facebook

Friday, January 26, 2018

भडभुंजा / The grain popper man



आई बाबांनी आम्हा तिन्ही मुलांना इंग्रजी मीडीयम शाळेत घातलं म्हणून एका नातलगाने, " जात भडभुंजाची आणि मिजास बादशाहची!"  असं काहीसं उपरोधात्मक त्यांना ऐकवलं होतं. इंग्रजी शाळांच्या फिया जास्त, आई –वडीलांच्या तोटक्या पगारात तीनही मुलांची शिक्षणं कशी होणार? अशा अर्थाचे असावे ते कदाचित. मी शेंडेफळ; त्यामुळे माझ्या समोर हे घडलं नसलं तरी त्याची वाच्चता आम्हा तीनही मुलांसमोर अनेकदा घडे. मला ही म्हण त्या न कळत्या वयातही अजिबात आवडत नसे. कारण मला भडभुंजाचे दुकान, तिथे स्वच्छ पांढऱ्या पोशाखात वेगवेगळे चविष्ठ जिन्नस विकत बसलेले काका, कढईतला घमघमणारा खमंग वास, मला खूप आवडत. त्यांच्या दुकानात मांडून ठेवलेला खाऊचा खजिना पाहून मला नेहमीच, "आई खूप काटकसर करते, आमुक-तमुक-आमुक घेतच नाही!" असं वाटत असे. आम्ही घेतलेल्या पाकिटात नाही असे काहीतरी नक्की समोर धगीवर परतत, फुटत, असे. वेगवेगळ्या प्रकारची धान्य, धगीवर फोडून, त्यातून तयार झालेले चुरमुरे, कुरमुरे, मुरमुरे, लाह्या! अहा! डोळ्यासमोर आत्ताही ते दुकान आहे, लहानपणच्या खूप साऱ्या खाऊ विषयक आठवणी त्या दुकानातल्या, गोणपाटाच्या पोत्यांमधल्या  जीन्नसात अडकल्या आहेत!

आई आणि तिच्या दोन्ही बहिणी पुण्यातल्या कन्याशाळेत जायच्या.  शाळेच्या अलीकडच्या चौकात हे भडभुंजाचे दुकान आहे. तेव्हापासून, म्हणजे त्यांच्या लहानपणापासून चुरमुरे, खारे दाणे, लाह्या, कोरडी भेळ , फुटाणे हे इथूनच घेतले जायचे. आई आणि तिच्या भावंडांची एक Mad अवड आहे - त्या चौघांना ताजे चुरमुरे आणि कोवळा मुळा खायला खूप आवडतो. म्हणजे लहानपणी आम्हाला कधी बागेत घेऊन गेल्यावर "भेळ खायची आहे का?" असं विचारल्यावर, “हो” म्हणायच्या आधी नक्की कुठल्या प्रकारची भेळ? ह्याची खात्री करून घ्यायला लाग्याची. म्हणजे आम्हा मुलांच्या डोक्यात भेळेच्या गाडीवरची चिंच-गुळाची चटणी घातलेली ओली भेळ असे पणआई मावशीच्या मनात वेगळीच भेळ बनत असे. ताजे चुरमुरे, नावापुरतं फरसाण( नसलेलं पण चालायचं ) कच्चे किंवा खारे दाणे, आणि कोवळा मुळा - झालीच त्यांची भेळ. खरं सांगते, आईला पण हे अगदी प्रकर्षाने सांगितलं आहे; हे मुळा -चुरमुरे समीकरण मला अजिबात आवडत नसे. आत्ता विचार करते तेव्हा जाणवतं की आई फक्त ताज्या किंवा भडभुंजाकडून  आणलेल्या चुरमुर्याशीच मुळा खायची. जसं हे पाकिटातले चुरमुरे, हलवाईकडचे फरसाण आणणं सुरु झालं तसं आईची, तिच्या style ची भेळ खाणं बंदच झालं. त्या खाऊ मध्ये तिच्या लहानपणीच्या आठवणी दडलेल्या असणार. वर-वरचे चणे-फुटाणे, आवळा-चिंचा-बोरं-कैऱ्या-पेरू, पाच -दहा आण्यात जे येयील ते ती चौघं भावंडं वाटून घेत, आणि त्या थोडक्यात केलेल्या मजेत खूप आनंद लुटत. त्यांचे लाड पुरवण्यासाठी कुणीच साग्रसंगीत थाट मांडत नसे.त्याला वाढदिवस-सणाचे अपवाद असतील कदाचित पण 'थोडक्यात मजा' असाच कानमंत्र असे. पण हे सगळं मला खूप नंतर उमगलं...आपण लहान असताना आपल्याला काही आईच्या बालपणाविषयी, तिच्या बालपणातल्या आवडी निवडीशी घेणं देणं नसतं! तेव्हा, ती फक्त आपल्या आवडीनिवडी सांभाळणारी एक बाई असते ! 
लग्नानंतरही आई रास्तापेठत राहिल्या गेल्यावरह्याच दुकानातून ह्या गोष्टी घेत असे. अपोलो थेटर जवळची ‘interval’ दुकानातल्या भेळेची चटक लागली असली तरी कोरडी भेळ आवडायचीच! आजोळच्या वाड्यात गेल्यावर, तिथून परत घरी जाताना ह्या दुकानातून निदान कोरड्या भेळेचा एक 'पुडा' घेणे हे आईला अपरिहार्य असे. ती कधी मोकळ्या हाताने आली तर मी नाराज होत असे. आम्ही मुलं बरोबर असलो कि भडभुंजाकडून कधी गरम कढईतले खारे दाणे, कधी मुठभर फुटाणे आमच्या हातावर पडत. ह्या खाऊचे खूपच अप्रुप वाटायचं, खूप खूप special वाटायचं! आईची आणि त्यांची तोंडओळख होतीच, तिच्याकडे पाहून ते हसले की, किंवा कधी "आज खूप दिवसांनी/ महिन्यांनी?" असं म्हणाले की मला एक वेगळाच आनंद होत असे. त्या काकांनी कधी मला माझं नाव विचारलं नाही, कधी मी त्यांना किंवा आईला त्यांचं नाव विचारलं नाही...पण माझी आणि त्यांची तोंड ओळख राहिली नाही..(लेख वाचून, त्याच दुकानात वर्षानुवर्ष जाणाऱ्या एकांनी त्या काकांचे नाव कळवंलं - रामदिन बुद्धीलाल परदेशी. नाव कळलं पण म्हणून ओळख अजून वाढली असं वाटलं नाही..)
आज त्यांच्यासमोर उभी राहिले, दुकानात खरेदीला गेले तर माझ्या मुलीच्या हातवार ते थोडीच चार दाणे ठेवणार आहेत? कदाचित तिची चिव चिव ऐकून ठेवतील सुद्धा, पण त्यांच्याकडे येणाऱ्या इतर गिऱ्हाइकांसारखीच मी पण एक असेन. एक पिढीजात नातं बांधता आलं असतं का? का आता ते राहूनच गेलं? 
मी इथे अमेरिकेत मैलोन मैल लांब राहून त्या दुकानाबद्दल लिहिते आहे आणि आजही ते दुकान तिथेच आहेत्याच्या आसपास असणारे पूर्वीचे वाडे पाडून, आता तिथे ईमारती झाल्या असल्या तरी  दुकान तसच उभं आहे! तसच नातं आमचं ही आहेच..

आम्ही कोथरूड, डहाणूकर कॉलोनी मध्ये राहिला गेलो तरी आई  'गावात' जाणार असेल तर हमखास भेळ, साळीच्या, ज्वारीच्या, मक्याच्या लाह्या, खारे दाणे, फुटाणे  घेऊन यायची. नंतर शिंग फुटल्यावर त्यांच्याकडे, "चना जोर आहे का ? तिखट दाणे आहेत का ? भडंगाचा मसाला आहे का?"  असले आईला सुझाव देणं सुरु झालं. तोपर्यंत, बागेबाहेर किंवा ठराविक चौकात भेळेच्या गाड्या होत्या तशी  जागोजागी भेळेची दुकानं जसे की गणेश भेळ, मनिषा भेळ, साईबा इत्यादी दुकानांचे आम्ही चाहते झालोच होतो. स्वीट काँर्न भेळ, मटकी भेळ आणि काय कायची चटक लागायला लागली होती.पण तरीही ' खडा माल' आम्ही ह्याच दुकानातून आणीत होतो. 

