facebook

Friday, January 26, 2018

भडभुंजा / The grain popper man



आई बाबांनी आम्हा तिन्ही मुलांना इंग्रजी मीडीयम शाळेत घातलं म्हणून एका नातलगाने, " जात भडभुंजाची आणि मिजास बादशाहची!"  असं काहीसं उपरोधात्मक त्यांना ऐकवलं होतं. इंग्रजी शाळांच्या फिया जास्त, आई –वडीलांच्या तोटक्या पगारात तीनही मुलांची शिक्षणं कशी होणार? अशा अर्थाचे असावे ते कदाचित. मी शेंडेफळ; त्यामुळे माझ्या समोर हे घडलं नसलं तरी त्याची वाच्चता आम्हा तीनही मुलांसमोर अनेकदा घडे. मला ही म्हण त्या न कळत्या वयातही अजिबात आवडत नसे. कारण मला भडभुंजाचे दुकान, तिथे स्वच्छ पांढऱ्या पोशाखात वेगवेगळे चविष्ठ जिन्नस विकत बसलेले काका, कढईतला घमघमणारा खमंग वास, मला खूप आवडत. त्यांच्या दुकानात मांडून ठेवलेला खाऊचा खजिना पाहून मला नेहमीच, "आई खूप काटकसर करते, आमुक-तमुक-आमुक घेतच नाही!" असं वाटत असे. आम्ही घेतलेल्या पाकिटात नाही असे काहीतरी नक्की समोर धगीवर परतत, फुटत, असे. वेगवेगळ्या प्रकारची धान्य, धगीवर फोडून, त्यातून तयार झालेले चुरमुरे, कुरमुरे, मुरमुरे, लाह्या! अहा! डोळ्यासमोर आत्ताही ते दुकान आहे, लहानपणच्या खूप साऱ्या खाऊ विषयक आठवणी त्या दुकानातल्या, गोणपाटाच्या पोत्यांमधल्या  जीन्नसात अडकल्या आहेत!

