बिया, ठेवल्या असतील हातच्या राखलेल्या? 
" सत्तर आणि ऐशीच्या दशकात हायब्रीडजायशेन  मुळे गव्हाचे स्वरूप बदललं. दाणा अधिक छोटा  आणि अधिक पुष्ट झाला आणि त्यात ग्लायडीनचे  प्रमाण वाढले.  आज जो गहू आपण खातो तो शंभर वर्षांपूर्वी आपले आजी आजोबा खायचे त्यासारखा अजिबात नाहीये...." असे cardiologist विल्लीयम डेविस त्यांच्या " व्हीट बेली" ह्या पुस्तकात सांगतात... 
असं अभ्यास करायला लागलं तर डोक्यात काहूर माजण्याइतकं काय काय ज्ञान हाती लागू शकतं. लक्षात येतं की आपण आज जे खातो, त्याच्या उत्पादन प्रक्रियेमुळे, त्यातले मूळ घटक, पौष्टिकता बदलली आहे, बदलत राहणार आहे. पण निराश होण्यात काहीच अर्थ नाहीये.  सद्य परीस्थित आपण बरचं करू शकतो. धान्य, बियाणं ह्याबद्दल मुळात चीक्त्सक बनू शकतो. आपल्या शेतकऱ्यांना सुजाण आणि संवेदनशील नागरिकांचा पाठींबा मिळाला तर त्यांच्या पुढचे पर्याय बदलतील का? पिढीजात बियाणे वापरून मिळणारे उत्पन्न हायब्रीड उत्पादनापेक्षा  कमी असेल पण ते एक परंपरा, आणि विविधता जपणारे असेल. भारतात असे उपक्रम राबवणाऱ्या अनेक संस्था आहेतच- त्यातली एक उधारण म्हणून तमिळ नाडू मधली ही संस्था :  https://manvasanai.in/about/. घरात फुल झाडं लावताना, container gardening करताना अशी एरलुम बियाणी निश्चितच आपण वापरू शकतो...

पण सगळ्यात महत्वाचे काम, जे करायला आपल्याला घराबाहेर पडणं गरजेचं नाही , बसल्या जागी आणि मनोमन , सगळी सकारात्मक शक्ती वापरून आपण आपल्या शेतकऱ्याला दुआ देऊ शकतो... घरातल्या कुंडीत २ - ३ महिने एक फळ झाड लाऊन  त्याची काळजी घेतली तरी प्रत्येकाला शेतकर्याचे दुख, त्याचा आनंद आणि त्याच्या समोरची आव्हानं ह्याची जाणीव होईल. शेतीच्या  प्रांगणात किती बदल झाले,  शिवाय हवामान, राजकीय धोरणं, बीयाणी कंपन्यांची धोरणं हे सगळं शेतकर्याने पेललं आहेच.  पण शेतात पिकणाऱ्या धान्यातला बदल, पिढीजात परंपरेचा बदलेला प्रवाह, त्याला दुखणारं खुपणारं असेलच खूप.... आपल्या घरातल्या आई- आज्जीने परंपरागत दिलेल्या सगळ्या रुचकर, सुगरण पाककृती आपण पानात मांडतो ते त्या शेतकऱ्याच्या जीवावरच ! खरा " अन्न दाता " तोच , म्हणून एक परोपकाराचं बीज आज आपण पेरूया !



