मी आणि माझा नवरा निकीत दोघंही खवैये आहोत, पण प्रवासाहून परत आलं की निकीतला वरण तूप भात मीठ लिंबू असं साधं जेवण पण परमोच्च सुख प्रदान करून जातं. बरं वरण भाताचा आस्वाद घ्यायला त्याला तोंडीलावणं लागत नाही. मलाच लागतं ,मुलीला पण नुसता वरण भात आवडत नाही; भाजी,कोशिंबीर, लोणचं, पापड, चटणी, कढी (वरण तूप भातावर कढी! हा तुफान चविचा पदार्थ मी अनेक वर्षात खालला नाहीये, पोस्ट लिहिता लिहिता आठवण झाली, आता पुढच्या काही दिवसात करणे अपरिहार्य आहे !). सो, असं प्रवासाहून, आठवडा -दहा दिवस बाहेर राहून घरी परतल्यावर निकीतला खुश करण्याचं काम अत्यंत सोपं आहे. आज जवळ जवळ दोन आठवड्यांनी निकीत भारतातूनच अमेरिकेत परत येत होता. भारतात त्याचं काम दिल्ली नाहीतर बंगलोरला असल्यामुळे त्याची पुण्यातली खाबुगिरी बाजूला पडते. उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीचा पुरेपूर आनंद लुटल्यावर आपलं मराठी जेवण आठवायला लागतं. इकडे मी त्याला करता येणाऱ्या खाबुगीरीचा हेवा करत थोडीशी हळहळत असते आणि त्याला परत घरी येण्याचे वेध लागलेले असतात...
आज जरा काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी निकीतचीच एक रेसिपी आहे ,फोडणीच्या वरणाची -ती वापरून फोडणीचं वरण आणि भात असं जेवण तयार ठेवलं होतं. कोशिंबीर करायची होती. ( फोडणीचे वरण साहित्य- एक वाटी मुग, मसूर, तूर डाळ mix, तेज पत्ता २,तीन वेलदोडे, ४-५ लवंगा, २ मोठे तुकडे दालचिनी, कढीपत्ता पानं, लालमिरची, अर्धी वाटी दही, मीठ, गुळ. दोन चमचे साजूक तुपात फोडणी करायची- हिंग, जिरं , खडा मसाला, कढीपत्ता, लालमिरची. मग धुतलेली डाळ त्यामध्ये घालून वरण फोडणीसकट शिजवायचं. शिजल्यावर त्यात अर्धी वाती दही घोटून घालायचं. हे वरण जितकं मुरेल तितका लवंग दालचिनीचा स्वाद, वास त्यामध्ये मुरतो आणि वरण अधिकच छान लागतं- सहसा मुरायला निदान चार पाच तास लागतात.)
सव्वा बाराच्या सुमारास ऐरपोर्टहून फोन आला, " पोचलोय. सॉलिड भूक लागलीये. चार दिवसात निवांत जेवलोच नाहीये!" जेवण तयारच आहे असं म्हणून मी फोन ठेवला. सव्वा वाजता मुलीला शाळेतून आणायला निघायचं होतं, आम्ही परत यायच्या आधी निकीत घरी हजार. साठ मिनिटांचा भरपूर अवधी समोर होता, ठरवलं आज साध्या वरण भाताला अनायसा फुली मारली आहे तर चक्क सगळीच रीत आज बदलून टाकायची! वांग्याचं भरीत, भाकरी, तवा पुलाव, फोडणीचं वरण, काकडीची कोशिंबीर असा मेनू ठरवला. ( लागल्यास थोडा साधा भात -नंतर साधा वरण भात खायला बाजूला ठेवायचा असं ठरवलं) एकीकडे गॅसवर वांगं भाजायला ठेवलं, दुसरीकडे कांदा, टोमॅटो ,बटाटा, ढोबळी मिरची चिरायला घेतली. कांदा चिरून झाल्यावर, एका गॅसवर कढई ठेऊन तवा पुलावसाठी कांदा परतायला घेतला, ते होतोय तोपर्यंत ढोबळी मिरची चिरून झाली ती कांद्याबरोबर परतायला कढईत टाकली, गॅसवरचं वांगं पलटवून झालं, भारतासाठी कांदा-टोमॅटो-बटाट्याच्या फोडी करून झाल्या, मग काकडी सोलायला घेतली ... हे असं अचानक मेनू ठरवून, थोड्याश्याच वेळात झक्कास स्वैपाक करायला एक वेगळीच मज्जा येते... त्यावेळेला घरातलच स्वैपाकघर कुठल्याही भटारखान्यासारखं वाटतं. म्हणजे ऑरडरी सोडणारे, निभावणारे आणि नंतर ते जेवणारेही आपण स्वतःच असलो तरी झपाटून काम केल्यासारखं - Adrenaline rush असतो त्या मध्ये!