आई आणि तिच्या दोन्ही बहिणी पुण्यातल्या कन्याशाळेत जायच्या.  शाळेच्या अलीकडच्या चौकात हे भडभुंजाचे दुकान आहे. तेव्हापासून, म्हणजे त्यांच्या लहानपणापासून चुरमुरे, खारे दाणे, लाह्या, कोरडी भेळ , फुटाणे हे इथूनच घेतले जायचे. आई आणि तिच्या भावंडांची एक Mad अवड आहे - त्या चौघांना ताजे चुरमुरे आणि कोवळा मुळा खायला खूप आवडतो. म्हणजे लहानपणी आम्हाला कधी बागेत घेऊन गेल्यावर "भेळ खायची आहे का?" असं विचारल्यावर, “हो” म्हणायच्या आधी नक्की कुठल्या प्रकारची भेळ? ह्याची खात्री करून घ्यायला लाग्याची. म्हणजे आम्हा मुलांच्या डोक्यात भेळेच्या गाडीवरची चिंच-गुळाची चटणी घातलेली ओली भेळ असे पणआई मावशीच्या मनात वेगळीच भेळ बनत असे. ताजे चुरमुरे, नावापुरतं फरसाण( नसलेलं पण चालायचं ) कच्चे किंवा खारे दाणे, आणि कोवळा मुळा - झालीच त्यांची भेळ. खरं सांगते, आईला पण हे अगदी प्रकर्षाने सांगितलं आहे; हे मुळा -चुरमुरे समीकरण मला अजिबात आवडत नसे. आत्ता विचार करते तेव्हा जाणवतं की आई फक्त ताज्या किंवा भडभुंजाकडून  आणलेल्या चुरमुर्याशीच मुळा खायची. जसं हे पाकिटातले चुरमुरे, हलवाईकडचे फरसाण आणणं सुरु झालं तसं आईची, तिच्या style ची भेळ खाणं बंदच झालं. त्या खाऊ मध्ये तिच्या लहानपणीच्या आठवणी दडलेल्या असणार. वर-वरचे चणे-फुटाणे, आवळा-चिंचा-बोरं-कैऱ्या-पेरू, पाच -दहा आण्यात जे येयील ते ती चौघं भावंडं वाटून घेत, आणि त्या थोडक्यात केलेल्या मजेत खूप आनंद लुटत. त्यांचे लाड पुरवण्यासाठी कुणीच साग्रसंगीत थाट मांडत नसे.त्याला वाढदिवस-सणाचे अपवाद असतील कदाचित पण 'थोडक्यात मजा' असाच कानमंत्र असे. पण हे सगळं मला खूप नंतर उमगलं...आपण लहान असताना आपल्याला काही आईच्या बालपणाविषयी, तिच्या बालपणातल्या आवडी निवडीशी घेणं देणं नसतं! तेव्हा, ती फक्त आपल्या आवडीनिवडी सांभाळणारी एक बाई असते ! 
लग्नानंतरही आई रास्तापेठत राहिल्या गेल्यावरह्याच दुकानातून ह्या गोष्टी घेत असे. अपोलो थेटर जवळची ‘interval’ दुकानातल्या भेळेची चटक लागली असली तरी कोरडी भेळ आवडायचीच! आजोळच्या वाड्यात गेल्यावर, तिथून परत घरी जाताना ह्या दुकानातून निदान कोरड्या भेळेचा एक 'पुडा' घेणे हे आईला अपरिहार्य असे. ती कधी मोकळ्या हाताने आली तर मी नाराज होत असे. आम्ही मुलं बरोबर असलो कि भडभुंजाकडून कधी गरम कढईतले खारे दाणे, कधी मुठभर फुटाणे आमच्या हातावर पडत. ह्या खाऊचे खूपच अप्रुप वाटायचं, खूप खूप special वाटायचं! आईची आणि त्यांची तोंडओळख होतीच, तिच्याकडे पाहून ते हसले की, किंवा कधी "आज खूप दिवसांनी/ महिन्यांनी?" असं म्हणाले की मला एक वेगळाच आनंद होत असे. त्या काकांनी कधी मला माझं नाव विचारलं नाही, कधी मी त्यांना किंवा आईला त्यांचं नाव विचारलं नाही...पण माझी आणि त्यांची तोंड ओळख राहिली नाही..(लेख वाचून, त्याच दुकानात वर्षानुवर्ष जाणाऱ्या एकांनी त्या काकांचे नाव कळवंलं - रामदिन बुद्धीलाल परदेशी. नाव कळलं पण म्हणून ओळख अजून वाढली असं वाटलं नाही..)
आज त्यांच्यासमोर उभी राहिले, दुकानात खरेदीला गेले तर माझ्या मुलीच्या हातवार ते थोडीच चार दाणे ठेवणार आहेत? कदाचित तिची चिव चिव ऐकून ठेवतील सुद्धा, पण त्यांच्याकडे येणाऱ्या इतर गिऱ्हाइकांसारखीच मी पण एक असेन. एक पिढीजात नातं बांधता आलं असतं का? का आता ते राहूनच गेलं? 
मी इथे अमेरिकेत मैलोन मैल लांब राहून त्या दुकानाबद्दल लिहिते आहे आणि आजही ते दुकान तिथेच आहेत्याच्या आसपास असणारे पूर्वीचे वाडे पाडून, आता तिथे ईमारती झाल्या असल्या तरी  दुकान तसच उभं आहे! तसच नातं आमचं ही आहेच..

आम्ही कोथरूड, डहाणूकर कॉलोनी मध्ये राहिला गेलो तरी आई  'गावात' जाणार असेल तर हमखास भेळ, साळीच्या, ज्वारीच्या, मक्याच्या लाह्या, खारे दाणे, फुटाणे  घेऊन यायची. नंतर शिंग फुटल्यावर त्यांच्याकडे, "चना जोर आहे का ? तिखट दाणे आहेत का ? भडंगाचा मसाला आहे का?"  असले आईला सुझाव देणं सुरु झालं. तोपर्यंत, बागेबाहेर किंवा ठराविक चौकात भेळेच्या गाड्या होत्या तशी  जागोजागी भेळेची दुकानं जसे की गणेश भेळ, मनिषा भेळ, साईबा इत्यादी दुकानांचे आम्ही चाहते झालोच होतो. स्वीट काँर्न भेळ, मटकी भेळ आणि काय कायची चटक लागायला लागली होती.पण तरीही ' खडा माल' आम्ही ह्याच दुकानातून आणीत होतो. 

