आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खास मित्र मैत्रिणी असतात, त्यांच्याच बरोबर टपरीवरचा cutting चहा, भेळ, वडा पाव, चिंचा-बोरं, पेरू, बॉब्या, आणि काय काय शेलकं शेलकं आपण share केलेलं असतं; त्यांच्याच हातचा भाजणीचा वडा, pineapple and cheese stick, मउ तूप मेतकुट भात, हॉस्टेलच्या hot plate वरची भाकरी, आपल्या मनाच्या खाबू कप्प्यात, आई आज्जी,भावंडांच्या हातच्या चवीबरोबर रेंगाळत राहिलेली असते..... आपल्या मैत्रीचा तो एक महत्वाचा नाजूक कोपरा असतो, मनात अनेक डेबिट क्रेडिटची पासबुकं अशा मित्रांबरोबर आपण अनेक वर्ष भरत राहतो...
माझ्या बाबतीत अशी अनेक समीकरणं आहेत. पण आज एका खास मैत्रीणीसाठी, खास मैत्री बद्दल लिहिते आहे. फोटोमध्ये छान ओला खजूर, काजू आणि बदामाचा लाडू आहे. तो खाऊन तोंड गोड करा, मन भरून माझ्या मैत्रीणीला आशीर्वाद द्या - तिला मुलगा झालाय !
मैत्रिणीला, "डोहाळजेवण कधी करूया?" असं विचारायला फोन केला असता, बातमी कळली की पोटातलं पिल्लू फार impatient आहे, चार आठवडे लवकरच बाहेर आलंय. आई अजून अमेरिकेत पोचलेली नाही. असं कळल्यावर ह्या रविवारीची सकाळ स्वैपाकघरात घालवली आणि डब्बा पाठवला. Delivery नंतर, मैत्रिणीच्या पोटात गेलेलं हे घरचं, पहिलं जेवण. त्याला तिच्या आईच्या हातची सर नाही...पण अपार माया आणि वर म्हटलं न तसं हे आमच्या नात्याचं एक स्वतः गुंफत जाणारं वर्तुळ...
(पालक बटाटा भाजी, केलची भाजी, मुगाची डाळ- लसूण-लाल मिरची-आणि खोबऱ्याचे दूध घातलेली मेथीची भाजी, जवस- तीळ- दाणे-आमसूल- कढीपत्ता ह्याची चटणी, डाळ मेथी, ज्वारीच्या लाह्या, ओला खजूर-काजू-बदाम ह्याचे लाडू, हिंग-मिरं-जिरं घालून शिजवलेला भात)
आता थोडा flashback....
२००९ -खरंतर ती माझ्या नवऱ्याची मैत्रीण. पण माझ्या एका प्रयोगासाठी गाणं गाण्याच्या निमित्ताने मी तिला चोरलं..:) ती New York मध्ये राहत होती, मी कॅलिफोर्निया मध्ये. ती बंगाली आणि मी तिच्याकडून मराठीतलं ठसठशीत गाणं गाऊन घेत होते. पण ती, ळ, ख, ण, सगळं शिकली, माझ्या त्या एका गाण्यासाठी. गाण्याच्या निम्मिताने अनेक आवडी निवडींची विचारपूस झाली, अर्थातच स्वैपाक आणि खाद्य संस्कृतीबद्दल. ती मासाहारी आणि मी शुद्ध शाकाहारी, ती गोडखाऊ आणि मी चटक मटक आवडणारी. पण cooking from scratch हे दोघींच्या जिव्हाळ्याचे विषय. एक अनामिक दुआ होता आम्हाला गुंफून ठेवणारा. वर्षातून आमची भेट एक दोनदाच होते - पण अनेक भेटींचं समाधान देणारं सुख आमच्या त्या भेटींमधून आम्हाला मिळून जातं. Fast Forward to 20१0-११
तिने निवडलेला जोडीदार -आमच्याजवळच कॅलीफोर्निया मध्ये राहत होता. तो पण आमचा मित्रच होता. त्यांचा लग्न करण्याचा निर्णय दोन्ही घरांमध्ये मान्य नव्हता. Vicky Donor मध्ये दाखवलंय न अगदी same to same तसं...ती बंगाली आणि तो नॉर्थ इंडियन! (बनिया, जाट, पंजाबी, काश्मिरी, बिहारी सगळे सरधोपट नॉर्थ इंडिअन ह्या category मध्ये ढकलले जातात.) तिच्या आई बाबांची आणि मित्राची पहिली भेट आमच्या घरी घडवायची अशी काहीतरी परिस्थिती निर्माण झाली. मला प्रचंड tension- आधीच घरून विरोध, त्यात निकीत आणि माझ्याकडून काही चुकीचं बोललं, वागलं गेलं तर? आमच्या दोघांची तिशीही न उलटलेली, हे असलं बोलणी इत्यादी formal गोष्टींची काहीच सवय नाही, आणि अनुभव असता तरी सगळं असं भास्वयचं होतं की भेट न ठरवता, अचानकच घडली आहे ! मुलगा पण आपला, मुलगी पण आपली, उत्तर भारतात किंवा बंगाली कुटुंबात कांदा पोहे कार्यक्रम असतो का नाही हे पण माहित नाही, पण तरीही कांदा पोहे करणं म्हणजे अगदीच obvious ! म्हणून खास महाराष्ट्रीयन असा दडपे पोहे आणि गवती चहा घातलेला चहा असा बेत ठरवला, शेवयांची खीर काही चांगलं घडल्यास गोडघास म्हणून नंतर, "I Forgot dessert!" असं म्हणून Vanilla Ice cream बरोबर serve करायचं ठरलं. (२०१०-११ साली मला फक्त तीनच गोडाचे पदार्थ करता येत होते, शिरा, खीर आणि गुळ पोळी.)
