स्प्रिंग ब्रेक आमच्याघरी
दीड आठवडा चालला. प्रवास झाला, snow tubing झालं, बर्फाच्या पाण्यात खेळून झालं, zoo मधल्या प्राण्यांना भेट देऊन झाली, potty training झालं, सर्दी खोकला येऊन गेला,(
पिल्लामुळे आईला पण),अवेळी पाउस पडून गेला पण आमच्या घरात non stop गुणगुणं नाहीतर बडबड, १२ तास गुणिले १० दिवस
चालूच होती. ( इरा १२ तास झोपते, निदान आत्तातरी झोपेत बोलत
नाहीये.) मी खूप आतुरतेने सोमवारी
शाळा परत सुरु होण्याची आणि घरातल्या pin drop silence ची वाट बघत होते. रविवार सुट्टीचा शेवटचा दिवस, त्यामुळे ' मुलं' म्हणजे कबीर आणि मेहेर,आमच्याघरी येणार होती... त्यामुळे एकाची बडबड गुणिले ३ अशाने सुट्टीची सांगता
होणार हे निश्चित होतं...
मी स्वैपाकघरात होते,
इरा खिडकीला तोंड लाऊन त्यांची येण्याची वाट बघत बसली होती.
त्यामुळे दार वाजायच्या आधीच निकीतने दार उघडलं. मी किचनमध्ये काम करत होते,तर मी
पाठ्मोरीच असताना एक कडकडून मिठी मारण्यात आली. मग माझ्या हातात एक कागदी गिफ्ट बॅग
ठेऊन, उड्या मारत, "Open it ! Open it ! I made it !" अशी सूचना करण्यात आली. मी हात धुण्याची पण उसंत नव्हती. पेपर bag वर लिहिलं होतं,
"Contain yourself". आत छान टिशू पेपर मध्ये गुंडाळलेली PNG
गाडगीळ सराफांची लांबूळकी पेटी. त्या पेटीवर लहान- मोठे
पांढरे मोती Hot Glue ने चिकटवून केलेलं छान
नक्षीकाम. पेटी उघडली तर त्यात Hot glue ला आकार देऊन केलेला गुलाबी रंगाचा बदाम,
त्यावर छानसं चंदेरी पॅालिश असलेलं एक छोटं पदक, एका नाजूक
साखळी मध्ये अडकवलेलं. सोबत दोन assymetrical कानातली, एका कानात anchor आणि दुसऱ्यामध्ये निळा कुमुद असलेलं एक फुल " Because
they look cool !". हे सगळं करणारा प्राणी,
मेहेर, वय वर्ष ९ (sometimes going on 30, sometimes 75 and sometimes
5). तिच्याबरोबर दुसरा प्राणी, कबीर, वय वर्ष १२,
आमच्यासाठी एक नवीन Invention घेऊन आला होता, एक बॉक्स-कम-ग्लास ज्यामधून popcorn खाणं आणि कोक पिणं एकत्र करता येयील. त्याचा फोटो मात्र नाही काढता आला कारण
संशोधन आजून चालू आहे आणि Product trials इत्यादी अजून
व्हायचे आहेत. दोघांनी एकाच वेळी ," do you like it?" चा गजर सुरु केला, पण मी इतकी सुखावले
होते की 'मुलांना' ओल्या पापण्यांनी " छान आहे!" एवढंच म्हणू शकले...
कबीर आणि मेहेर, निकीत आणि माझं लग्न व्हायच्या आधीपासून आमच्या आयुष्यात
आले आणि आम्ही त्यांना आपसूक 'मुलं' असं म्हणायला लागलो. खरं, माझ्या मोठ्या बहिणीची मुलं, पण मी निकीत बरोबर आहे
म्हणून ती मला accept करतात. घरी गेल्यावर ,
दारात एकटीच उभी असेन तर मुलं सरळ मला ढकलून बाहेर पळत
जातात त्याला भेटायला. इराच्या जन्मानंतर निकीत आणि इरा
पहिलं स्थान आणि मी अजूनही afterthought आहे त्यांच्यासाठी. Hero
and his sidekick असं म्हणू काहीसं. अलीकडे मी ह्याबद्दल नाराजी
व्यक्त केल्यामुळे मला जुजबी मिठी मारतात किंवा इराला डोक्यावर थोपटावं तसं मला 'उगी ,उगी ' म्हणून पळून जातात. मी एकटीच गेले तर निकीत आणि इरा कुठे
आहेत आणि कधी येणार ह्या प्रश्नांची त्यांना पटतील अशी उत्तरं द्यावी लागतात. मला
हे मनाला खूप बोचतं. ह्या दोघांचे लहान असताना diaper मी बदलले आहेत, २-३ आठवड्याचे असतांना
त्यांची नखं कापली आहेत,शेंबूड पुसला आहे, गोष्टी सांगत भरवलं आहे, कधी थोपटून
झोपवण्याचा प्रयत्न केला आहे, माझे भारतीय इंग्रजी उच्चार कसे चुकीचे आहेत हे
समजावून घेतलंय,अनेक अनेक दिव्य पार पाडली आहेत त्यांचा स्नेह मिळवण्याकरता. त्यामुळे
निकीतकडे त्यांची ओढ जास्त आहे हे मनाला खुपतं,
पण hero worship चा रोख असा ठरवून
कुठे बदलता येतो का ? त्यामुळे मी पण status
quo acceptकेला आहे. पण मुलं खूप unpredictable असतात. अचानक,
अपेक्षा नसतांना त्यांचा spotlight माझ्याकडे वळतो आणि त्यांच्या मायेचा वर्षाव माझ्यावर होतो तेव्हा मन इतकं
सुखावतं, नव्याने त्यांच्या प्रेमात पडतं..