माझ्या बाळंतपणाला अमेरिकेत येताना आई तिकडूनच साळीच्या आणि ज्वारीच्या लाह्या घेऊन आली होती.फरसाण मात्र काका हलवाईचे एक किलो.म्हटलं," भेळेचा एखादा पुडा आणायचा भड्बुंजा कडून!" तर म्हणाली, "तुलाच आवडतं न शेलकं सगळं, म्हणून हे आणलं. निदान ३-४ दा तरी भेळ करून खाशील! एका पुड्यात काय भागणार तुमचं?"  तिचं म्हणणं पटलं, पण त्या खास पुड्याची जास्त आस वाटायला लागली. त्या एकाच पुड्यात तर माझ्या लहानपणी आम्ही पाच जण तृप्त होऊन जात असू...
आज मी कॅलिफोर्निया मध्ये राहत असल्यामुळे मला ज्वारीच्या, साळीच्या लाह्या, कोल्हापुरी मुरमुरे सुद्धा भारतीय दुकानात मिळतात. बर्कली मधल्या काही दुकानात organic puffed rice, Puffed millet असलं काय काय मिळतं. म्हणूनच प्रकर्षाने मला लहानपणचं हे सगळं इतकं ठळक आठवायला लागतं...
आज सगळीकडे  diet conscious जगात ,चुरमुरे, कुरमुरे, मुरमुरे, लाह्या ह्या आरोग्याला चांगल्या मानल्या जातात. पण त्या आपण mass production मधून तयार होऊन, पाकिटात  एकावेळेला लागेल त्या पेक्षा जास्त ऐवज भरून बंद केलेल्या, दुकानात अनेक दिवस, महिने राहून मग आपण ती पाकिटं घरी आणतो. ताजं, कढईत फोडलेलं धान्य आणि पाकिटातलं तेच फोडलेलं धान्य, ह्यांच्या चवीत फरक पडतो तो फक्त त्यांच्या production process मुळे नाही त्यांच्या ताजेपणामुळे सुद्धा. पूर्वी हलवाई,bakeries, वडापाव-भजीच्या गाड्या कमी होत्या, आजकाल प्रत्येक कोपर्यावर असतात. पण आता पूर्वी सारखी भड्बुंजाची दुकानं नाहीत. Maggi, ‘no one can eat just one’ Lays, आमच्या आयुष्यात यायच्या आधी, खाऊ हा घरी बनवलेले तेल-पोहे, दडपे पोहे, सांजा, उकड नाहीतर भडभुंजा करून खडा माल आणून त्यावर काहीतर पाककला मंत्रून तयार केलेला खाऊ, एवढाच असायचा. कधीतरी बादशाही हॉटेल मधला 'potato toast' किंवा हिंदुस्तान bakery मधला पॅटीस. आमच्या पुढे पर्याय कमी असतील पण त्याचा ठेवा पोटोबा आणि आरोग्य दोन्हीला पोषक होता. खाद्य संस्कृतीच्या कक्षा रुंदावल्या तशाच काही जुन्या, साध्या, सात्विक गोष्टींचा विसर पडला किंवा त्या क्वचित करण्याच्या, उपभोगण्याच्या यादीत जाऊन पडल्या! माझ्या nostalgia मुळे मला मिळालेला बालपणातला हा भडभुंजाच्या दुकानातला ठेवा खूप समृद्ध वाटतो. मी त्यांची ऋणी आहे, अर्धवट राहिलेला परिचयाचा सोहळा पण पूर्ण करायचाय, त्यामुळे पुढच्या खेपेत माझ्या मुलीला घेऊन त्यांची दुकानभेट निश्चित!  



Note: I was not able to find a literal translation for Bhadbunja in English. I have therefore, named him the grain popper man.
When my parents decided to enroll all three off springs in an English Medium school, a close relative had remarked, “Cast of a grain popper but the loftiness of an emperor!”. I think they were indirectly referring to the fact that the fees for English medium schools were steep and my parents didn't have a disposable income on their paltry salaries, so the insistence to send us to English medium schools was lofty on my parents part. I am the youngest of the the three, so none of this was said in front of me, but all three of us siblings were privy to a repeat echo of this sentence for many years during our younger days. I didn't understand the underlying casteism or gravity of the sentence in itself, but I didn't like this comment/ saying/ idiom for the mere fact that an outing to the grain poppers shop or the Bhadbhunja was one of my most favorite things to do. He would sit in pristine white clothes amongst the gunny bags holding his wares. On one side of the shop, there was a huge cast iron pan, burning over wood and coal and the most delectable aroma of roasting grains, caramelizing corn, would bewitch any passerby to enter the shop. It was a treasure trove of snacks, really, every time I visited the shop with my Mother I would think,“ Mom is such a penny pincher, she never buys, x,y,z any of that other stuff.”There would be crunchy pops popped from rice, millet, shorghum, corn, roasted peanuts, chickpeas.The  grain popper- man would store all this in gunny bags which were folded down in neat layers on the outside, as the stuff sold off. I have such a clear visual memory of his shop, and the grain popper sitting in the middle of it all..So many of my memories of mouthwatering snacks, and crunchy munchies are associated with the grain popper man and his wares!
My mother and her two sisters studied at the ‘Kanyashala’ /Girls school in old Pune. Just one block before the school there was this grain popper shop. So since their childhood, puffed rice, salted peanuts, puffed shorghum, dry mix of bhel ( minus the sweet tamarind and cilantro-chili sauce) roasted and salted chickpeas with their outer brown covers, all of these were brought only from this one shop. My mom, aunts and uncle have a queer food habit- they love eating freshly popped, puffed rice with tender radishes. As kids, when we picknicked in a park and any of my Aunts or mom asked if we wanted to eat Bhel, we would have to first ascertain what their idea of Bhel was. We would be fantasizing eating some mouthwatering street food and their intention would be to serve us some fresh puffed rice, radishes with salted or unroasted peanuts, and a mostly non existent serving of some farsan,( savory lentil noodles, bits and mix) To be very frank, and I have confessed this to my mother recently, I hated this combination. When I retrospect, I realize that mom only savored this kind of bhel when we bought fresh puffed rice from the grain popper.  As we started buying pre packaged puffed rice, and savory lentil flour mixes from the sweet seller, Mom just stopped mixing it with tender radishes. I think she must have had a lot of childhood memories associated with the enjoyment of this simple snack.But as a child I was least bothered in understanding my Mom’s childhood or her likes and dislikes. At that point in time, my mom was just a woman in charge of taking care of my likes and dislikes.
When mom moved away after marriage, she still continued buying these snacks from the grain popper. Whenever Mom visited her parents, it was obligatory for her to bring atleast a small parcel of Bhel from the shop. If she returned empty handed I would be cross with her. If we accompanied Mom to the shop, the grain popper man would give us a handful of roasted chickpeas or salted peanuts!  Its impossible to explain how this small treat made us feel special- but it did!  When we moved far away- ( 10-kms was a lot of ground to cover) we still continued our patronage. If mom or Dad was visiting that part of the old city, they would haul a bag of our favourite snacks, bhel, puffed rice, puffed shorghum and jowar, salted peanuts and salted chickpeas. As we grew up, we started making special requests, we pushed our parents to inquire if the grain popper man had chana jor garam( flattened and crunchy chickpeas), if he had spicy peanuts, if he had a special spice mix to make Bhadang/ spicy puffed rice... By that time, besides the street food carts the concept of Bhel-Paani puri shops was well established , and as a family we had started frequenting these shops. But time and again we would continue to buy the raw material from the grain popper shop and enjoy them as snacks. 
As I sit and write this article, I am a bit ashamed of myself. In all the years that I frequented the shop,  and the place and food that has front space in my memories, I have no recollection of the name of the shop, or the name of the grain popper man who gave me many a special treats...The shop stands exactly where it was, the old Waadas that stood around it have been long demolished and in their place stand new tall buildings. But the old shop with the wooden slatted double doors, is still standing tall and proud.
Because I live in California, which is a big Indian hub, there are many Indian stores and hence, easy access puffed rice, puffed shorghum. I even get Kolhapuri Murmure, which is a wider than the normal type of puffed rice, in Berkeley. Some health food stores also carry organic puffed rice, Puffed millet- but all of these are pre packaged. Well, since pre packaged meals are the rage of our times, I shouldnt be complaining. I dont complain, I start reminiscing about the past..
Today, in the diet conscious Indian meal plan – puffed rice, Bhel without the high sodium tamarind and green sauces, puffed Shorgum, flattened chickpeas, roasted chickpeas are all positively healthy snacks. But we now avail of them from a mass production process, packaged in serving sizes which we will not finish in one serving, and which we will buy after the packets have sat on the shelf for days, if not months. Freshly popped grains, and prepackaged popped grains, dont taste different only because of their production process but also because of their freshness. Were there so many bakeries, Wada- paav and fritter vendors, sweet vendors when we were growing up ? Today there are more than a few on every street corner. But I dont see any grainpopper shops opening up, some of the old shops have closed due to the competition from pre packaged snacks. Before the advent of Maggi and ‘No one can eat just one’ Lays, in our lives, our only snacking options were flattened rice flavored with either yogurt or oil and spices, flattened rice with cucumber, onion, tomatoes, coconut milk and tempering, beaten wheat stew with veggies, rice flour and buttermilk savory porridge.Besides that the raw materials brought from the grain popper store, were garnished with home cooking and served as our favorite munchies. To some, these options may seem limited, narrow, but our tummies were nurtured with good healthy food, which along with nourishment has left behind picturesque memories, sights, smells and sounds ..It’s quite possible that my nostalgia makes me more prone to look at these memories as something precious, to glorify ‘my childhood’ as healthier times. But I really feel privileged to have experienced the grain popper man, his shop, the relationship that I developed with food. On my next trip to India, a visit to the grain popper shop with my daughter will be top on my list. For I have acknowledgements to make and gratitude to share....




Wednesday, January 24, 2018

Birth Song

Yesterday, birthday wishes started pouring in for Era from India. Her birthday is today the 24th, but I realized that it was already 24th in India. But because I was still a solid 12 hours behind schedule here in Berkeley, I was taken back to the night of  the 23rd ,three years ago...( cue in the shivers..)