माझ्या बाळंतपणाला अमेरिकेत येताना आई तिकडूनच साळीच्या आणि ज्वारीच्या लाह्या घेऊन आली होती.फरसाण मात्र काका हलवाईचे एक किलो.म्हटलं," भेळेचा एखादा पुडा आणायचा भड्बुंजा कडून!" तर म्हणाली, "तुलाच आवडतं न शेलकं सगळं, म्हणून हे आणलं. निदान ३-४ दा तरी भेळ करून खाशील! एका पुड्यात काय भागणार तुमचं?"  तिचं म्हणणं पटलं, पण त्या खास पुड्याची जास्त आस वाटायला लागली. त्या एकाच पुड्यात तर माझ्या लहानपणी आम्ही पाच जण तृप्त होऊन जात असू...
आज मी कॅलिफोर्निया मध्ये राहत असल्यामुळे मला ज्वारीच्या, साळीच्या लाह्या, कोल्हापुरी मुरमुरे सुद्धा भारतीय दुकानात मिळतात. बर्कली मधल्या काही दुकानात organic puffed rice, Puffed millet असलं काय काय मिळतं. म्हणूनच प्रकर्षाने मला लहानपणचं हे सगळं इतकं ठळक आठवायला लागतं...
आज सगळीकडे  diet conscious जगात ,चुरमुरे, कुरमुरे, मुरमुरे, लाह्या ह्या आरोग्याला चांगल्या मानल्या जातात. पण त्या आपण mass production मधून तयार होऊन, पाकिटात  एकावेळेला लागेल त्या पेक्षा जास्त ऐवज भरून बंद केलेल्या, दुकानात अनेक दिवस, महिने राहून मग आपण ती पाकिटं घरी आणतो. ताजं, कढईत फोडलेलं धान्य आणि पाकिटातलं तेच फोडलेलं धान्य, ह्यांच्या चवीत फरक पडतो तो फक्त त्यांच्या production process मुळे नाही त्यांच्या ताजेपणामुळे सुद्धा. पूर्वी हलवाई,bakeries, वडापाव-भजीच्या गाड्या कमी होत्या, आजकाल प्रत्येक कोपर्यावर असतात. पण आता पूर्वी सारखी भड्बुंजाची दुकानं नाहीत. Maggi, ‘no one can eat just one’ Lays, आमच्या आयुष्यात यायच्या आधी, खाऊ हा घरी बनवलेले तेल-पोहे, दडपे पोहे, सांजा, उकड नाहीतर भडभुंजा करून खडा माल आणून त्यावर काहीतर पाककला मंत्रून तयार केलेला खाऊ, एवढाच असायचा. कधीतरी बादशाही हॉटेल मधला 'potato toast' किंवा हिंदुस्तान bakery मधला पॅटीस. आमच्या पुढे पर्याय कमी असतील पण त्याचा ठेवा पोटोबा आणि आरोग्य दोन्हीला पोषक होता. खाद्य संस्कृतीच्या कक्षा रुंदावल्या तशाच काही जुन्या, साध्या, सात्विक गोष्टींचा विसर पडला किंवा त्या क्वचित करण्याच्या, उपभोगण्याच्या यादीत जाऊन पडल्या! माझ्या nostalgia मुळे मला मिळालेला बालपणातला हा भडभुंजाच्या दुकानातला ठेवा खूप समृद्ध वाटतो. मी त्यांची ऋणी आहे, अर्धवट राहिलेला परिचयाचा सोहळा पण पूर्ण करायचाय, त्यामुळे पुढच्या खेपेत माझ्या मुलीला घेऊन त्यांची दुकानभेट निश्चित!  