इतक्या गोंडस रुपड्याची, हाताने बनवलेली, मोहरणाऱ्या
कल्पकतेने अलंकृत केलेली ही भेट, मला एखाद्या ‘खऱ्या’ दागीन्यापेक्षा अधिक मौल्यवान
वाटली. पुढे चार पाच तास मी हवेत होते....माझ्या ह्या euphoriaमुळेच मला एक
साक्षात्कार घडला..
संध्याकाळी आम्ही तिघंच, मी,
कबीर आणि मेहेर एका टेकाड्यावर wildflowers बघत चाललो होतो. चालता चालता आकाशी
रंगाची,नाजूक देठाची, अनेक चिमुकल्या फुलांच्या एक गुच्छ म्हणजे एक डेरेदार मोठं
फुल, अशा एका अनामिक फुलाने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांची पळापळ सुरु झाली की
कोण आईसाठी सगळ्यात मोठं , जास्त डेरेदार फुल तोडतय. मी म्हटलं, “I wish someone
was picking a flower for me....” उत्तर आलं, “Duh! you can pick one for
yourself!” Translated to mean in Adult parlance, “ आई इथे नाहीये, पण तू आहेस तर
मग तू स्वतःसाठी स्वतःच फुलं तोड, इतर कुणाची वाट कशाला बघतेस?” मुलांचा भाबडेपणा
काही वेळा आपल्याला बोचू शकतो, पण त्याचा नीट विचार केला तर लक्षात येतं की काही सत्य आपल्या
हातून आपण ‘मोठं’ होत असतांना निसटलेली असतात. मोठं झाल्यावर आपण उगाच नसत्या obligations
इत्यादी मध्ये अडकतो,social niceties वगैरेचा विचार करतो. मुलांच्या उत्तराचं मला
हसू आलं आणि खरच स्वतःसाठी फुलं शोधायला लागले.मी मागितलं म्हणून माझ्यासाठी
नंतरही त्यांनी फुलं तोडली नाहीत, पण मला आवडलेल्या फुलाचं रोपटं मी मुळापासून
काढून घेऊन घरी कुंडीत लावावं अशी सूचना करून झाली. मी सांगितलं की “ wildflowers
कुंडीत नाही लावता येत.” त्यावर मग प्रश्नांची रांग लागली...
रात्री मुलं, ताई-सरब बरोबर
त्यांच्या घरी गेली तरी मी खूप वेळ आमच्या संभाषणाचा विचार करत राहिले. आपली ही
मुलं, आपली असून, आपली नसलेली. त्यांना दररोजची शिस्त, त्यांची भुणभुण, पिरपिर,
टूमणी, डोक्यातले स्क्रू पडल्यासारखे वेडंवाकडं वागणं काहीही आपल्याला भोगायला
लागत नाही.ह्या सगळ्यावर फक्त त्यांच्या आई वडिलांचा जन्मसिद्ध हक्क असतो. आपल्या
वाटेला त्यांचं गुणी, बहुतांश चांगलं, डोक्यातले सगळे स्क्रू जागच्याजागी फीट झालेले
असतांनाचं वागणं येतं, त्यांच्या स्वप्नांचे पाढे कधी ऐकायला मिळतात, कधी मोठ्या
आवाजातल्या कुजबुज्ण्यात त्यांची ‘secrets’ आपल्याला सोपवण्यात येतात,
त्यांच्यातल्या सुप्तगुणांचं बहरणं आपल्याला अनुभवता येतं...आपण फारशी मेह्नात न
करता ही मुलं अत्तरदाणीतलं अत्तर शिंपडावं तसं आपल्यावर प्रेम शिंपडतात- पण तेही
दररोज आपल्या वाटेला येत नाही. seasonal असतं. त्या टेकड्यावरच्या wildflowers
सारखंच. कुंडीत लाऊन दररोज पाणी घालून नाही बहरत ती, उंच झाडांच्या सावलीत, भरपूर
थंडी पावसानंतर, डोंगर उतारांवर, मुक्तपणे वाढत बहरत असतात ती..आपल्याला फक्त तिथपर्यंत
जाऊन पोचायला लागतं...
Loved it !!
ReplyDelete