In my last trimester I had been asked multiple times to complete my 'Birth plan' and submit it to my Gynecologist.  All the questions in the Birth plan were very confusing, intimidating and I was tempted to hire someone who had been through the actual process of giving birth to come and fill out my birth plan for me. When I researched online, the articles I read were pretty stressful. To give you a fair context, I had stopped reading news since my first trimester because the state of the world I was bringing a new baby into was very disturbing to me. So the stories of things gone wrong during labor were kind of dampening the sweet bubble I was living in.
But the writing of my birth plan led me to the selection of a birth song for Era's actual entry into the world.
Needless to say , when it was crunch time the birth plan I had written was thrown out of the window- Era had a more dramatic plan to make her entry and we just went along with it. Though she heard that song on repeat inside my womb, her birth song was not actually played at her entry or even in the first two days while we scrambled to learn her new ways.  With her birth a new 'Era' in our life had begun!
The birth song would have remained a mere entry on our birth plan but for the new born screening. When Era's heel was pricked to collect her blood sample for newborn screening, she wouldn't calm down. Swaddling, cuddling, feeding, passed from nurse to me to Ajji to Dad, this passing -the-screaming-infant , continued until Nikit unconsciously started swaying and singing the song and slowly she calmed down. She found her familiar tune and settled down.
We performed this 'musical trio treat' for the nurses many times in our five day hospital stay.  They ohhed and ahhed about the song. An Ethiopian nurse and a Hawaian nurse asked us for the details of the song because, "it had grown on them"...
The song that grew on them, on us and on Era is , 'आ चल के तुझे मै लेके चलू ...'. This song composed,written and sung by Kishore Kumar from the movie  'दूर गगन के छाँव मै.. is a true Utopian fantasy, but  I think it is the ultimate, in the kind of idealism that new parents have for the world that they want to create for their offspring. We selected it at a time when it fit perfectly into my sweet bubble of keeping the real world at bay.  But even in the real world, I am glad that we choose this song of hope for my daughter.  As she grows up she will realize that the world is not as  poetic , dreamy and friendly as the song portrays. In her short three years she has already seen that not everyone will respond  or reciprocate to her happy child persona or her friendliness. But I am glad that she will have the music and the idealistic words of this song as part of her intrinsic rhythm and conditioning! Spunk, resilience, strength: they will follow in the years to come...
For now, this unbroken sense of peace, unity and harmony is our gift to her !

आ चल के तुझे, मैं ले के चलूं
इक ऐसे गगन के तले
जहाँ ग़म भी न हो, आँसू भी न हो
बस प्यार ही प्यार पले
इक ऐसे गगन के तले
Come let me take you to this land,
where under the blue skies,
there is no room for sorrows, no tears,
Only Love blooms and resides,
Under those skies.

सूरज की पहली किरण से, आशा का सवेरा जागे – 2
चंदा की किरण से धुल कर, घनघोर अंधेरा भागे – 2
कभी धूप खिले कभी छाँव मिले
लम्बी सी डगर न खले
जहाँ ग़म भी नो हो, आँसू भी न हो…
बस प्यार ही प्यार पले
The first rays of the sun bring in a hopeful dawn,
The  first rays of the moon wash away the deep dark gloom,
At times the glare is too bright, sometimes there is shade, no light,
But the path meanders,the journey continues..
Where there is no room for sorrows, no tears..
Only Love blooms and resides...

जहाँ दूर नज़र दौड़ आए, आज़ाद गगन लहराए
जहाँ रंग बिरंगे पंछी, आशा का संदेसा लाएं – 2
सपनो मे पली हँसती हो कली
जहाँ शाम सुहानी ढले
जहाँ ग़म भी न हो, आँसू भी न हो…
बस प्यार ही प्यार पले
Deep on the horizon,  as far as the eye can see, lives a free land..
Birds of color with rainbow plumes; messages of hope they sing.. 
Smile, my tender bud, I brought you up with my dreams
In that faraway land of golden evenings and twilight
Where there is no room for sorrows, no tears..
Only Love blooms and resides...

सपनो के ऐसे जहाँ में,जहाँ प्यार ही प्यार खिला हो,
हम जाके वहाँ खो जाये , शिकवा न कोई गिला हो ,
कही बैर न हो , कोई गैर न हो , सब मिलके यूँ मिलते चले ..
जहा गम भी न हो , आसू भी न हो ,
बस प्यार ही प्यार पले.

In Utopia, my land of dreams, where love has embraced all,
Lets just reach and get lost in its valleys; We will be a clean slate,no baggage of the past.
There are no boundaries, no aliens, we are united as we walk forward,
To a land where there is no room for sorrows, no tears..
Only love blooms and resides...

x

Saturday, January 20, 2018

Nourishment for a Nursing Mother

Women are often told that giving birth is akin to a rebirth for the mother too. All that I remember from my entire birthing process are the intense hunger pangs; as if besides the baby, another deep pit had opened up in my stomach.  As I channeled all the reserves of energy in my body to face the excruciating labor pains, pains that I had never experienced before and which anecdotal wisdom hadn't prepared me enough to combat, I craved for the nutritional support that comfort food would bestow on my weary body. But that nutritional support was far beyond my reach. It's a medical necessity that thousands of women face in the maternity ward, its rational , scientifically proven but it doesn't satisfy the mental self that is just as much at play in the labor room as our physical bodies. In the two days of labor I developed a special hatred for veg broth and clear jelly- and I am sure there are other new mothers who would join my hate club. I thought that it was a 'emperors new clothes' kind of trick played on me; these two 'items' pretended to be food but they were provided just to trick me into thinking that I was getting nutrition for the body that I was pushing to its limit! I was in a terrible state, I was dry heaving and at times throwing up the broth too- but I craved for the simple ghee-Dal Chaval ( Waran Bhaat made in Maharashtrian homes) no pickle, spicy potatoes, coriander-mint-coconut chutney, even a khichari  would have given me a nurturing warmth from within, when  everywhere else the body was experiencing the sharp stabs of pain. But that wasn't meant to be. I couldn't eat for a full, solid twenty four hours, which to me felt like three or four days. Being thrown under the bus and then using the leftovers to mop the floor, that's what the body felt like. I had never experienced that kind of mind numbing fatigue, bone-tired weariness- it seemed like a bottomless pit I wouldn't be able to summit out of . And then... they placed this tiny helpless baby with a rosebud mouth on my chest... And the dog tired body produced the liquid gold elixir for this new human being... That's when I realized why the birthing process was akin to a rebirth of the mother too..

Because so much of my birthing memories are food related, it's easy for me to remember the first meal after my rebirth. My mother had bought  Dal-methi and Rice to the hospital. The rice was cooked with Cumin, asafoetida and two-three whole black peppercorns so that it wouldn't irritate the fragile digestive system. The Dal-Methi was cooked in coconut milk to aid the milk production and milk flow. To complete the taste palette there was a small Aaliv/ watercress seeds Ladoo made with Gud, coconut and ghee.  Belly full, satiated with comfort food, I embarked on the journey of nourishing my daughter.

In the last three years, I have had the opportunity to recreate this experience for a couple of my friends in the United States. Two of these friends were prescribed Methi/ Fenugreek tablets by Doctors and midwives to help lactation but they gladly chose to try it in the food format, hoping it would be more nourishing. I enthusiastically cooked for them and shared my mother's recipe. I got the opportunity again last week to cook a whole meal for my neighbor. She has just given birth to a baby boy a month ago. Her mother stayed with her for a few days before the delivery and three four days after the baby's birth.  Her in -laws will arrive a couple of months later to help them with the baby. The new mom- dad are manning their new family and the challenges of a new baby all by themselves. As I marvel at this, I also feel sad that a lot of new families in America don't have the support system that we take for granted in India. But at the same time, its very heartening to see neighbors and close friends standing up to help, hoping to share responsibilities and becoming a part of the village that is required to raise a baby.  With a toddler of my own underfoot, I offered the only thing I could manage to do- cook. ( I discovered an excellent resource- Meal Train  for new mothers, old people, recuperating patients).  Also, Nourishing a mother who is nourishing a baby seemed like a great opportunity to earn some good Karma :)


Dal Methi, a  salad, (steamed beetroot with cumin powder, salt, sugar, lemon juice,whole roasted peanuts) Stir fried kale ( with sesame, garlic, coconut, red chilies) Cauliflower and green onion Sabji, Mixed flour Poli/ roti ( oats, raagi,  two big spoons of Flaxseed powder in wheat flour), white rice( with cumin, asafoetida, peppercorns added when cooking the rice)

Though I cooked the meal with my toddler, I felt very satisfied while cooking this meal for a nursing mother- a kind of happiness that is very hard to put into words, but which just like the food nourished my soul. When my neighbor messaged me the next day she said, "Your food satisfied my soul! I didn't know I needed this until I ate it. As soon as I can,I want to learn to make the Dal and the greens. Thanks a ton!"

When I read my neighbors message, I started introspecting. I have never, ever in my life  have had a healthy and clean, nutritious diet except when I was pregnant. When I was breastfeeding, again because milk production for my daughter was the top priority, I kept up with my healthy food habits. After the first year when mothers milk started sharing its importance with other solid foods, I started veering off my path of healthy eating. In making our children, our whole family our priority, I feel that new mothers loose sight of their own body's needs. At least, I did. I have seen close friends, cousins, elder sisters go through this....We give from our body until we deplete it.  A reserach based article on ScienceMag talks about how women actually loose grey matter in their brains during pregnancy and the loss is still visible even two years later! (5% brain fat lost in the prenatal period )This loss is not just because we are being attuned to our babies needs and maternal instincts but because the fat from our brains is literally being used in the baby creation- developments process!