When I was five –six years old, I remember constructing a fort for Diwali and sowing a few Halim seeds to recreate a realistic green field. Every four hours, I would check if the seeds had germinated, if there was no sign of germination I would sprinkle some water on the fort.  I observed this process of germination to the one-and half inch of Halim plant growth and then I was hooked to the whole process of cultivation, of growing plants..  We had a small patch of land, not more than 2 feet by 6 feet in front of our house in a Wada. But in this tiny space me and my siblings enjoyed planting and cultivating a field of Fenugreek, Cilantro, mint, Mustard, chilies’. Our seeds were not sourced from packets or nurseries but from the humble Masala Dabba from the kitchen. Mustard, coriander and fenugreek seeds were soaked in water and then planted; mint stems left after the leaves were plucked off were cut into smaller stems and planted directly. Red, or moist chilies’ declared unfit for cooking were crushed directly in the soil and planted. All three of us had different ways of cultivation- someone would be neat, make defined rows and plant seeds at a distance of 6 cms, someone would believe in chance and hurl the seeds in random disarray. Our farm boundaries were well demarcated with the use of a broomstick. There was a healthy competition in observing the yield from each small plot. I don’t remember buying a special fertilizer or compost soil for our plants. It was just a piece of loose soil right next to the pathway..But all the elders in the family were appreciative of our green thumb.
I have a very distinct and coming of age kind of memory from those days of farming related to my elder brother creating a mango sapling.  Every year we would get a special delivery of Alphonso Mangoes from Ratnagiri and both my sister and elder brother had tried creating a sapling from the spent seeds. Then one fine year, they added some cow manure and soil in a plastic bag and buried the mango seeds inside the bag, one of the seeds germinated and lo and behold! The first fruit tree sapling was created! For weeks it was a matter of pride for my siblings and a subject of frequent discussions amongst the children in our Wada. I remember that the tree grew up as tall as four feet and the intoxicating smell of the first blossom. But then our homeowner had added a big pail of tar to the roots of the tree and killed it. He had stated that, “The roots grow deep. You have planted it very close to the house. It would have caused problems to the walls...”  I don’t remember my brother crying, but I remember his face red and puffy, bursting with the injustice, indignity and cruelty of the mindless act.  My parents were angry and distressed; my grandfather exchanged heated words with the homeowner. But the mango tree with its first blossom was dead, a dream beyond retrieving. I remember a conversation I had heard between a neighbor and my mother, “Plants can cast a curse too, but by the time they realize ......." 

We were young and naïve, but discovered that just like we were cooking tales of their germination, the seeds had secrets, they also had a destiny. They had the power to cast spells and lay down curses.  “ “Does the plant experience pain when we pluck fruits or flowers?” “Do Plants understand our tonality when we talk to them?” “Why can’t you plant one sapling, why does it need the company of another of its kind?”  “Do plants grow faster when they hear music?”  “If a fungus attacks an orchard what does the farmer do?”  “What If the tobacco destroys the plant, not just the fungus?"   As our gardening experiments evolved so did our questions and the depth of our concerns.  
Though the three of us now live thousands of miles apart we love to talk about, share and swap our cultivation stories. Garden nurseries are places to buy ornamental plants and flowering shrubs from, (though my sister is an exception she has grown her flower garden from seeds too) the three of take great pride in creating seedlings from the raw material we have at hand.  My brother had a vermi compost Bin in his terrace garden in Bangalore. From the pomegranate and custard cream apple seeds thrown in the vermi compost grew robust saplings. So juicy and enticing were the fruits that monkeys started raiding the garden!  
But while my brother was having great success with his ‘orchard’ my basic herb garden attempts were failing in America. The cilantro refused to germinate from the store bought coriander seeds, the fenugreek refused to grow beyond the first 2-3 leaves after germination, and chilies only rubbed off on my skin. The seeds from my Spice box/ Masala Dabba had undergone a Hybrid, Radiation, GMO kind of transformation. Instead of buying Organic spices I decided to buy organic seeds for my saplings.  It was 2010 in California when I was shopping for organic seeds for my container garden that I first heard the term “heirloom seeds.” I had always associated the word Heirloom with the most obscure antiques, jewellery, iridescent silks, or a timeless ritual passed on from one generation to another. But the association of the word Heirloom with seeds gave me the good kind of goosebumps, because there was such a lot of promise just in the word association....  There was a treasure trove of information on the internet.