पुलावात घालायला मटार नव्हते तर मी फ्रोझन सोलाणे घातले. दाण्याचं कुट संपलं होतं म्हणून microwave मध्ये दाणे भाजायला ठेवले. वांग्याचं भरीत करताना एरवी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा लसूण मसाला वापरते त्या ऐवजी भरतात - कढीलिंब ,लसूण, तीळ, धन्या जीऱ्याची पूड आणि गोडा मसाला वापरला, दाण्याचे थोडे अर्धबोबडे कुट घातले. बरोबर १ वाजून दहा मिनिटांनी पुलाव,काकडीची कोशिंबीर आणि भरीत तयार होतं! चालती बोलती मसाल्याची पेटीच शाळेत मुलीला न्यायला आली आहे असं वाटायला नको म्हणून चटकन कपडे बदलून, डोक्यावर टोपी चढवून घरातून बाहेर पडले! खरंतर मी काही नवीन पदार्थाचा शोध लावला नव्हता, कुठलंसं अवघड पक्वान्न बनवलं नव्हतं, पण पाउलं हवेत तरंगत होती, माझी मलाच आस्वाद घेऊन स्वैपाक केल्याची झिंग चढली होती !
भाकरी मात्र मुलीला शाळेतून घरी आणल्यावर मी गरम गरम तव्यावरून पानात वाढली . दाणे भाजलेलेच होते म्हणून कोरडं आमसूल, जिरं, तिखट, मीठ, साखर घालून मिक्सरला छान दाण्याची चटणी वाटली. मुलगी शाळेतून जेऊन येते, तिला पानतल्या कशातच रस नव्हता, तिने भारतातून आणलेला खाऊ शोधत बाबाच्या bags उपसल्या. त्या वेळात निकीत छान आस्वाद घेऊन जेवला. माझी भाकरी पानात घेऊन मी बसणार तेवढ्यात मुलीला झोप आल्याची जाणीव झाली, बाबा इतके दिवस तिच्या जवळ नसल्यामुळे आणि पोट भर जेवण जेवल्यामुळे - तो तिला झोपवायला गेला.. मी जेवायला सुरु करायच्या आधी माझ्या भरल्या ताटाचा फोटो काढला. :) मी तेव्हा एकटी जेवत असले तरी नंतर इतरही त्याचा आस्वाद घेतील म्हणून !
माझं जेऊन होईपर्यंत घरात सामसूम झाली होती. भांड्यांची आवारा आवार झाली, उरलेले पदार्थ डब्यात भरून भांडी पाण्याखालून गेली तरी सगळं सामसूम. भरल्यापोटी निद्रा देवीने आमंत्रण दिलेलं कोण टाळणार ?
बाप लेक वामकुक्षीच्या आधीन झाले होते...
त्यांना पाहताना मला दोन्ही आया आठवल्या! घरात मोठी मुलं, नातवंडं सगळ्यांच्या आवडीचं काय काय स्वैपाक करत सकाळपासून जुंपतात, तरी दुपारच्या जेवणानंतर सगळ्यात शेवटी पाठ टेकणाऱ्या त्याच, आणि दुपारचा चहा "आई काय फक्कड बनवते" म्हणून उठून चहा करणाऱ्या पण त्याच!
बहुदा हे विचार माझ्या डोक्यात येईपर्यंत मला चढलेली स्वैपाकाची झिंग उतरली होती. स्वतःच्या अंगावर पांघरूण ओढताना मी विचार केला, "बरेच दिवसात निकीतच्या हातचा चहा प्यायले नाहीये, पाच साडे पाचला त्यालाच उठवावं !"
चहा नंतर प्यायले का , तो कुणी केला हा वेगळा विषय आहे , पण प्रदीर्घ वामकुक्षीनंतर, दिवसाची सांगता उत्तम " मुरलेल्या " वरण भात, दाण्याची चटणी आणि मरलो च्या एका ग्लासने झाली! अन्न दाता सुखी भवं आजच्या सारखंच उद्या मिळो!
Both me and my husband, Nikit are foodies. But when he returns home from a long travel or trip, Nikit's idea of ambrosia is a bowl of simple steamed white rice, lentils flavored with turmeric asafoetida, jaggery, and salt, topped with a dollop of clarified butter and lemon juice. He enjoys it as a complete one pot meal with no need for any accompaniments. Whereas both me and my daughter need stir fried veggies, a salad, pickles, chutney or papad to enjoy our Dal-Rice. So , in a way it is very easy to appease Nikit's taste and the cooking time and effort is minimal.Today he was returning back home after a two week stay in India. He mostly visits Delhi and Bangalore for work so he enjoys the delightful offerings of the Northern and South Indian cuisines of India, but starts missing the comfort of Marathi food after a week or so..