On a closer inspection of my roots I also noticed that the whole system around child birth and maternal care in India is very warm and welcoming. There's so much anecdotal wisdom always floating around us, access to help, simple but logical steps to follow for a new mother, do's and don'ts  of diet, oil massage for both baby and mother, such simple things permeating through generations.. There is of course the darker side of it being too strictly adhered to by the older generation and becoming cumbersome to follow for the contemporary woman in India- but there is definitely some gold in the old traditions. Even for me , a Indian mom living far away from India, the ancient wisdom passed onto me by my mother and mother-in-law helped me to steer through a long and nourishing breastfeeding experience. Our generation hasn't had to study texts or ancient books, but despite our Dr.Google queries, counter-arguments, stubborn refusal of acceptance of old norms,  the knowledge transfer from past generation to us is seamless. But there is very little about the mother's body, mother's care after the breastfeeding phase has passed. When the demands of a toddler, long breastfeeding relationship has depleted the mother- what happens next? Personal experience, anecdotal evidence points to the fact that women's health related problems, spinal problems,  knee and joint pain, bone density problems all arise a few years post pregnancy.

Cooking for a nursing mom reminded me that no matter what, I had to treat my body as a vessel that may not be carrying a new human being but which was still the vessel of my own aspirations and dreams, while I continue to exist on this planet. Unless I feed that body with nutritious food, give my body what it needs to replete itself, I will always be bone -weary. 

All the nursing mom's on this group- This post is just for all of you. Nourish yourself for the baby you are nourishing, but after the breastfeeding journey is complete, Nourish yourself for your own dreams, keep that body healthy because you need to be healthy for you. Your baby, your husband, your family will always need you, but so will you!

All the ancient wisdom that's been passed onto us, we will accept, edit, rewrite, make new versions and pass it on with the hope of not just healthier moms but healthier women ...


Monday, January 15, 2018

साडी



मी लहान असतांना , मला आई तयार कशी होते हे बघायला खूप आवडायचं.  तिच्या कॉटनच्या साड्यांना नेहमीच स्टार्च आणि इस्त्री असायची. आणि पाच दहा मिनिटात तिची साडी, वेणी घालून, तिचं 'तयार होणं ', आरशा समोर असणं संपलेलं असायचं. कानात कुड्या - मोत्याच्या किंवा सोन्याच्या, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर मरून रंगाची टिकली, एका मनगटावर लेदर च्या पट्याचं टायटनचं घड्याळ, दुसऱ्या मनगटावर, तिच्या लग्नातल्या पण साध्या, दोन सोन्याच्या बांगड्या. तिने कधीच ' खोटे ' कानातले घातले नाहीत; त्याने कान चिडतात म्हणून. :) वर्षानुवर्षे तिच्या अंगावरची ही आभूषणं बदलली नाहीत. निदान माझ्या आठवणीत तरी.  तिने कधीच पावडर, लिपस्टिक, आयलायनर लावला नाही. तिला अत्तरं, सेंट, छोट्या काचेच्या बाटल्यांमधली 'उडी कलोन' वगैरे खूप आवडत. त्याची एखाद- दुसरी बाटली आमच्या घरी नक्की असत . कधीतरी  'मी काय करू? तुला काही मदत हवी आहे का ?' असं सारखं टुमणं लावल्यावर, निऱ्यांना साडी पिन लावण्याची जवाबदारी मिळे. 
आईच्या त्या मऊ कॉटनच्या पण स्टार्चची धार असणाऱ्या साड्या मला फार आवडत ..
सिल्क किंवा भरजरी साड्या ठराविक सणाला किंवा शाळा / कॉलेज मधल्या समारंभानाच नेसल्या जात. दसरा दिवाळी, पाडवा, संक्रांत सगळ्या सणांना, सकाळी उठून अंघोळ करून तिच्या ' स्पेशल ' साडीत आईने स्वैपाक केल्यामुळे,  साडीला हळद किंवा तेलाचे, देवघरातल्या तूप-शेंदूराचे डाग पडले कि तिला हळहळ वाटे. झटकन ' ड्रायकलीन' ला वगैरे देण्याची भानगड नव्हती.
मग नंतर ह्या सिल्क साड्यांचं प्रकरण आणि आईच्या कपाटातलं प्रमाण  फार वाढलं. कॉटनच्या साड्या उन्हाळी महिन्यासाठी राखीव आणि एरवी अधून मधून वापरल्या जात.
मी सेकण्ड यर ला असतांना आईच्या कॉलेजमधून फोनवर बातमी मिळाली कि 'तिचा पाय मोडलाय, प्लास्टर घातलंय आणि ती थोड्याच वेळात घरी पोचते आहे..' त्यावेळेच्या माझ्या गृहकृत्यदक्ष मनाला वाटलं, आईच्या ह्या परिस्थितीत गाऊन आणि सलवार कमीजचा खूप उपयोग होईल. आणि म्हणून आईने पहिल्यांदा सलवार सूट घातला. ..ह्या गोष्टीला आता १५ एक वर्ष होऊन गेली.
दहा वर्षांपूर्वी मी सासरी - म्हणजे ते घर सासर व्हायच्या आधीपासून - तिकडे वावरायला लागले आणि त्या 'आईचे' पण कॉटन साड्यांवरचे प्रेम लक्षात आले. जरीपेक्षा बारीक आणि रेशीम काठ, तिच्या आवडीचे होते. ती आई पण कॉलेजला अशी १०-१५ मिनटात भर्रकन तयार होऊन जायची. ही आई सलवार कमीज घालत होती. 'तू अमेरिकेला येते आहेस, तर चल तुला जीन्स घेऊ' असं म्हणून मी तिला भरीस पाडून, मॉल मधून जीन्स आणि ट्यूनिकस घेऊन दिल्या...दोन्ही आया 'मॉडर्न ' झाल्या.
माझ्या आईला मी घेऊन नाही गेले, पण तिच्या परदेशवारीसाठी ती पण जीन्स, ट्यूनिक, कोटस इतयादी खरेदी करून, सुटसुटीत कपड्यात जगवारी करण्याची मजा अनुभवून परत मायदेशी गेली.  "इतकी वर्ष का नाही केला?"असं म्हणत ह्या दोन्ही आयांनी छान स्मार्ट ' बॉब' कट केले आहेत.
साठी नंतर 'कुणाकडूनही आता नवीन वस्त्र नको', असं म्हणत असतांना, ह्या दोघींना कुणी कुणी प्रेमाने , आग्रहाने भरजरी काठांच्या, उत्सवी साड्या भेट देतात. त्या- त्या व्यक्तीचं मन मोडायचं नाही म्हणून त्या साड्या नेसतात सुध्दा; पण आता रोजच्या दैनंदिनीत ब्यवहारात त्या दोघीजणी साड्याच नेसत नाहीत ! आता त्यांच्यासाठी पण साडी ही 'स्पेशल वेअर' झाली आहे. दर रोज घालायचे कुर्ते, सलवार, लेगगिंग्स, ओढण्या, स्टोल... कपाटाचे रूप बदलय तसं आई पण बदलली आहे ..
यंदा माझ्या आठवणीतली 'स्पेशल' साडीत सणासुदीचा  स्वैपाक करणारी आई,  मला स्वताःमध्ये साकारायची होती. २००७ मध्ये खास लखनऊहुन माझ्या फिल्म इन्स्टिटयूट मधल्या मैत्रिणीने आणलेली साडी नेसायची मी ठरवली होती .. पण सकाळी उठून धावत पळत ८-१० जणांचा साग्रसंगीत स्वैपाक करायचा म्हटल्यावर साडी बाजूलाच पडली. टी शर्ट , पॅन्ट - सुटसुटीत कपड्यात स्वैपाक आवारला आणि पाहुणे पोचायच्या आधी १० मिनिटं,अंगावर 'फेस्टिव्ह' कुर्ता चढवला !
स्वैपाकाचं कौतुक करत तृप्त जेवलेले पाहूणे पहिले पण तरीही अस्वस्थ वाटलं ...  वाटलं आमच्याकडची  ठेवणीतली साडी नेसून, अगत्य करायला उभी राहणारी,  'स्पेशल 'आई नाही घडली... तिला पाहतच मोठे झालॊ, तिला नव्या तऱ्हा शिकवतांना काही जुन्या ,तिच्या ठेवणीतल्या तऱ्हा घ्यायला हव्या होत्या.
 कारण आता ती पण ती, जुनी, आठवणीतली आई राहिलेली नाही. ती पण सणाला, पाय दुखतात ,सिल्क साड्यांमध्ये उकडतं, म्हणून सुटसुटीत ड्रेस घालते.
इरा जेव्हा मला निरखून ,मी तयार होते, तेव्हा नक्की काय काय करते? हे न्याहाळायला लागेल ,तेव्हाही माझ्या मनामध्ये आईच्या मऊ कॉटन साडीला असलेली स्टार्च ची धार आठवेल.. हे सगळं त्या साडी साठीच...

Saturday, January 13, 2018

बाळंतीणीचा डब्बा !