This small paragraph found on Wikipedia can shed some light on the basic question of what are heirloom seeds:
“For instance, one school says the cultivar must be over 100 years old, others 50 years, and others prefer the date of 1945, which marks the end of World War II and roughly the beginning of widespread hybrid use by growers and seed companies. Many gardeners consider 1951 to be the latest year a plant could have originated and still be called an heirloom, since that year marked the widespread introduction of the first hybridvarieties. It was in the 1970s that hybrid seeds began to proliferate in the commercial seed trade. Some heirloom varieties are much older; some are apparently pre-historic.”;
So after the second world war the Seed and fertilizer companies promoted a very controlled sector of seeds, which stopped the cultivation of random or unique types of plants grown in specific gardens, village farms, orchards; instead of promoting the variety and uniqueness of different local breeds, they promoted the sale of hybridized seeds which fell in line with the plan of mass production. Only that which was hearty looking, could travel well , sustain some transition losses and still appear fesh and saleable in vegetable markets, six or seven days later- those were the hybrid seeds promoted by the seed corporations.
 It was literally the Survival of the fittest seeds!  Should we infer that the seed companies added tar to the roots of the unique ecological evolution of seed banks? I think the real question hidden behind the mechanics of what’s heirloom and what’s not is that:  If there was no hybridization, there was no pressure of mass production; would the food culture of the world have been the same as it is today? Ofcourse, we cant change the written history of the world or undo the effects and state  of things  as they exist today, but we can always spin silly scenarios; they don’t need money and they can entertain our hearts.  Almost all of the heirloom seeds as they exist today are the labor of love of a family, farsighted conservationists, carried forward by the generations of an immigrant who bought them as a memory of his /her homeland, by a mother who grew food out of the necessity to feed her hungry children, they have a history of their own, they have protectors and crusaders ready to fight for upholding this history, the heirloom seed is a tiny pod full of life and survival. As an example , I am adding a link to a website bearing stories about heirloom seeds:  https://www.gardenbetty.com/the-stories-behind-heirloom-seeds/
 When I get lost in these stories it is easier to be brave and dream of collecting/creating an anthology of short stories about heirloom seeds and their recipes.
I am sure the history of hybridization and heirloom seeds are not very different in India. I remember in my childhood, if there was a bunch of curry leaves in the house, you could smell them at the threshold. My grandfather was very strict, and he didn’t like the addition of more than 5-6 leaves to his spicy lentils. But now, forget the smell of curry leaves in America, even in Pune, “ Curry leaves don’t smell the same…” is the normal complaint in every household. Is this the result of hybridization?  
Aesthetically pleasing, bright orange in colour, carrots known as Mahabaleshwar carrots, have no taste? Where did the slightly long, uneven carrots of pure sweetness disappear?  Pungent but with a sharp taste of its own, the old bell pepper/ capsicum has been replaced with a very generic pepper. Gauvaus , seedless and pink fleshed , where did they go ?  
Where is the “country style corn” that we enjoyed before the advent of sweet corn?
Are all of these tastes and textures lost? Or have they been stored? The heirloom seeds, hidden passed on from one generation to another awaiting its comeback?  
Cardiologist William Davis, in his book “Wheat belly "  has explained that in the decades of the seventies and eighties hybridization of wheat changed the quantity of gliadin which induces, more hunger, increases sugar absorption and also has an addictive quality. The wheat we consume today is completely different than the wheat that was consumed a hundred years ago.. 
If you study the intricacies and details of the seed and grain composition available just on the internet, the possibilities are confounding and mind blowing to say the least. We realize that everything we eat today has been altered in its nutrition by the very manufacturing process it goes through. This is a very frightening reality, but its nothing to lose our heart over.  In the given scenario, we can first start by being aware of the seeds and the effects of those seed modifications.  Can being aware and supportive of the heirloom seed movement, and standing by our farmers give them an opportunity to make other choices?  The yield after using heirloom seeds can be lesser compared to hybrid crops, but their use will promote the safety of unique strains and types of grains, fruits, flowers. There are many Nonprofits in India working in this field, for reference I am adding the link of a nonprofit in Tamil Nadu   https://manvasanai.in/about/.  While planting flowering shrubs, herbs, or making container gardens we can surely use the Heirloom seeds.