Today I had decided to cook a Spiced lentils version of Nikit's own recipe. ( One bowl of Mixed Moong, Toor and Masoor dal, three cardamoms, 4-5 cloves, 2 big pieces of cinnamon, Bay leaves 2, curryleaves, Red chillies, turmeric, Asafoetida, cumin, Salt, half a bowl yogurt, jaggery. In two spoons of clarified butter make a tempering with all the spices and to the tempering add the washed and soaked lentil mixture. Pressure cook the Dal. After it is cooked add the well beaten yogurt to the Dal, and jaggery, adjust the salt according to taste. This Dal tastes the best when the cloves and cinnamon have marinated enough in the lentils. Normally this takes about 4-5 hours..) The Dal and rice was ready and I was planning to make a cucumber salad with roasted peanuts powder. Around 12.15 I received a call from the airport, " Arrived on time, am so hungry ..haven't had a good sit down meal in four days.." I assured him that the food was ready and hung up the phone. Since I had all ready changed the simple Dal-Rice meal plan I decided to completely change it and cook a full meal worthy of a proper sit down lunch. I decided on making Spicy eggplant and potato mash, Tava pulav, cucumber salad, bhakri, and Dal.
I had a whole 60 minutes until 1.15 before I had to go and pick up my daughter from school.
I started roasting an eggplant on the gas stove. On the kitchen counters I assembled onions, tomatoes, potatoes and bell peppers. I started cutting the onions first and as soon as I cut enough for the Tava Pulav I put a pan on second gas top and started sauteing the onions for the Pulav. Then I diced bell peppers, turned over the roasting eggplant, Added the bell peppers to the sauteed onions and started dicing the tomatoes... There was no roasted groundnut powder, I put a dish of peanuts in the microwave. There were no peas in the house for the Pulav ; I decided to add frozen green chickpeas.. This impromptu cooking under a strict time deadline in my own kitchen was a lot of fun. It felt like a commercial kitchen where I was the head chef barking orders at the sous chef and then of course I was also going to be the happy consumer whose tummy was going to be well fed. The excitement gave me a great adrenaline rush..For the Eggplant and potato mash- I added a tempering of Curry leaves, asafoetida, crushed 4-5 garlic pods, sesame seeds, coriander and cumin powder, Goda masala and then sauteed the onions tomatoes and potatoes in it, after the potatoes were cooked I added the eggplant. Added the salt.
By 1.10 I had finished the Pulav, Mash and the Salad. Since I didn't mean to smell like a human spice shop , I quickly changed my clothes, pulled down a cap over my head and rushed to pick up my daughter. I hadn't invented a new recipe or cooked a very hard to get gourmet dish, but there was a lightness to my step as I left my house. The impromptu lunch plan and my enjoyment of the adrenaline inducing cooking process gave me a zing of euphoria!
I made bhakri after I returned home with my daughter. I served them piping hot right off the pan unto the plate. Since I had already roasted the peanuts I made a quick peanut chutney - using roasted peanuts, dried Kokam, cumin, salt, red chilli powder and sugar.My daughter had eaten lunch at school so she didn't eat, she was more interested in rooting through her Dad's luggage to look for the goodies that he had brought from his trip. That gave Nikit, enough time to sit down and enjoy the meal I had put in front of him. By the time I was ready to sit down with my bhakri, my daughter remembered that it was time for her nap. Having finished his lunch, Nikit headed off to put her down for her nap. When I sat down to eat, I first took a picture of the plate I had made for myself. I may have been eating alone at that moment but I knew others would be able to share in its enjoyment later.
I finished eating, but there was no sound from the bedroom. I cleared the pans, stored away the leftovers in their containers, rinsed the pots and pans- but nobody roused. A full sit down meal after a long travel can do that to anyone. Who can refuse the temptation of a Siesta ! When I saw my daughter and Nikit cuddled together, far off in sleepy land I thought of my mother and mother in law.
They spend the entire mornings cooking for us kids, grand kids but they are the last to lie down. Also since Moms make the most amazing tea that can cure all sorts of laziness - they are the first to rouse to make that cup of tea.
I think by this point the earlier Zing of euphoria had faded away. Most probably chewed away with each bite of food :) As I drew the comforter over my body , I thought," Nikit has not made tea in 14 days, I should wake him at 5.30 to make the tea.."
Now, did I drink any tea, who made the tea, is a story for another day. But after a refreshing fiesta, the day ended with a nice glass of Merlot, Spicy lentils, rice and peanut chutney. !
Very well written!! You have a special art to put your feelings perfectly into words!!
ReplyDeleteThank you for reading and taking the time to leave a comment! Much appreciated!
Deleteखादाड खाऊ ह्या group वरची एक प्रतिक्रिया आवडली ती इथे post करते आहे! Dnyanraj Kulkarni व्वा. सुरेख... साता समुद्राच्या पल्याड ची ही सफर कुठल्याही टूरिस्ट सफरीत मिळेल असं वाटत नाही ..वर्णन तर ईतक चपखल की तूझी धावपळ..नात्याची घट्ट वीण..कुठे ही कसलाही बाउ नाही.. पदार्थ तयार होताना ची कथा ..सारं काही सुरसरम्य...हे सगळं लांब असून हाताच्या अंतरावर असल्यागत चा भास..अतुलनीय. वरणाची रेसिपी पण फोडणी दार...खूप अन्नपूर्णा.. बल्लवाचार्य..या प्रुथ्वीवर अम्रूत घेऊन आले असतील.. पण ही विरळाच.. अम्रुता.. आभाळभर कौतुक.
ReplyDelete