डाळ मेथी, शिजवलेल्या बीटाची कोशिंबीर ( मीठ लिंबू साखर जिरेपूड दाण्याचे कुट आणि अख्खे दाणे), केलची परतलेली भाजी (तीळ, लसूण, लाल मिरची, ओलं खोबरं ) ,फ्लॉवर आणि कांद्याच्या पातीची भाजी ( १ हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर आणि आलं घालून)  जवस घातलेली mix पीठाची पोळी ( नाचणी, oats, गहू पीठ), भात( जिरं, हिंग, २लवंग, ३-४ मिरं घालून शिजवलेला)


बाई मुलाला जन्म देते तेव्हा तिचा दुसरा जन्म होतो असं म्हणतात. मला ह्या जन्म देण्याच्या process बद्दल अगदी प्रकर्षाने आठवतं ते पोटात खड्डा पडून सणसणीत भूक लागणं! अंगात असेल नसेल ते बळ एकवटून आयुष्यात त्या आधी कधीच न अनुभवलेल्या वेदनांना सामोरं जाताना - एरवी जे अन्न हे पूर्णब्रह्म आपल्याला पोषण देत असतं ते आपल्यापासून लांब ठेवलेलं असतं. ( वैद्यकीय गरजच असते ती पण तो मानसिक आधार आपल्याला मिळत नाही.)  त्या दोन दिवसात मला veg Broth आणि clear Jelly चा जो राग आला आहे तो मी कधी आयुष्यात विसरणार नाही ! पोषण ह्या नावाखाली माझी केलेली फसवणूक होती ती! बरं माझी परिस्थिती इतकी वाईट होती,की ह्या गोष्टी सुद्धा पोटात राहत नव्हत्या. साधा वरण तूप भात - लोणचं नाही, बटाट्याची भाजी नाही, खोबरं-कोथिंबीर मिरचीची चटणी नाही; गेला बाजार, मुगाची खिचडी पण तेव्हा चालली असती!  पण चोवीस तास मला काहीही खाता आलं नाही. ते चोवीस तास हे तीन चार दिवसांसारखे वाटले कारण एखाद्या गाडीला धडकून पडल्यावर, कुणीतरी सगळं शरीर पिळून काढल्यासारखं वाटत होतं- इतका थकवा,शीणवटा मी कधीच अनुभवला नव्हता...आणि तरीही आपलं पोर आपल्याजवळ आल्यावर तिच्यासाठीचं जीवनावश्यक पोषण त्याच शीण शरीरातून पाझरत होतं. तेव्हा कळलं दुसरा जन्म का ते...
ह्या पुनरजन्मात पाहिलं अन्न पोटात गेलं ते म्हणजे -आईने करून आणलेला डाळ मेथी आणि भात. भात बाधू नये म्हणून त्यामध्ये हिंग, जिरं आणि अखं मिरं शिजवताना घातलेलं. डाळ मेथी बाधू नये म्हणून ती खोबऱ्याच्या दुधात केलेली! गोडघास म्हणून आळीवाचा छोटासा लाडू..माझ्या दुसऱ्या जन्मातल्या, ह्या  पाहिल्या  जेवणाची चव आणि ते जेवल्यानंतरची तृप्तता मी कधीच विसरू शकणार नाही..
गेल्या तीन वर्षात मी ही डाळ मेथी माझ्या तीन चार मैत्रीणींसाठी केली आहे. त्यातल्या दोघी अभारतीय, कधीही मेथी दाणा बघितलेला नाही पण डॉक्टर्सनी Fenugreek tablets/ मेथीचा सत्व असलेल्या गोळ्या घ्यायला सांगितल्यामुळे, मी त्यांना आवर्जून डाळ मेथी करून खाऊ घातली. काल पुन्हा असाच योग आला. माझ्या अभारतीय शेजारणीला तीन आठवड्यांपूर्वी मुलगा झाला. तिची आई - delivery च्या आधी २-३ दिवस आणि नंतर चार दिवस थांबून घरी परत गेली. तिचे सासू -सासरे अजून दोन महिन्यांनी मदतीला येणार आहेत. आपल्याकडे बाळंतीणीची काळजी घ्यायला, तिच्या आहार -प्रकृतीची काळजी घ्यायला एक पारंपारिक तंत्र मांडून ठेवलेलं आहे. आहारातली पथ्य, अंगाला तेल -मसाज, चुलीपासून लांब राहणं-किती साध्या साध्या गोष्टी आहेत! माझ्यासारख्या  दूरदेशात राहणाऱ्या मुलींनासुद्धा त्यांच्या आई, सासूकडून मिळालेल्या ह्या पारंपारिक ज्ञानाचा ठेवा तारून नेतो. हे ज्ञान मिळवायला आम्हाला काही साधना नाही करावी लागली , ते आम्ही कुरकुर करूनसुद्धा , शंभर प्रतिप्रश्न विचारूनसुद्धा, आमच्या आधीच्या पिढीने आमच्या पदरात त्याची गाठ बांधून दिली आहे.  काही काही वेळेला  माझ्या अमेरिकेत राहणाऱ्या मैत्रीणींच्या मदतीला असे आधारस्तंभ नाहीत ह्याची मलाच खंत वाटते. पण जिथे कुटुंबातली माणसं मदतीला उभी राहू शकत नाहीत तिथे मित्र, शेजारी,  आपुलकीने,जमेल त्या पद्धतीने  मदतीला उभे राहतात, हे पण मी अनुभवलं आहे ! mealtrain ह्या website च्या मदतीने आम्ही सगळे शेजारी सध्या जेवणाची जवाबदारी उचलतो आहे..
काल डबा तयार करायची संधी मला मिळाली. एका छोट्या जीवाला पोसणाऱ्या आईला, मला छान तृप्त जेवायला घातल्याचं समाधान हवं होतं. तिच्या समाधानात तिच्या पिल्लाचं समाधान पण आलं! माझ्या तीन वर्षाच्या मुलीच्या 'मदतीने' मी  खूप आत्मीयतेने सगळा स्वैपाक केला, डबा भरला आणि पोचवून आले.  रात्री आम्ही तिघं जेवायला बसल्यावर नवरोबा पान पाहून खुश झाला. म्हणाला, "अरे वाह ! दोन भाज्या , कोशिंबीर, वरण, पोळी आणि भात ! इतकं साग्रसंगीत आपण पाहुणे आल्यावरच जेवतो!"  मी," खरंय" म्हणून गप्प बसले, पण डोक्यात विचार सुरु झाला...
आज दुपारी लंचच्या सुमारास मेसज आला, " Your food satisfied my soul! I didn't know I needed this until I ate it. As soon as I can I want to learn to make the Dal and the greens! Thanks a ton !" 
बाळंतीणीची तृप्त झाल्याची पावती मनाला खूप समाधान देऊन गेली, तशीच माझ्या विचारांना एक सकारात्मक दिशा पण देऊन गेली. Pregnant असतांना मी जितका आहाराचा विचार करून काळजीपूर्वक जेवायचे तितकी व्यवस्थित मी कधीच जेवलेले नाही. मुलीला दूध पाजायचं म्हणून काही काळ आहारावर लक्ष होतं -पण ते पण वाढत्या व्यापांमध्ये दुसरीकडेच भरकटलं आहे. मुलगी तीन वर्षाचीच आहे पण मला हल्ली जाणवतं की तिच्या आहाराविषयी मी जितकी जागरूक असते तेवढीच मी स्वतःला casually घेते. शरीराने जर साथ देत राहावं असं वाटत असेल तर शरीराला आपण काहीतरी सात्विक भेट देत राहिलं पाहिजे. दुसऱ्या मिळालेल्या जन्मात, सतत वयानुसार, माझ्या गरजेनुसार माझ्या पिंडाला पोषक असा आहार शोधण्याची जबाबदारी ही माझीच आहे . ती टाळून मला चालणारच नाहीये !
संक्रांतीच्या निमितांने - नवीन संक्रमण करत असतांना - स्वतःसाठी पोषक आहार शोधून, त्याचा आस्वाद घेण्याची जवाबदारी मी घेते आहे.... तुम्ही काय निश्चय करताय? 