But more important that all of this, something that doesn’t even require leaving the home, something which we can do right now, sitting in our place and utilizing all the positive vibes that we can muster, is to send gratitude to the farmer. As an experiment, plant a vegetable/fruit plant from seed or sapling and take care of it for 2-3 months and we will realize the highs and lows, the angst and the happiness, the challenges  that a farmer faces.  So much has changed and yet remained unchanged with farming; external factors like the weather, political lobbies and government policies, seed and fertilizer company policy, the farmer cannot escape anything at all. But he must have faced the emotional tides of transitions too, watching the grains growing in his hereditary farm change, the isolation and burden of loans, the farmer’s life really undergoes a lot of upheaval. Actually, he is the real Annadata, the food giver for all the recipes from our mother and grandmother that we cook in our kitchens.  Lets take this opportunity to plant a seed of gratitude!



Friday, February 9, 2018

वामकुक्षी

मी आणि माझा नवरा निकीत दोघंही खवैये आहोत, पण प्रवासाहून परत आलं की निकीतला वरण तूप भात मीठ लिंबू असं साधं जेवण पण परमोच्च सुख प्रदान करून जातं. बरं वरण भाताचा आस्वाद घ्यायला त्याला तोंडीलावणं  लागत नाही. मलाच लागतं ,मुलीला पण नुसता वरण भात आवडत नाही; भाजी,कोशिंबीर, लोणचं, पापड, चटणी, कढी (वरण तूप भातावर  कढी! हा तुफान चविचा पदार्थ मी अनेक वर्षात खालला नाहीये, पोस्ट लिहिता लिहिता आठवण झाली, आता पुढच्या काही दिवसात करणे अपरिहार्य आहे !). सो, असं प्रवासाहून, आठवडा -दहा दिवस बाहेर राहून घरी परतल्यावर निकीतला खुश करण्याचं काम अत्यंत सोपं आहे. आज जवळ जवळ दोन आठवड्यांनी निकीत भारतातूनच अमेरिकेत परत येत होता. भारतात त्याचं काम दिल्ली नाहीतर बंगलोरला असल्यामुळे त्याची पुण्यातली खाबुगिरी बाजूला पडते. उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य  खाद्यसंस्कृतीचा पुरेपूर आनंद लुटल्यावर आपलं मराठी जेवण आठवायला लागतं. इकडे मी  त्याला करता येणाऱ्या खाबुगीरीचा  हेवा करत थोडीशी हळहळत असते आणि त्याला परत घरी येण्याचे वेध लागलेले असतात...
आज जरा काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी निकीतचीच एक रेसिपी आहे ,फोडणीच्या वरणाची -ती वापरून फोडणीचं वरण आणि भात असं जेवण तयार ठेवलं होतं. कोशिंबीर करायची होती. ( फोडणीचे वरण साहित्य- एक वाटी मुग, मसूर, तूर डाळ mix, तेज पत्ता २,तीन वेलदोडे, ४-५ लवंगा, २ मोठे तुकडे दालचिनी, कढीपत्ता पानं, लालमिरची, अर्धी वाटी दही, मीठ, गुळ. दोन चमचे साजूक तुपात फोडणी करायची- हिंग, जिरं , खडा मसाला, कढीपत्ता, लालमिरची. मग धुतलेली डाळ त्यामध्ये घालून वरण फोडणीसकट शिजवायचं. शिजल्यावर त्यात अर्धी वाती दही घोटून घालायचं. हे वरण जितकं मुरेल तितका लवंग दालचिनीचा स्वाद, वास त्यामध्ये मुरतो आणि वरण अधिकच छान लागतं- सहसा मुरायला निदान चार पाच तास लागतात.)