मोठ्या भावंडांची भूमिका स्वीकारून आम्ही घराचा set लाऊन ठेवला, निकीत ने घरातली पेटी / Harmonium अगदी दररोज पॉलिश करतो असं वाटावं इतकी लखलखीत करून भारतीय बैठकीसमोर आणून ठेवली. आमची मैत्रीण आणि तिचे आई वडील घरी आल्यावर ताजी चरचरीत फोडणी (!)करायची एवढंच काय ते बाकी होतं. मैत्रीण आणि तिचे आई बाबा - छान दार्जीलिंग, असाम आणि चीटागाँग मधल्या तीन वेगवेगळ्या चहाpowder असलेल्या jute चा अत्यंत देखणा, दिमाखदार box आमच्यासाठी घेऊन आले होते. आल्या आल्या चहा झाला. गवती चहाच्या चवीचे विश्लेषण झालं, तो चहा एखाद्या gourmet पदार्थ असल्यासारखा त्याचा आस्वाद घेऊन झाला, थोड्या वेळाने अजून घेण्याचा संकेत पण मिळाला. बंगाली माणसांना, मराठीमाणसाइतकीच, नाटक, संगीत, साहित्य, एकंदरीतच कलाक्षेत्राविषयी अत्यंत आत्मीयता आहे, तशीच आणि तितकीच चहा बद्दल आहे. चहा झाल्यावर मनोरंजनाचा कार्यक्रम सुरु झाला.पेटीवर रवींद्रसंगीत आणि दिनाथ मंगेशकरांच्या चाली वाजू लागल्या, आमच्या त्या छोट्याश्या ४०० स्क़्वेरफुटाच्या स्टुडंट हौसिंग मधल्या घरात मधुर बंगाली आणि धारदार मराठी स्वर फेर धरायला लागले... आई -वडिलांची जरा चुळबुळ सुरु झाल्यावर मी उरलेला'स्वैपाक' करायला उठले. काकडी,टोमॅटो , कांदा, पातळ पोह्यात मिसळून मी त्याच्यावर चवीनुसार मीठ साखर घातली आणि लिंबू पिळलं. तेलात मुठभर दाणे परतायला टाकले, तोपर्यंत मैत्रीण आणि तिची आई आमच्या त्या ईवलूष्या, एका वेळेला एकच माणूस उभा राहू शकेल अशा स्वैपाकघरात येऊन ही फोडणी बघायला लागल्या. मग काय ? तेल पटकन तापलं, त्यात चार बोटं डाळं, मोहरी, जिरं, हिंग, हळद, मिरचीचे काप, आणि कढीलिंबाची पानं घातली. पानं मस्त चरचरली आणि घराची बेल वाजली.....Future जावईबापू हजर ! आमच्यासाठी wine आणि chocolates घेऊन दारात उभे! पुढचे २ मिनिटं आमच्या घरात pin drop silence. एकमेकांकडे सगळेच डोळ्याच्या कोपऱ्यातून बघतायत... त्यावेळात फोडणीचा वास आमच्याभवती दरवळत होता.. मैत्रिणीच्या आईने विचारलं, "So is the Poha ready?" आणि मग शांतता भंगली... भारत- अमेरिका राजकीय विषयांवर चर्चा करता करता पुरुषांनी पोह्यांचा आस्वाद घेतला.. बंगाली मायलेकींनी - पाककृती, विचारून , त्यांच्या "झाल मुरी" ची आठवण काढली.... काही वेळाने खीर पण fridge मधून बाहेर आली, गरम झाली, आणि त्यावर ice cream वितळलं, आम्ही सगळेच सैलावलो.... पण ही भेट म्हणजे फक्त पाहिलं पाउल होतं, नंतर एक वर्ष गेलं त्यांचं लग्न व्हायला...
Back to present Day: So, अशी ती लग्नासाठीची पहिली भेट माझ्या हातच्या पोहे आणि खीरीने सजली, तशीच आजीच्या हातची चव पोचायच्या आधी माझ्या जेवणाची चव त्यांच्या छकुल्याच्या पोटी पोचली. हे योग असेच जुळून येतात. ठरवून, planning ने नाही जमत. काहीच लोकांबरोबर का जुळून येतात?
अशा घेण्या देण्यात खूप तृप्तता आहे, नात्यातले ऋणानुबंध घट्ट होत अस्तातच आणि ही स्वतः गुंफत राहणारी मायेची, मैत्रीची वर्तुळं अनंत विणली जात असतात....
No comments:
Post a Comment