Saturday, January 6, 2018

मेहमूद: Berkeley मधला काबुलीवाला

Sketch on Ipad sketches 

बहुदा चार वर्षापूर्वी, एका संध्याकाळी भाजी घेऊन परत घरी येत असताना, अचानक आवाज आला," Hello There!You Indian?" बर्कली मध्ये रस्त्यावर येता जाता, लोक भेटून बोलतात पण असले प्रश्न विचारत नाहीत. मी आजूबाजूला बघितलं. रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाची व्हॅन, फुटपाथ /sidewalk वर उंच, दोन अडीच फुटी मोठ्या काळ्या प्लास्टिकच्या फुलदाण्यांमध्ये फुलं, पण मला प्रश्न विचारणारा माणूस काही दिसत नव्हता. फुलं विकणारा फूलवाला सुद्धा दिसत नव्हता. चारही दिशांकडे बघत, मी स्वतःभोवती एकदा गोल फिरले. पुन्हा पुढे मागे बघितलं आणि चालायला लागले. "Scared you, didn't I ?" असं म्हणत दोन गाड्या सोडून एक खूप जुनाट, हिरवट-तपकिरी, म्हणजे पत्रा गंजून तपकिरी होतो तसा काहीसा तपकिरी हिरवट रंगाच्या सीडॅन मधून, फूलवालाच बाहेर पडला. 
भाजी आणायला जाताना मी त्याला बरेचदा बघितलं होतं, एखाद दुसऱ्या वेळेला आम्ही एकमेकांकडे बघून हसलो पण होतो, पण बोललो नव्हतो. मी कधी त्याच्याकडून फुलं विकत घेतली नव्हती. 
माझ्याकडे चालत येऊन तो माझ्यासमोर उभा राहिला, हात पुढे करून म्हणाला, "Hi ! I am Mehmood." त्याचा हात मी हातात घेतला, तो खूप भेगाळलेला आणि खरखरीत होता. मी पण पटकन माझं नाव सांगितलं आणि हात सोडवून घेतला. ह्या मेहमूदला, त्याच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांना मिठी मारून, हसत खेळत बोलत असताना मी पाहिलं होतं म्हणून त्याची भीती बीती वाटली नाही. मी त्याच्याकडे बघत होते तसं त्याचं ही निरीक्षण चालू होतंच. "What ? Not going to scold me for scaring you?" त्यानेच पुन्हा विषय काढला. मी मान हलवली, तर आश्चर्याने म्हणाला, "What ? even with this face?" त्याच्या चेहऱ्यात भीती वाटण्यासारखं काहीच नव्हतं. खूप वर्ष उन्हात रापून चेहरा सुरकुततो तसा काहीसा पण तरीही चैतन्याची एक वेगळीच झाक मेहमूदच्या चेहऱ्यावर होती. त्याच्या गालावर एक मोठी चामखीळ होती, संध्याकाळ झाली होती तरी डोक्यावर टोपी आणि जाड विणीचा स्वेटर, बेल्ट लाऊन घातलेली सैलसर जीन्स त्याची किडकिडीत शरीरयष्टी काही लपवू शकत नव्हती. 
मी हसले आणि म्हणाले, "No, not scared. You have a charming way of meeting people.." 
मेहमूद खळखळून हसला - पण कदाचित माझ्या विनोदाला नाही, त्या वाक्यात दडलेल्या सूक्ष्म निरीक्षणाला त्याने दिलेली दाद असावी ती. त्याने न सांगता त्याचा नाती शोधण्याचा, एकटेपणा घालवायचा प्रयत्न, त्याच्या "What ? not going to scold me for scaring you? even with this face?"  ह्या प्रश्नांमधून माझ्यावर आदळला आणि मी दिलेली उत्तरं त्याला भावली. जणू ह्या तीन चार वाक्यात त्याने मला मैत्र करार देऊन टाकला.
"Where is your black bead and gold necklace?" ह्याला बरं मंगळसूत्र वगैरे माहित. मी परत मान हलवली.
"I see, I am going to have to do most of the talking. Tell me yes or no , you are married, yes ?"
बापरे ! मनात आलं की ह्याच्या बद्दलचं reading चुकलंय - हा काय flirt करतोय की काय?
" Yes, married for 5 years now." मी ठसक्यात उत्तर दिलं.
" That's great Honey! So you must cook, look at all these veggies- of course you cook ! "
मी त्याच्याकडे बघत राहिले, पुढे आता हा स्वतःच  घरी जेवायला येण्याचं आमंत्रण लावून घेणार असं वाटलं..
पण मेहमूद त्याच्याच तंद्रीत होता, "I miss that spinach and cheese thing you make. What do you call it?"
"Palak Paneer." 
" I owned a restaurant once..the chef he had learnt it.."
" Oh, I can share some recipes and there are good Indian restaurants in Berkeley.."
" I know honey, I know..but the taste of home, it's different no? Anyway, I don't want to take too much of your time. Otherwise, I will have your husband come running with a stick..I don't want that, now do I ?" असं म्हणून तो माझ्याकडे पाठ फिरवून त्याच्या फुलदाण्या हलवायला लागला. कुणी फुलं घ्यायला आलं नव्हतं. अजून एखादा तास तरी तो फुलं विकत तिथे उभा राहणार होता. 
"Hi I am Mehmood" पासून मला  'honey' म्हणून, कुठल्यातरी दूरदेशाचा उल्लेख करून, एकदम घुमा झालेला मेहमूद; एखाद्या अनोळखी व्यक्तीबाबत पहिल्या भेटीत एवढे चढ-उतार फार क्वचितच घडतात. त्याला अजून फार बोलायचं नव्हतं, पण माझा पाय तिथून निघेना.
" Where are you from Mehmood?"
"Khayyam, Hafez, Siraj, look them up on the map. That's where this ugly duck comes from.." मेहमूद काही माझ्याकडे वळला नाही. पण तो त्या फुलांच्या फुलदाण्या, रस्त्याच्या शेजारच्या पांढऱ्या van मध्ये भरायला लागला. 

ह्या आमच्या पहिल्या भेटीनंतर मी पण काही लगेच पालक पनीर वगैरे करून त्याच्यासाठी घेऊन गेले नाही.  त्याच्याकडून फुलं विकत घ्यायला लागले नाही. पण आता मेहमूद मला येता जाता, " Hi Honey, Have a nice day!" वगैरे म्हणायला लागला..दोन तीन महिन्यांनी मी पालक पनीर केल्यावर त्याला डब्यात जीरा राईस, फुलके आणि पालक पनीर नेऊन दिलं. डबा देताना माझ्याबरोबर निकीत होता, त्यांची ओळख झाली. निकीतला भेटून मेहमूद मला म्हणाला, "You are a lucky woman!" 
निकीत त्याच्याबरोबर हसून म्हणाला, "Wrong thing to say man, I mean , if you want to eat more of her food!" दोघंही एकमेकांकडे बघून हसली. 
ते डबे परत करत असताना, मेहमूदने त्यामध्ये सुकामेवा भरून दिला होता. मी आणि निकीत त्याला सांगत होतो की तू आम्हाला फुलं दे पण तो म्हणाला,नाही, मी ठरवलंय की तुम्हाला सुकामेवा द्यायचा, त्यामुळे तुम्ही तो घेतलाच पाहिजे. तीन डबे त्याने काठोकाठ भरले नव्हते, पण तरीही खूपच भरले होते. त्याच्या उदारपणाचं ओझं वाटलं असतं पण आम्हाला ते तीन डबे देत असताना त्याच्या चेहऱ्यावर जो अभिमान झळकत होता तो पाहून- मी त्याला डबा द्यायच्या आधी दोन महिने वाया घालवले त्याची खंत वाटली.  
मग घरी बनणाऱ्या अनेक गोष्टी डब्यातून त्याच्याकडे जायला लागल्या. उसळी, आमटी, भडंग, बेसनाचा लाडू, दाण्याची चटणी, भारतातून आलेली ताजी बाकरवडी, आंबा बर्फी, गुडदाणी. बदल्यात नेहमी वेगवेगळ्या रंगाची, वासाची बाग आमच्या दिवाणखान्यात सजायची.
कधीतरी निकीतने वेगळ्या दुकानातून फुलं विकत घेतल्याचं मेहमूदने पाहिलं तर तो चिडलाच! निकीतला म्हणाला, "Don't you dare buy that cheap stuff again!" मग निकीतने त्याला 'official florist' ही पदवी बहाल केली. त्याला आवडलं नाही, म्हणाला, "You buy after every three full moons- official florist,my foot!" पण तरीही त्यांची गट्टी जमली. 
कधी आम्ही दोघं एकत्र जाताना दिसलो तरी मेहमूद हाका मारून बोलवी. निकीत आणि तो काहीतरी माझी टिंगल करत आणि मगच भेटीचं समाधान मेहमूदला मिळे. पुण्यात कसं भाजीवाला, वाणी, इस्त्रीवाला आपल्या घरातलेच असतात. आपल्या घरात कुठली पालेभाजी आवडते, एखादी खास भाजी आपल्यासाठीच मागवली जाते, सामानात काय येतं, साड्या इस्त्रीला आल्या नाहीत तर घरी येऊन विचारपूस होते..त्याच्यामध्ये ओळख आहे, एक त्या communityचा भाग असल्याचा भाबडा समज आहे. तो इथे अमेरिकेत नाहीये. म्हणजे मी तो बर्कलीमध्ये राहायच्या आधी अनुभवला नव्हता. पण मेहमूदमुळे माझ्यासाठी अचानक हे शहर आपलंसं झालं.  पण त्याने सोडलेलं, त्याचं ते आपलंसं शहर,देश, त्याबद्दल तो कधीच बोलला नाही. 
इराच्या जन्मानंतर काही महिने हे मेहमूद बरोबरचं हसणं-बोलणं बंदच पडलं. २-३ महिन्याची असताना मेहमूदने तिला एकदाच उचलून घेतलं होतं, पण तिला ते आवडलं नाही, ती खूप रडली. तिच्या रडण्याला न जुमानता, मेहमूद म्हणाला, " Sweety, you will have to learn to like me. I am not going anywhere."
माझ्या पहिल्या mothers day ला भला मोठा गुच्छ देऊन, दोन दिवस आधीच मेहमूद ने मला शुभेच्छा दिल्या, "Its the toughest thing you will ever do. But I haven't received a box in well over a year now!"  Pregnancy आणि इराच्या जन्मानंतर जवळ जवळ वर्षभर खरच मी त्याला विसरूनच गेले होते. आणि इराला त्याच्या दुकानाजवळ घेऊन गेलं की ती त्याचा आवाज ऐकला, त्याला पाहिलं की जोरात रडायला लागायची.  मग इरा साधारण दीड वर्षाची झाली आणि त्यांचं गणित बदललं. मेहमूद तिला त्याच्याकडच्या मनुका, भुईमुगाच्या शेंगा, खारे दाणे द्यायला लागला. तिला वेगवेगळ्या पक्षांची साद कशी असते ते आवाज काढून दाखवायचा. आता त्याचं लक्ष फक्त इरा असे, मला जुजबी , काय? कशी आहेस? एवढंच  विचारे. पण इरा बोलते का, चालायला लागली का? अशी विचारपूस सुरु झाली. मेव्याचं रुपांतर फुलं देण्यात कधी झालं कळलंच नाही. 
आता इराच्या शाळेच्या मार्गावर मेहमूदचं फुलांचे दुकान आहे. शाळेतून परत येताना तो भेटला नाही, त्याच्याकडून हक्काने फुल मागून घेतलं नाही तर इरा अस्वस्थ होते..." मेहमूद कुठे असेल?" ,
" तो कुठे राहतो ?" ,
 " त्याने दुकान का नाही उघडलं ?" ,
 " त्याची पाठ का दुखते ?",
" त्याचे डॉक्टर कुठे आहेत ?",
" त्याची आई कुठे आहे ?",
" त्याच्याकडे घरी अप्पू, बनी, हत्ती , ball pit आहे का ?"
 तिच्या प्रश्नांनी मला ही अस्वस्थ करून टाकते.
आमच्या चार वर्षाच्या मैत्रीत, मेहमूद बद्दल असले खूप प्रशन अनुत्तरीतच आहेत.  मेहमूद अजून आमच्या घरी कधीही आलेला नाही, त्याचा पत्ता आम्हाला माहित नाही. गेल्या वर्षभरात त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे तो कधी दुकान उघडतो, कधी आठवडा- आठवडा गायब असतो. फुलांसारख्या नाशवंत वस्तूंचा व्यापार करून,  तो काय असा नफा कमवत असणार आहे? आणि त्या उपर त्याचा उदार स्वभाव ! काही काही वेळा वाटतं , मेहमूद फक्त त्याची माणसांची गरज भागावण्यासाठी फुलं विकतो. लोकांच्या सुख दुखात त्याला काय काय आठवत असावं; नवीन टवटवीत फुलं आणून त्याला हाजारो मैल लांब जगण्याची उमेद मिळत असावी, जुनी फुलं त्याला जे गेलं, नासून गेलं त्याची आठवण देत असेल,पण ते फक्त त्याच्या बद्दल घडत नाही , दिवस रात्र सृष्टीत  फुलणं आणि कोमेजणं घडतच असतं,  ह्याची सतत आठवण देत असेल.
मेहमूदचा चैतन्याचा झरा कुठून उगम पावतो?  त्याची फुलं , त्याची जगण्याची उमेद,  का त्याचं स्वतःला , इतर कुणाला पूर्वायुष्यात दिलेलं एखादं वचन...? माहित नाही. But he really has a charming way of meeting people! मला त्याचं भेटणं हे पूर्वीचे काही ऋणानुबंध आहेत असंच वाटतं. त्याच्या सारखी लोकं ज्यांना भेटतात,  त्यांच्या मनावर ठसठशीत पाउलखुणा सोडून जातात...
रबिन्द्रनाथ टागोरांच्या "काबुलीवाला" कथेला प्रकाशित होऊन, २०१७ मध्ये १२५ वर्ष पूर्ण झाली. त्या कथेत अब्दुर रेहमान खुनाची शिक्षा म्हणून तुरुंगात जातो. मिनी मध्ये त्याला त्याची मुलगी दिसत असते..
मेहमूद तर त्याला भेटणाऱ्या प्रत्येकातच काहीतरी मागचं आणि काहीतरी आठवणीतलं शोधत असतो.. अमेरिकेने नुकत्याच केलेल्या ठरावामुळे, मेहमूदला आता त्याच्या देशात गेला तर अमेरिकेत परतता येईल ह्याची शाश्वती नाहीये...म्हणजे आधी त्याला खूप आस होती पण तो जात नव्हता, पण आता तर, हा देश का तो देश? अशी स्थिती निर्माण झाली आहे. मायदेशी गेला तर इथे वसवलेलं सगळं विसरावं लागणार आणि नाही गेला तर तिथे वसलेलं मनात तरळत राहणार.... इथली नाती घट्ट करायची तर मनाची दारं उघडी करावी लागणार, खोलात शिरावं लागणार आणि ते करायची त्याची तयारी होईल का ? मेहमूदला एक तरी पैलतीर भेटावा... किती आहे त्याच्याकडे जे नदीत वाहता वाहता वाहून जाईल...त्याच्यानंतर ते कुणाकडे जाईल? 