सव्वा बाराच्या सुमारास  ऐरपोर्टहून फोन  आला, " पोचलोय. सॉलिड भूक लागलीये. चार दिवसात निवांत जेवलोच नाहीये!" जेवण तयारच आहे असं म्हणून मी फोन ठेवला. सव्वा वाजता मुलीला शाळेतून आणायला निघायचं होतं, आम्ही परत यायच्या आधी निकीत घरी हजार. साठ मिनिटांचा भरपूर अवधी समोर होता, ठरवलं आज साध्या वरण भाताला अनायसा फुली मारली आहे तर चक्क सगळीच रीत आज बदलून टाकायची! वांग्याचं भरीत, भाकरी, तवा पुलाव, फोडणीचं वरण, काकडीची कोशिंबीर असा मेनू ठरवला. ( लागल्यास थोडा साधा भात -नंतर साधा वरण भात खायला बाजूला ठेवायचा असं ठरवलं) एकीकडे गॅसवर वांगं भाजायला ठेवलं, दुसरीकडे कांदा, टोमॅटो ,बटाटा, ढोबळी मिरची चिरायला घेतली. कांदा चिरून झाल्यावर, एका गॅसवर कढई ठेऊन तवा पुलावसाठी  कांदा परतायला घेतला, ते होतोय तोपर्यंत ढोबळी मिरची चिरून झाली ती कांद्याबरोबर परतायला कढईत टाकली, गॅसवरचं वांगं पलटवून झालं, भारतासाठी कांदा-टोमॅटो-बटाट्याच्या फोडी करून झाल्या, मग काकडी सोलायला घेतली  ... हे असं अचानक मेनू ठरवून, थोड्याश्याच वेळात झक्कास स्वैपाक करायला एक वेगळीच मज्जा येते... त्यावेळेला घरातलच स्वैपाकघर कुठल्याही भटारखान्यासारखं वाटतं. म्हणजे ऑरडरी सोडणारे, निभावणारे आणि नंतर ते जेवणारेही आपण स्वतःच असलो  तरी झपाटून काम केल्यासारखं - Adrenaline rush असतो त्या मध्ये!
पुलावात घालायला मटार नव्हते तर मी फ्रोझन सोलाणे घातले. दाण्याचं कुट संपलं होतं म्हणून microwave मध्ये दाणे भाजायला ठेवले. वांग्याचं भरीत करताना एरवी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा लसूण मसाला वापरते त्या ऐवजी  भरतात - कढीलिंब ,लसूण, तीळ, धन्या जीऱ्याची पूड  आणि गोडा मसाला वापरला, दाण्याचे थोडे अर्धबोबडे कुट घातले.  बरोबर १ वाजून दहा मिनिटांनी पुलाव,काकडीची कोशिंबीर  आणि भरीत तयार होतं! चालती बोलती मसाल्याची पेटीच शाळेत मुलीला न्यायला आली आहे असं वाटायला नको म्हणून चटकन कपडे बदलून, डोक्यावर टोपी चढवून घरातून बाहेर पडले! खरंतर मी काही  नवीन पदार्थाचा शोध लावला नव्हता, कुठलंसं अवघड पक्वान्न बनवलं  नव्हतं, पण पाउलं  हवेत तरंगत होती, माझी मलाच आस्वाद घेऊन स्वैपाक केल्याची झिंग चढली होती !