Note: I was not able to find a literal translation for Bhadbunja in English. I have therefore, named him the grain popper man.
When my parents decided to enroll all three off springs in an English Medium school, a close relative had remarked, “Cast of a grain popper but the loftiness of an emperor!”. I think they were indirectly referring to the fact that the fees for English medium schools were steep and my parents didn't have a disposable income on their paltry salaries, so the insistence to send us to English medium schools was lofty on my parents part. I am the youngest of the the three, so none of this was said in front of me, but all three of us siblings were privy to a repeat echo of this sentence for many years during our younger days. I didn't understand the underlying casteism or gravity of the sentence in itself, but I didn't like this comment/ saying/ idiom for the mere fact that an outing to the grain poppers shop or the Bhadbhunja was one of my most favorite things to do. He would sit in pristine white clothes amongst the gunny bags holding his wares. On one side of the shop, there was a huge cast iron pan, burning over wood and coal and the most delectable aroma of roasting grains, caramelizing corn, would bewitch any passerby to enter the shop. It was a treasure trove of snacks, really, every time I visited the shop with my Mother I would think,“ Mom is such a penny pincher, she never buys, x,y,z any of that other stuff.”There would be crunchy pops popped from rice, millet, shorghum, corn, roasted peanuts, chickpeas.The  grain popper- man would store all this in gunny bags which were folded down in neat layers on the outside, as the stuff sold off. I have such a clear visual memory of his shop, and the grain popper sitting in the middle of it all..So many of my memories of mouthwatering snacks, and crunchy munchies are associated with the grain popper man and his wares!
My mother and her two sisters studied at the ‘Kanyashala’ /Girls school in old Pune. Just one block before the school there was this grain popper shop. So since their childhood, puffed rice, salted peanuts, puffed shorghum, dry mix of bhel ( minus the sweet tamarind and cilantro-chili sauce) roasted and salted chickpeas with their outer brown covers, all of these were brought only from this one shop. My mom, aunts and uncle have a queer food habit- they love eating freshly popped, puffed rice with tender radishes. As kids, when we picknicked in a park and any of my Aunts or mom asked if we wanted to eat Bhel, we would have to first ascertain what their idea of Bhel was. We would be fantasizing eating some mouthwatering street food and their intention would be to serve us some fresh puffed rice, radishes with salted or unroasted peanuts, and a mostly non existent serving of some farsan,( savory lentil noodles, bits and mix) To be very frank, and I have confessed this to my mother recently, I hated this combination. When I retrospect, I realize that mom only savored this kind of bhel when we bought fresh puffed rice from the grain popper.  As we started buying pre packaged puffed rice, and savory lentil flour mixes from the sweet seller, Mom just stopped mixing it with tender radishes. I think she must have had a lot of childhood memories associated with the enjoyment of this simple snack.But as a child I was least bothered in understanding my Mom’s childhood or her likes and dislikes. At that point in time, my mom was just a woman in charge of taking care of my likes and dislikes.
When mom moved away after marriage, she still continued buying these snacks from the grain popper. Whenever Mom visited her parents, it was obligatory for her to bring atleast a small parcel of Bhel from the shop. If she returned empty handed I would be cross with her. If we accompanied Mom to the shop, the grain popper man would give us a handful of roasted chickpeas or salted peanuts!  Its impossible to explain how this small treat made us feel special- but it did!  When we moved far away- ( 10-kms was a lot of ground to cover) we still continued our patronage. If mom or Dad was visiting that part of the old city, they would haul a bag of our favourite snacks, bhel, puffed rice, puffed shorghum and jowar, salted peanuts and salted chickpeas. As we grew up, we started making special requests, we pushed our parents to inquire if the grain popper man had chana jor garam( flattened and crunchy chickpeas), if he had spicy peanuts, if he had a special spice mix to make Bhadang/ spicy puffed rice... By that time, besides the street food carts the concept of Bhel-Paani puri shops was well established , and as a family we had started frequenting these shops. But time and again we would continue to buy the raw material from the grain popper shop and enjoy them as snacks. 
As I sit and write this article, I am a bit ashamed of myself. In all the years that I frequented the shop,  and the place and food that has front space in my memories, I have no recollection of the name of the shop, or the name of the grain popper man who gave me many a special treats...The shop stands exactly where it was, the old Waadas that stood around it have been long demolished and in their place stand new tall buildings. But the old shop with the wooden slatted double doors, is still standing tall and proud.
Because I live in California, which is a big Indian hub, there are many Indian stores and hence, easy access puffed rice, puffed shorghum. I even get Kolhapuri Murmure, which is a wider than the normal type of puffed rice, in Berkeley. Some health food stores also carry organic puffed rice, Puffed millet- but all of these are pre packaged. Well, since pre packaged meals are the rage of our times, I shouldnt be complaining. I dont complain, I start reminiscing about the past..
Today, in the diet conscious Indian meal plan – puffed rice, Bhel without the high sodium tamarind and green sauces, puffed Shorgum, flattened chickpeas, roasted chickpeas are all positively healthy snacks. But we now avail of them from a mass production process, packaged in serving sizes which we will not finish in one serving, and which we will buy after the packets have sat on the shelf for days, if not months. Freshly popped grains, and prepackaged popped grains, dont taste different only because of their production process but also because of their freshness. Were there so many bakeries, Wada- paav and fritter vendors, sweet vendors when we were growing up ? Today there are more than a few on every street corner. But I dont see any grainpopper shops opening up, some of the old shops have closed due to the competition from pre packaged snacks. Before the advent of Maggi and ‘No one can eat just one’ Lays, in our lives, our only snacking options were flattened rice flavored with either yogurt or oil and spices, flattened rice with cucumber, onion, tomatoes, coconut milk and tempering, beaten wheat stew with veggies, rice flour and buttermilk savory porridge.Besides that the raw materials brought from the grain popper store, were garnished with home cooking and served as our favorite munchies. To some, these options may seem limited, narrow, but our tummies were nurtured with good healthy food, which along with nourishment has left behind picturesque memories, sights, smells and sounds ..It’s quite possible that my nostalgia makes me more prone to look at these memories as something precious, to glorify ‘my childhood’ as healthier times. But I really feel privileged to have experienced the grain popper man, his shop, the relationship that I developed with food. On my next trip to India, a visit to the grain popper shop with my daughter will be top on my list. For I have acknowledgements to make and gratitude to share....




No comments:

Post a Comment