Tuesday, January 2, 2018

Thalipeeth In a Jar: जुना ऐवज ,नवीन साज

Pinterest वर गेले दोन वर्ष cookies in a jar, cakes in a jar, soup in a jar असे बरेच फोटो आणि पोस्ट्स बघत होते. बेकिंग च्या बाबतीत प्रमाण अगदी परफेक्ट नसेल तर पदार्थ नीट बनत नाहीत. त्यामुळे कुणाला तरी आपण भेट म्हणून एखादी वस्तू द्यायची आणि मग ती फसली , नीट झाली नाही तर त्या 'home made' लेबल ला काहीही महत्त्व नाही , शिवाय आपण काहीतरी खास करून दिल्याचं आपल्याला समाधान नाही. बेकिंग चे काटेकोर प्रमाण आपल्याला काही नीट पाळता येणार नाही म्हणून मी ती कल्पना , दिसायला कितीही आकर्षक असली तरी डोक्यातून काढून टाकली.
पण यंदा आमच्या घरातल्या छोट्या माणसाला शाळेत christmas गिफ्ट म्हणून cookie in a jar मिळाली आणि परत एकदा  हे वेड आमच्या घरी आलं. मला पण हे mason jar / काचेच्या जाड बाटल्यांमध्ये आकर्षक वाटेल अशी  काहीतरी गिफ्ट/खाऊ  बनवायचा  होता पण त्याला काहीतरी भारतीय, मराठमोळा साज द्यायचा होता. मग हे वेगवेगळ्या मिश्र पिठांचं, थालीपिठाचं सुचलं.  मराठी घरात शक्यतो थालीपीठ हे बनतच. शिवाय भारताबाहेर राहणाऱ्या आम्हा मंडळींना ही अशी भेट तर खूपच nostalgic करणारी,  close to our hearts! म्हणून मी नवीन वर्षाची भेट म्हणून अशा १२ बाटल्या तयार केल्या. एकावर एक वेगवेगळ्या रंगांचे पिठांचे थर, थोडे oats, सगळ्यात वर शोभेला ,हळद, तिखट, धणे-जिरे पूड आणि तीळ!

बाटल्या मोठ्या असून त्या पूर्ण का भरल्या नाहीत? तर ह्या भेटीची मजा अशी आहे , की एकदा ही बाटली / mason Jar उघडला की तो लगेच संपला पाहिजे. बाटली हलवली की त्यातले वेगवेगळे थर एकमेकात मिसळतात आणि मग त्यातली सगळी मज्जाच निघून जाते. त्यामुळे एका वेळेला मध्यम आकाराची ८-१० थालीपीठं होतील ( आम्ही शक्यतो रात्रीचा स्वैपाक दुसऱ्या दिवशी लंच ला घेऊन जातो म्हणून ८-१० ) एवढे पीठ मी वापरले आहे. ह्या मिश्रणात फक्त कांदा, मीठ, कोथिंबीर/ पालक/ मेथी / kale कुठलिही हिरवी पालेभाजी घालून ह्याची थालीपीठं लगेच लावता येतील. परदेशातच नाही तर भारतात सुद्धा अशी हे बाटली खाऊ म्हणून कुणाला भेट द्यायला काही हरकत नाही!

कृती: स्वच्छ धुवून, कोरडी केलेली  काचेची बाटली घ्या. मी १०-१५ सेकंद्स hair dryer फिरवून घेते म्हणजे काही ओलावा असेल तर तो पूर्णतः निघून जातो. मग बाटली भरताना
दोन डाव गव्हाचे पीठ,
त्यावर एक डाव नाचणीचे पीठ,
मग एक डाव तांदळाचं पीठ,
त्यावर मुठभर oats,
मग दोन डाव डाळीचे पीठ,
एक डाव उडदाचे पीठ,
परत एक डाव नाचणीचे पीठ,
मग परत मुठभर oats,
वरती तिखट, हळद, धणे -जिरे पूड ( अंदाजाने.मी माझ्या मसाल्याच्या डब्यातले २ -२ -३ चमचे प्रत्येकी वापरले)
२ मोठे चमचे तीळ सगळ्यात वरती पेरले.

अतिशय सोपी 'खाऊ' भेट मिळालेल्या माझ्या मैत्रिणी खुश झाल्या ! मला एक डोक्यातलं Fad निभावल्याचं समाधान मिळालं. तुम्हाला आवडल्यास तुम्ही पण करा आणि निश्चित द्या !  शुभेच्छा !

For the last two years, Pinterest has these amazing, homemade gifts pins about Cookies in a jar, Cake in a jar, Soup in a jar , with very enticing photos. You have to be very particular about the measurement of ingredients when baking anything, or else they don't turn out well. Then the whole purpose of gifting a homemade goodies gift is lost. I wasn't sure about how well I could follow the baking goods instructions and was very reluctant to try my hand at making these gifts. But I was very much interested in exploring the idea. Until  I could find a solution to the whole baking ingredients proportion dilemma , I kept this idea on the back burner.
But then this year, as a Christmas gift , my kid received a ' chocolate chip cookie in a jar' gift, and the whole meal in a jar frenzy became alive for me again. I wanted to try my hand but give it an Indian, Maharashtrian twist. That's when I settled on the idea of Thalipeeth in a jar ! Even in the US, so far away from Maharashtra there is hardly any Marathi family that doesn't cook Thalipeeth at home. So making this was nostalgia inducing and something close to my heart. I made 12 such mason jars as a New Years gift. It is such a simple and yet nourishing gift , that I thought it worthwhile to share with this group that has so many readers living overseas.
Why did I not fill up the bottles completely? The whole purpose of the meal in a jar , treat in a jar concept is that it has to be used up /cooked/consumed all at one time. Once you turn the bottle to pour out the ingredients than the layering is lost and with that the visual appeal of the gift is lost too. So I filled the bottle with only enough flour mix to make medium sized 8-10 Thalipeeth.( so that it is enough for dinner and lunch the next day). Hence the half filled bottles!:)


Directions: Wash and dry the mason jar before use. I also used a hair dryer on the inside of the bottle to make sure that there was no moisture left. For the layering :
First I added two scoops of Wheat flour,
Then I added one scoop of Raagi or Naachni flour,
One scoop Rice floor,
One handfull of rolled oats,
Two Scoops of Chickpea flour,
One scoop of Udad or Split Gram Flour,
One more scoop of Naachni Flour,
Another handful of rolled oats.
The topmost layer was made up of Red chilli powder, Turmeric powder, Corainder and Cumin powder( I used 2 teaspoons of chilli and turmeric powder and 3 teaspoons of coriander and cumin powder,)
I sprinkled 2 tablespoons of  Sesame seeds on top.