भाकरी मात्र मुलीला शाळेतून घरी आणल्यावर मी  गरम गरम तव्यावरून पानात वाढली . दाणे भाजलेलेच  होते म्हणून कोरडं आमसूल, जिरं, तिखट, मीठ, साखर घालून मिक्सरला छान दाण्याची चटणी वाटली. मुलगी  शाळेतून जेऊन येते, तिला पानतल्या कशातच रस नव्हता, तिने भारतातून आणलेला खाऊ शोधत बाबाच्या  bags उपसल्या. त्या वेळात निकीत छान आस्वाद घेऊन जेवला. माझी भाकरी पानात घेऊन मी बसणार तेवढ्यात मुलीला झोप आल्याची जाणीव झाली, बाबा इतके दिवस तिच्या जवळ नसल्यामुळे आणि पोट भर जेवण जेवल्यामुळे - तो तिला झोपवायला गेला.. मी जेवायला सुरु करायच्या आधी माझ्या भरल्या ताटाचा फोटो काढला. :) मी तेव्हा एकटी जेवत असले तरी नंतर इतरही त्याचा आस्वाद घेतील म्हणून !

माझं जेऊन होईपर्यंत घरात सामसूम झाली होती. भांड्यांची आवारा आवार झाली, उरलेले पदार्थ डब्यात भरून भांडी पाण्याखालून गेली तरी सगळं सामसूम. भरल्यापोटी निद्रा देवीने आमंत्रण दिलेलं कोण टाळणार ?
बाप लेक वामकुक्षीच्या आधीन झाले होते...
त्यांना पाहताना मला दोन्ही आया आठवल्या! घरात मोठी मुलं, नातवंडं सगळ्यांच्या आवडीचं काय काय स्वैपाक करत सकाळपासून जुंपतात, तरी दुपारच्या जेवणानंतर सगळ्यात शेवटी पाठ टेकणाऱ्या त्याच, आणि दुपारचा चहा "आई काय फक्कड बनवते" म्हणून उठून चहा करणाऱ्या पण त्याच!
बहुदा हे विचार माझ्या डोक्यात येईपर्यंत मला चढलेली स्वैपाकाची झिंग उतरली होती. स्वतःच्या अंगावर पांघरूण ओढताना मी विचार केला, "बरेच दिवसात निकीतच्या हातचा चहा प्यायले नाहीये, पाच साडे पाचला त्यालाच उठवावं !"
चहा नंतर प्यायले का , तो कुणी केला हा वेगळा विषय आहे , पण प्रदीर्घ वामकुक्षीनंतर, दिवसाची सांगता उत्तम " मुरलेल्या " वरण भात, दाण्याची चटणी आणि मरलो च्या एका ग्लासने झाली! अन्न दाता सुखी भवं आजच्या सारखंच उद्या मिळो!


Both me and my husband, Nikit are foodies. But when he returns home from a long travel or trip, Nikit's idea of ambrosia is a bowl of simple steamed white rice, lentils flavored with turmeric asafoetida, jaggery, and salt, topped with a dollop of clarified butter and lemon juice. He enjoys it as a complete one pot meal with no need for any accompaniments. Whereas both me and my daughter need stir fried veggies, a salad, pickles, chutney or papad to enjoy our Dal-Rice. So , in a way it is very easy to appease Nikit's taste and the cooking time and effort is minimal.Today he was returning back home after a two week stay in India. He mostly visits Delhi and Bangalore for work so he enjoys the delightful offerings of  the Northern and South Indian cuisines of India, but starts missing the comfort of Marathi food after a week or so..
Today I had decided to cook a Spiced lentils version of Nikit's own recipe. ( One bowl of Mixed Moong, Toor and Masoor dal, three cardamoms, 4-5 cloves, 2 big pieces of cinnamon, Bay leaves 2, curryleaves, Red chillies, turmeric, Asafoetida, cumin, Salt, half a bowl yogurt, jaggery. In two spoons of clarified butter make a tempering with all the spices and to the tempering add the washed and soaked lentil mixture. Pressure cook the Dal. After it is cooked add the well beaten yogurt to the Dal, and jaggery, adjust the salt according to taste. This Dal tastes the best when the cloves and cinnamon have marinated enough in the lentils. Normally this takes about 4-5 hours..) The Dal and rice was ready and I was planning to make a cucumber salad with roasted peanuts powder.  Around 12.15 I received a call from the airport, " Arrived on time, am so hungry ..haven't had a good sit down meal in four days.." I  assured him that the food was ready and hung up the phone. Since I had all ready changed the simple Dal-Rice meal plan I decided to completely change it and cook a full meal worthy of a proper sit down lunch. I decided on making Spicy eggplant and potato mash, Tava pulav, cucumber salad, bhakri, and Dal.