All that needs to be added to this mixture is Salt, chopped onions, liberal portion of greens like spinach, Kale, fenugreek, Chard, whatever is your green leaf of choice.
This is a wholesome goodies gift to give. If you liked it, grab a mason jar and make one for your friends! Happy New Year!






Monday, January 1, 2018

Nostalgia

२०१७ सालचा शेवटचा 'पंधरवडा' लिहून साजरा करणं मला खूपच आवडलं. पंधरवड्यात खरच दररोज लिहू शकले असते तर १५ लेख/ कविता /ललित लेखन झालं असतं पण १५ पोस्ट्स मला लिहायला जमल्या नाहीत. कदाचित पुढच्या वर्षी मी पुन्हा तसा प्रयत्न करेन. २०१७ मध्ये पहिल्यांदाच मला जाणवलं की खूपसं मी केलेलं लिखाण "nostalgia' वर आधारित आहे. त्यामध्ये खूप लहानपणीचे , पुर्वायुष्याचे, भारतात राहण्याचे , शाळा- कॉलेजचे उल्लेख आहेत. हा एवढा Nostalgia येतो कुठून? कशासाठी ? हा मला पण प्रश्न पडला..म्हणून थोडसं त्याच्या शोधात निघाले.

कधी एके काळी हा nostalgia म्हणजे आजार समजला जायचा. १७ व्या -१८ व्या शतकात ,फ्रांस आणि इटली मध्ये पाठवलेल्या स्विस सैनिकांना त्यांच्या fondue, raclette cheese आणि उंच पर्वत रागांची आठवण येऊन त्यांना हा 'nostalgia' आजार होत असे.  Johannes Hofer ( १६६९ -१७५२ )नावाच्या स्विस वैद्यकीय विद्यार्थ्याने-त्याच्या थिसीस करता  'nostalgia' ह्या शब्दाला जन्म दिला . ग्रीक शब्द nostos म्हणजे घरी परतणे आणि algia म्हणजे यातना /विरह /दुख; हे दोन ग्रीक शब्द जोडून जन्माला आला 'nostalgia' हा शब्द. ह्या शब्दातच घरापासून तुटल्याचा विरह, त्या घरी परत जाण्याची ओढ , सगळंच आलं. ह्या diagnosis च्या बळावर ह्या स्विस सैनिकांना घरी पाठवलं जायचं, पण हा कुठल्यातरी प्रकारचा मानसिक आजार आहे असं समजून, बिचाऱ्यांना बरीच मानहानी सोसावी लागायची, कधी कधी तर थेट मानसिक रुग्णांच्या इस्पितळात पाठवलं जायचं  ! त्यामुळे हा nostalgia नको आणि त्याहूनही तसं कुठल्या डॉक्टरचं आपल्या बद्दल निदान नको असं अनेक सैनिकांच्या मनात आलं असणार ! पण माणूस कधी आपला पिंड विसरू शकत नाही. मराठी माणसाला जगाच्या कुठल्याही कोपर्यात गेल्यावर जशी  सह्याद्री रांगा ,बटाटेवडा आणि पुरणपोळी आठवते तसच fondue आणि बर्फाच्छादित पर्वतरांगा विसरेल, तो कसला खरा स्विस? बिचारे अनेक स्विस सैनिक अनेक वर्ष परक्या देशात त्या मायभूमीसाठी  झुरत राहिले असणार ! 
आणि जे घरी परत पाठवले गेले ,त्यांना तरी ते घर परत गवसलं असेल का ? कारण घर म्हणजे फक्त राहतं घर, जागा , त्या जागेतली लोकं , मायदेश, फक्त ह्या गोष्टी नसून घर हे जिथे सुरक्षित वाटलं अशी जागा , ज्या नात्याने उमेद दिली ते नातं, निष्पाप -भाबडेपणा शाबूत असलेले दिवस, शेखचिल्ली स्वप्नांचे दिवस, असंही बरच काही ह्या ' घर' ह्या संकल्पनेत आहे असं मला वाटतं .त्या 'घरी' ,एकदा  तिथून निघून बाहेर पडल्यावर  परत कधीच जाता येणार नसतं..कदाचित म्हणूनच आपल्याला नेहमीचं आयुष्य जगताना ,त्या आता स्पर्शा बाहेर गेलेल्या , उलटलेल्या पानांची इतकी आठवण होत असावी.
मी पुणं, भरत सोडून आता जवळ जवळ आठ वर्ष झाली आहेत. आई होईपर्यंत माझ्या जगण्यात,लिखाणात, विचारात हा nostalgia काही सारखा डोकावत नव्हता. आमच्या छोट्या माणसामुळे स्वतःचं बालपण परत आठवायला लागलं. तिला जगाची ओळख करून देत असताना , आपण त्या जगात कोण आहोत, आपली जागा कुठे आहे, आपली Identity काय आहे? ह्याचा पुनर्विचार सुरु झाला आणि मग nostalgia हा एक नवीन मित्र माझ्याबरोबर वावरायला लागला.  जगात सगळीकडेच सध्या अस्थिरता, अशांतता, असहिष्णुता आहे. त्यामुळे स्वतः च्या पुनर्विचाराबरोबरच, त्या छोट्या माणसाला ह्या सगळ्याला सामोरं जायला, आपल्यालाच सज्ज करायला लागणार, ह्या विचारानेच पोटात गोळा आला. पुन्हा एकदा माझ्या पिंडाच्या सुरक्षित गुहा मी शोधायला लागले आणि जुन्यादिवसात रमले.
भविष्यबद्दल आकस्मात  भीती  छातीत धडधडायला लागली की एखादी जुन्या, तरल  आठवणीवर  मी स्वतःचे लक्ष केंदित करते. ह्याचा तात्पुरता तरी नक्कीच फायदा होतो. Nostalgia हा काही नेहमीच गोड गोड , हसऱ्या आठवणीचा नसतो - पण त्यात काहीही अनपेक्षित घडणार नसतं, जे काही बरं वाईट व्हायचं होतं ते होऊन गेलेलं असतं. त्याच्यावर मात करून आपण पुढे पाउल टाकलेलं असतं किंवा त्या जुन्या घटनेपाशी, आपलाच हरवलेला एक कवडसा पुन्हा येऊन आपल्या कवेत शिरतो ! आपल्या असण्यात अजून अजून भरच पडत असते..
हे nostalgia बद्दल छान छान वाटून घेणं, फक्त माझ्या बाबतीत घडतं असंच नाही.   November २०१३ च्या Personality and Social Psychology Bulletin च्या अंकात Wing-Yee Cheung, Tim Wildschut, Constantine Sedikides, Erica Hepper, Jamie Arndt, and Ad Vingerhoets ह्या अभ्यासकांचा एक संशोधन प्रबंध छापला आहे . त्यांच्या मते, nostalgia मुळे लोकांना भविष्याबद्दल  जास्त आशावादी वाटू शकतं. एका संशोधनात ,आयुष्यातल्या nostalgic घटनांबद्दल , आठवणीनबद्दल लिहितांना विद्यार्थ्यांनी जास्त सकारात्मक,आशावादी शब्द वापरले होते.   दुसऱ्या संशोधनात , त्यांनी वेगवेगळ्या वायोगटातल्या लोकांना nostalgia जागृत करण्यासाठी जुनी गाणी, जुन्या कविता किंवा गाण्याचे बोल ऐकवल्यावर, त्या लोकांनी दिलेली उत्तरं पण जास्त सकारात्मक होती. ह्याची दोन कारणं आहेत, nostalgia मुळे लोक्कांना इतर लोकांबरोबर जोडणारा एक सामाजिक दुआ सापडतो, ह्या छोट्याश्या connection मुळे लोकांना स्वतः बद्दल छान वाटतं , त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, ह्यामुळे भविष्याबद्दल optimistic वाटायला लागतं. 
JK Rowling ने ह्या nostalgia चा एक शास्त्र म्हणून वापर केला आहे - किंबहुना आमच्या पिढीतल्या अनेकांना त्यांनी जपमंत्र दिलाय. Dementors शी लढायला, त्यांनी हल्ला केल्यावर, मनात पसरलेल्या अंधारावर, तळपायात , मस्तकात शिरणाऱ्या थंडीवर, मात करायला फक्त आणि फक्त पूर्वायुष्यातल्या मनोहर आठवणी ह्याच एकमेव शस्त्र आहेत. त्या आठवायला, त्यांचा हत्यार म्हणून वापर करायला इतर कुणाची मदत लागात नाही, स्वतः लाच ती भरारी घ्यावी लागते... ते भरारी घेण्यासाठी आत्मविश्वास गोळा करणं, त्या मनोहर जागी स्वतःला प्रवास करून घेऊन जाणं, हे कदाचित त्या शेवटच्या भारारीपेक्षा अवघड आहे!
Nostalgia आणि लिखाण दोन्हीही मला उमेद देतात, उर्जा देतात. म्हणूनच मी बेधडकपणे ह्या nostalgia बद्दल , nostalgic होऊन लिहित राहणार आहे ...