I had a whole 60 minutes until 1.15 before I had to go and pick up my daughter from school.
I started roasting an eggplant on the gas stove. On the kitchen counters I assembled onions, tomatoes, potatoes and bell peppers. I started cutting the onions first and as soon as I cut enough for the Tava Pulav I put a pan on second gas top and started sauteing the onions for the Pulav. Then I diced bell peppers, turned over the roasting eggplant, Added the bell peppers to the sauteed onions and started dicing the tomatoes... There was no roasted groundnut powder, I put a dish of peanuts in the microwave. There were no peas in the house for the Pulav ; I decided to add frozen green chickpeas.. This impromptu cooking under a strict time deadline in my own kitchen was a lot of fun. It felt like a commercial kitchen where I was the head chef barking orders at the sous chef and then of course I was also going to be the happy consumer whose tummy was going to be well fed. The excitement gave me a great adrenaline rush..For the Eggplant and potato mash- I added a tempering of Curry leaves, asafoetida, crushed 4-5 garlic pods, sesame seeds, coriander and cumin powder, Goda masala and then sauteed the onions tomatoes and potatoes in it, after the potatoes were cooked I added the eggplant. Added the salt. 
By 1.10 I had finished the Pulav, Mash and the Salad. Since I didn't mean to smell like a human spice shop , I quickly changed my clothes, pulled down a cap over my head and rushed to pick up my daughter. I hadn't invented a new recipe or cooked a very hard to get gourmet dish, but there was a lightness to my step as I left my house. The impromptu lunch plan and my enjoyment of the adrenaline inducing cooking process gave me a zing of euphoria!
I made bhakri after I returned home with my daughter. I served them piping hot right off the pan unto the plate. Since I had already roasted the peanuts I made a quick peanut chutney - using roasted peanuts, dried Kokam, cumin, salt, red chilli powder and sugar.My daughter had eaten lunch at school so she didn't eat, she was more interested in rooting through her Dad's luggage to look for the goodies that he had brought from his trip. That gave Nikit, enough time to sit down and enjoy the meal I had put in front of him. By the time I was ready to sit down with my bhakri, my daughter remembered that it was time for her nap. Having finished his lunch, Nikit headed off to put her down for her nap. When I sat down to eat, I first took a picture of the plate I had made for myself. I may have been eating alone at that moment but I knew others would be able to share in its enjoyment later.
I finished eating, but there was no sound from the bedroom. I cleared the pans, stored away the leftovers in their containers, rinsed the pots and pans- but nobody roused. A full sit down meal after a long travel can do that to anyone. Who can refuse the temptation of a Siesta ! When I saw my daughter and Nikit cuddled together, far off in sleepy land I thought of my mother and mother in law.
They spend the entire mornings cooking for us kids, grand kids but they are the last to lie down. Also since Moms make the most amazing tea that can cure all sorts of laziness - they are the first to rouse to make that cup of tea.
I think by this point the earlier Zing of euphoria had faded away. Most probably chewed away with each bite of food :) As I drew the comforter over my body , I thought," Nikit has not made tea in 14 days, I should wake him at 5.30 to make the tea.."
Now, did I drink any tea, who made the tea, is a story for another day. But after a refreshing fiesta, the day ended with a nice glass of Merlot, Spicy lentils, rice and peanut chutney. !